Mumbai Indians Harmanpreet Kaur: हरमनप्रीत कौरच्या १० चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने केलेल्या ९५ धावांच्या विस्फोटक फलंदाजीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने गमावलेला सामना जिंकला. महिला प्रीमियर लीगच्या महत्त्वाच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला गुजरात जायंट्सविरुद्ध विजयासाठी शेवटच्या ५ षटकांत ७२ धावांची गरज होती आणि कर्णधार हरमनप्रीत कौर २७ चेंडूत ३९ धावांवर करत खेळत होती, तर एमिलिया २ चेंडूत २ धाव घेत तिच्यासोबत मैदानात होती. पण हरमनने अचानक आपला गियर बदलत एकामागून एक चेंडू थेट सीमारेषेबाहेर धाडले, कधी चौकार तर कधी षटकार… आणि बघता बघता एक चेंडू राखून मुंबईच्या संघाने दिमाखदार विजय मिळवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हरमनप्रीतची विस्फोटक खेळी पाहून सगळेच चकित होत होते. तिच्या बॅटला स्प्रिंग लावली आहे की काय असंच जणू वाटतं होतं. सामना संपल्यानंतर हरमनने एक महत्त्वाची गोष्ट सांगितली की खुद्द पंचांनी विजयानंतर त्याची बॅट तपासली. सामना संपल्यानंतर समालोचकही याबद्दल बोलत होते. सामन्यानंतर बोलताना कौरने सांगितले की, ही तिची सरावाची बॅट आहे. ती ज्या बॅटने खेळत होती. त्याची पकड थोडी सैल होत होती. त्यामुळे त्याने सरावाची बॅट वापरण्याचा निर्णय घेतला आणि तिने बॅट मागवून घेतल्यानंतर जे घडलं ते साऱ्या जगाने पाहिलं. हरमनप्रीत कौरने शेवटच्या २७ चेंडूत तब्बल ७५ धावा केल्या.

प्रथम फलंदाजी करताना गुजरात जायंट्सने ७ गड्यांच्या मोबदल्यात १९० धावा केल्या. बेथ मुनीने ३५ चेंडूंत ८ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ६६ धावा केल्या, तर हेमलताने ४० चेंडूंत ९ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने सर्वाधिक ७४ धावा केल्या. अखेरच्या सामन्यात भारती फुलमणीने १३ चेंडूत १ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने नाबाद २१ धावा केल्या. मुंबई संघाने ८ गोलंदाज बदलले, मात्र धावांचा प्रवाह रोखण्यात अपयश आले. एका क्षणाला तर धावसंख्या सहज २०० चा टप्पा गाठेल असे वाटले होते, पण मुंबईच्या गोलंदाजांना सूर गवसला.

प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सने दमदार सुरुवात करत हेली मॅथ्यूजने १८ धावा आणि यास्तिका भाटियाने ४९ धावा केल्या. मात्र हेली मॅथ्यूज,नतालिया सीव्हर ब्रंट (२) आणि यास्तिका भाटिया यांच्या विकेट पडल्यानंतर मुंबई अडचणीत आल्याचे दिसत होते. पण संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने जबाबदारी सांभाळत सामना मुंबईच्या दिशेने वळवला. या विजयासह मुंबई इंडियन्स बाद फेरीसाठी पात्र ठरली आहे. त्यांच्या खात्यात आता १० गुण असून संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wpl 2024 match referee check harmanpreet kaur bat after power hitting in mi vs gg match watch video bdg
Show comments