WPL 2025 Gujarat Giants vs Royal Challengers Bangalore Highlights : आरसीबीने महिला प्रीमियर लीग २०२५ च्या पहिल्या सामन्यात ऐतिहासिक विजय नोंदवला. गतविजेत्या आरसीबीने हंगामाची सुरुवात मोठ्या विजयाने केली आहे. विशेष म्हणजे आरसीबी संघ महिला प्रीमियर लीगच्या इतिहासात २०० हून अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करणारा पहिला संघ ठरला आहे. डब्ल्यूपीएल २०२५ च्या पहिल्या सामन्यात, गुजरातने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत २०१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल, बंगळुरूने रिचा (६४) आणि कनिकाच्या (३०) वादळी खेळीच्या जोरावर ९ चेंडू शिल्लक असताना ६ विकेट्सने सामना जिंकला.
तत्पूर्वी गुजरात जायंट्सची कर्णधार अॅशले गार्डनर आणि बेथ मुनी यांच्या अर्धशतकांमुळे गुजरात जायंट्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध पाच बाद २०१ धावा केल्या. मूनीने ४२ चेंडूत आठ चौकारांसह ५६ धावा केल्या, तर गार्डनरने ३७ चेंडूत तीन चौकार आणि आठ षटकारांसह ७९ धावांची नाबाद खेळी केली. लॉरा वोल्वार्ड आणि डी. हेमलथा ४१ धावा करून बाद झाल्या पण गार्डनर आणि मुनी यांनी डाव सावरला. ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी तिसऱ्या विकेटसाठी ४४ धावांची भागीदारी केली. लेग-स्पिनर प्रेमा रावतने मुनीला बाद केले आणि तिचा कॅच मंधानाने घेतला.
महिला प्रीमियर लीगच्या इतिहासात आरसीबी हा सर्वाधिक धावांचा पाठलाग करणारा संघ बनला आहे. डब्ल्यूपीएल च्या इतिहासात २०० पेक्षा जास्त धावांचा यशस्वी पाठलाग करणारा आरसीबी हा पहिला संघ आहे. यापूर्वी हा विक्रम मुंबई इंडियन्सच्या नावावर होता, ज्यांनी २०२४ मध्ये गुजरात जायंट्सविरुद्ध १९१ धावांचे लक्ष्य गाठले होते. गुजरातसाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे की, डब्ल्यूपीएलच्या इतिहासातील चार सर्वात मोठे यशस्वी पाठलाग फक्त गुजरात संघाविरुद्धच झाले आहेत.
WPL 2025 RCB vs GG Highlights : डब्ल्यूपीएल २०२५ मधील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मोठ्या फरकाने जिंकला. यासह आरसीबीने डब्ल्यूपीएलमध्ये नवा इतिहास लिहिला आहे.
आरसीबीने महिला प्रीमियर लीग २०२५ च्या पहिल्या सामन्यात ऐतिहासिक विजय नोंदवला. गतविजेत्या आरसीबीने हंगामाची सुरुवात मोठ्या विजयाने केली आहे. या सामन्यात, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर, गुजरातने २० षटकांत ५ गडी गमावून २०१ धावा केल्या. प्रत्युत्तरात, आरसीबीने १८.३ षटकांत चार गडी गमावून २०२ धावा केल्या आणि सामना जिंकला.
https://twitter.com/wplt20/status/1890455692802203899
महिला प्रीमियर लीगच्या इतिहासात आरसीबी हा सर्वाधिक धावांचा पाठलाग करणारा संघ बनला आहे. WPL च्या इतिहासात २०० पेक्षा जास्त धावांचा यशस्वी पाठलाग करणारा RCB हा पहिला संघ आहे. यापूर्वी हा विक्रम मुंबई इंडियन्सच्या नावावर होता, ज्यांनी २०२४ मध्ये गुजरात जायंट्सविरुद्ध १९१ धावांचे लक्ष्य गाठले होते. गुजरातसाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे की WPL इतिहासातील चार सर्वात मोठे पाठलाग फक्त गुजरात संघाविरुद्धच झाले आहेत.
RCB vs GG Live : १७ षटकांनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची धावसंख्या १७८/४ धावा
१७ षटकांनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची धावसंख्या १७८/४ आहे. कनिका आहुजा २८ धावा काढून खेळत आहे आणि रिचा घोष ४२ धावा काढून खेळत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला १८ चेंडूत प्रति षटक ८ या दराने २४ धावांची आवश्यकता आहे. आवश्यक रनरेट ८ आहे.
