WPL 2025 Timetable: वुमन्स प्रिमीयर लीगच्या तिसऱ्या सीझनला आता सुरूवात होणार आहे. WPL चा पहिला सीझन मुंबई इंडियन्स संघ आहे. तर दुसरा सीझन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने जिंकला. महिला खेळाडूंच्या या टी-२० लीगमध्ये पाच संघ सहभागी होत आहेत. डब्ल्यूपीएलचा हा तिसरा सीझन आहे, ज्यामध्ये भारतीय स्टार महिला खेळाडूंसलह विदेशी क्रिकेटर्सही दिसणार आहेत. WPL २०२५ मध्ये फायनलसह एकूण २२ सामने खेळवले जातील.
वुमन्स प्रिमीयर लीग २०२५ ला १४ फेब्रुवारीपासून सुरू होत असून १५ मार्च रोजी विजेतेपदाची लढत होणार आहे. या लीगचे पूर्ण वेळापत्रका कसं असणार आहे, जाणून घेऊया. तर संघांचे कर्णधार कोण आहेत हेही जाणून घेऊयात.
WPL चे सामने कुठे खेळवले जाणार?
WPL मध्ये एकूण पाच संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (स्मृती मानधना, कर्णधार), गुजरात जायंट्स (ॲश्ले गार्डनर, कर्णधार), मुंबई इंडियन्स (हरमनप्रीत कौर, कर्णधार), दिल्ली कॅपिटल्स (मेग लॅनिंग, कर्णधार) आणि यूपी वॉरियर्स (दीप्ती शर्मा, कर्णधार) या संघाचा समावेश आहे. WPL 2025 चे टीव्हीवर लाईव्ह प्रक्षेपण भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० पासून स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर तर मोबाईलवर जिओ सिनेमा अॅपवर पाहता येतील.
WPLचे पहिले ६ सामने वडोदरमध्ये, त्यानंतर आठ सामने बेंगळुरूमध्ये आणि पुढील चार सामने लखनऊमध्ये होतील. शेवटचे चार सामने मुंबईत होणार आहेत. एलिमिनेटर सामना १३ मार्चला होणार आहे तर WPLचा अंतिम सामना १५ मार्चला मुंबईत होणार आहे.
WPL 2025 चे पाच संघ आणि कर्णधार
मुंबई इंडियन्स – कर्णधार हरमनप्रीत कौर
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – कर्णधार स्मृती मानधना
गुजरात जायंट्स – कर्णधार ॲश्ले गार्डनर
दिल्ली कॅपिटल्स – कर्णधार मेग लॅनिंग
युपी वॉरियर्ज – कर्णधार दीप्ती शर्मा
WPL 2025 वुमन्स प्रिमीयर लीगचं संपूर्ण वेळापत्रक
वडोदरा – कोटाम्बी स्टेडियम
- १४ फेब्रुवारी, शुक्र – गुजरात जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, ७.३० वाजता
- १५ फेब्रुवारी, शनि – मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, संध्याकाळी ७.३० वाजता
- १६ फेब्रुवारी, रवि – गुजरात जायंट्स विरुद्ध यूपी वॉरियर्स, संध्याकाळी ७.३० वाजता
- १७ फेब्रुवारी, सोम – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, ७.३० वाजता
- १८ फेब्रुवारी, मंगळ – गुजरात जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, ७.३० वाजता
- १९ फेब्रुवारी, बुध – यूपी वॉरियर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, संध्याकाळी ७.३० वाजता
बंगळुरू – चिन्नास्वामी स्टेडियम
- २१ फेब्रुवारी, शुक्र – रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध मुंबई इंडियन्स, संध्याकाळी ७.३० वाजता
- २२ फेब्रुवारी, शनि – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध यूपी वॉरियर्स, संध्याकाळी ७.३० वाजता७.३० वाजता
- २४ फेब्रुवारी, सोम – रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध यूपी वॉरियर्स, संध्याकाळी ७.३० वाजता
- २५ फेब्रुवारी, मंगळ – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात जायंट्स, ७.३० वाजता
- २६ फेब्रुवारी, बुध – मुंबई इंडियन्स विरुद्ध यूपी वॉरियर्स, संध्याकाळी ७.३० वाजता
- २७ फेब्रुवारी, गुरु – रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध गुजरात जायंट्स, ७.३० वाजता
- २८ फेब्रुवारी, शुक्र – दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, संध्याकाळी ७.३० वाजता
- १ मार्च, शनि – रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, संध्याकाळी ७.३० वाजता
लखनौ – एकाना क्रिकेट स्टेडियम
- ३ मार्च, सोम – यूपी वॉरियर्स विरुद्ध गुजरात जायंट्स, संध्याकाळी ७.३० वाजता
- ६ मार्च, गुरु – यूपी वॉरियर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, संध्याकाळी ७.३० वाजता
- ७ मार्च, शुक्र – गुजरात जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, ७.३० वाजता
- ८मार्च, शनि – यूपी वॉरियर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, संध्याकाळी ७.३० वाजता
मुंबई – ब्रेबॉर्न स्टेडियम
- १० मार्च, सोम – मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स, ७.३० वाजता
- ११ मार्च, मंगळ – मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, ७.३० वाजता
- १३ मार्च, गुरु – एलिमिनेटर, संध्याकाळी ७.३० वाजता
- १५ मार्च, शनि – अंतिम सामना, संध्याकाळी ७.३० वाजता