RCB vs GG Live : १५ षटकांनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची धावसंख्या १३९/४ धावा
१५ षटकांनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची धावसंख्या १३९/४ आहे. रिचा घोष १५ धावा काढून खेळत आहे आणि कनिका आहुजा १८ धावा काढून खेळत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला २९ चेंडूत १२.२० प्रति षटकाच्या वेगाने ५९ धावांची आवश्यकता आहे. आवश्यक धावगती १२.६० आहे.
एलिस पेरीने सायली सतघरेच्या गोलंदाजीवर आपली विकेट गमावली. लॉरा वोल्वार्डने झेल घेतला आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने त्यांची चौथी विकेट गमावली.
RCB vs GG Live : १२ षटकांनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची धावसंख्या १०८/३
१२ षटकांनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची धावसंख्या १०८/३ आहे. एलिस पेरी ५७ आणि रिचा घोष २ धावांवर खेळत आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ४७ चेंडूत ११.८७ प्रति षटकाच्या वेगाने ९३ धावांची आवश्यकता आहे. आवश्यक धावगती ११.७५ आहे.
RCB vs GG Live : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ७२ चेंडूत १३३ धावांची गरज
यल चॅलेंजर्स बंगळुरूला ७२ चेंडूत १३३ धावांची गरज
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची धावसंख्या ८ षटकांनंतर २ बाद ६९ धावा आहे. एलिस पेरी २५ धावा काढून खेळत आहे आणि राघवी बिस्ट २१ धावा काढून खेळत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ७२ चेंडूत ११.०८ प्रति षटकाच्या वेगाने १३३ धावांची आवश्यकता आहे. आवश्यक रनरेट ११.०८ आहे.
RCB vs GG Live : पॉवरप्लेनंतर आरसीबीची धावसंख्या २ बाद ५१ धावा
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची धावसंख्या ६ षटकांनंतर २ बाद ५१ धावा आहे. एलिस पेरी १७ धावा काढून खेळत आहे आणि राघवी बिस्ट १६ धावा काढून खेळत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ८४ चेंडूत १०.७८ प्रति षटकाच्या वेगाने १५१ धावांची आवश्यकता आहे.
RCB vs GG Live : ४ षटकांनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची धावसंख्या ३३/२ धावा
४ षटकांनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची धावसंख्या ३३/२ धावा आहे. एलिस पेरी ८ आणि राघवी बिस्ट ७ धावांवर खेळत आहेत.
RCB vs GG Live : आरसीबीला बसला दुसरा धक्का
आरसीबीला बसला दुसरा धक्का
https://twitter.com/wplt20/status/1890434060134072686
आरसीबीची सुरुवात निराशाजनक झाली. पहिल्या दोन षटकांतच संघाने दोन्ही सलामीवीरांच्या विकेट गमावल्या. मंधाना ९ धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतली आणि डॅनी चार धावा काढून परतली. सध्या एलिस पेरी आणि राघवी बिश्त क्रीजवर आहेत. ३ षटकानंतर आरसीबीची धावसंख्या २ बाद २३ धावा आहे
RCB vs GG Live : स्मृती मंधानाने केली वादळी सुरुवात
स्मृती मंधानाने आरसीबीच्या डावाला दमदार सुरुवात केली आहे. तिने षटकाच्या पहिल्याच दोन चौकार मारले आहे. यानंतर आरसीबी पहिल्या षटकात बिनबाद १२ धावा केल्या आहेत.
महिला प्रीमियर लीग २०२५ च्या पहिल्या सामन्यात कर्णधार अॅशले गार्डनर आणि यष्टीरक्षक-फलंदाज बेथ मुनी यांच्या अर्धशतकांमुळे गुजरात जायंट्सने २०० धावांचा टप्पा ओलांडला. संघाने २० षटकांत पाच गडी गमावून २०१ धावा केल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून रेणुका सिंगने दोन तर कनिका आहुजा, जॉर्जिया वेअरहॅम आणि प्रेमा रावत यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. बेथ मूनी (५६) आणि अॅशले गार्डनर (७९*) व्यतिरिक्त, लॉरा वोल्वार्डने सहा, दयालन हेमलथाने चार, डिएंड्रा डॉटिनने २५, सिमरन शेखने ११ आणि हरलीन देओलने नाबाद ९ धावा केल्या.
RCB vs GG Live :आरसीबीने गुजरात जायंट्सला दिला चौथा धक्का
आरसीबीने गुजरात जायंट्सला चौथा धक्का दिला आहे, रेणूकाने डिआंड्रा डॉटिनला २५ धावांवर झेलबाद केले. १८ षटकानंतर गुजरात जायंट्सची धावसंख्या ४ बाद १७२ धावा आहे. अॅशले गार्डनरने ७१ धावांवर नाबाद आहे
RCB vs GG Live : अॅशले गार्डनरने झळकावले अर्धशतक
अॅशले गार्डनरने झळकावले अर्धशतक
गुजरात जायंट्सच्या अॅशले गार्डनरने अर्धशतक झळकावले आहे. अॅशले गार्डनरने २५ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांसह अर्धशतक पूर्ण केले. १६ षटकानंतर गुजरात जायंट्सची धावसंख्या ३ बाद १४८ धावा आहे.
https://twitter.com/InsideSportIND/status/1890419991096312264
RCB vs GG Live : १४ षटकांतनंतर गुजरात जायंट्सची धावसंख्या ३ बाद ११९
१४ षटकांतनंतर गुजरात जायंट्सची धावसंख्या ३ बाद ११९
गुजरात जायंट्सने १४ षटकांतनंतर ११९/३ धावा केल्या. अॅशले गार्डनर ३४(१८) आणि डिएंड्रा डॉटिन १०(५) धावांवर खेळत आहेत. प्रेमा रावत २-२६-१
RCB vs GG Live : बेथ मुनी झेलबाद
बेथ मुनी झेलबाद
११.४: बेथ मुनीने प्रेमा रावतच्या गोलंदाजीवर आपली विकेट गमावली. स्मृती मानधनाने झेल घेतला आणि अशा प्रकारे गुजरात जायंट्सने तिसरी विकेट गमावली. गुजरातने १३ षटकानंतर ३ बाद ९८ धावा केल्या आहेत.
https://twitter.com/InsideSportIND/status/1890416191555899841
RCB vs GG Live : बेथ मुनीने झळकावले अर्धशतक
बेथ मुनीने झळकावले अर्धशतक
गुजरात जायंट्सच्या बेथ मुनीने अर्धशतक झळकावले आहे. बेथ मुनीने ३७ चेंडूत ७ चौकार आणि शून्य षटकारांसह अर्धशतक पूर्ण केले.
RCB vs GG Live : गुजरात जायंट्सची धावसंख्या ९ षटकानंतर २ बाद ५३ धावा
गुजरात जायंट्सने ९ षटकानंतर २ बाद ५३ धावा केल्या आहेत. बेथ मुनी ३५ (३१) आणि अॅशली गार्डनर २ (४) धावांवर खेळत आहे.
https://twitter.com/JonahAbraham26/status/1890410562636382564
RCB vs GG Live : गुजरातला दुसरा धक्का बसला
गुजरातला दुसरा धक्का बसला
दयालन हेमलथाच्या रूपाने गुजरातला दुसरा धक्का बसला. त्याला कनिका आहुजाने बळी बनवले. चार धावा काढल्यानंतर ती पॅव्हेलियनमध्ये परतली. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी अॅशले गार्डनर ३२ (२५) क्रीजवर आली आहे. तिला साथ देण्यासाठी बेथ मुनी क्रीजवर आहे. ७ षटकानंतर गुजरातची धावसंख्या २ बाद ४९ धावा आहे. कनिकाला विकेट मिळाली.
https://twitter.com/JonahAbraham26/status/1890410562636382564
RCB vs GG Live : गुजरातने पहिली विकेट गमावली, लॉरा वोल्वार्डट बाद
गुजरातने पहिली विकेट गमावली, लॉरा वोल्वार्डट बाद
गुजरातला पहिला धक्का लॉरा वोल्वार्डच्या रूपाने बसला. तिला रेणुका सिंग ठाकूरने बाद केले. तिला फक्त सहा धावा करता आल्या. दयालन हेमलता तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आली. तिला साथ देण्यासाठी बेथ मुनी क्रीजवर आहे.
https://twitter.com/141ovalclassic/status/1890407428358906081
RCB vs GG Live : चार षटकानंतर गुजरातची धावसंख्या बिनबाद ३० धावा
गुजरात जायंट्सने संघाने चार षटकानंतर बिनबाद ३० धावा केल्या आहेत. लॉरा वोल्वार्ड्ट 6 (9) आणि बेथ मूनी 18 (15) धावांवर खेळत आहेत.
RCB vs GG Live : गुजरात जायंट्स दोन षटकानंतर बिनबाद ८ धावा
गुजरात जायंट्सने संघाने दोन षटकानंतर बिनबाद ८ धावा केल्या आहेत. लॉरा वोल्वार्ड्ट 5 (6) आणि बेथ मूनी 7 (6) धावांवर खेळत आहेत.
RCB vs GG Live : गुजरात जायंट्सच्या डावाला सुरुवात
गुजरात जायंट्स संघ प्रथम फलंदाजी करत आहे. त्यांच्या डावाला बेथ मूनी आणि लॉराने सुरुवात केली आहे. रेणुका ठाकुर सिंग आरसीबीसाठी पहिले षटक टाकत आहे.
https://twitter.com/Singhdhakad47/status/1890393362412236963
RCB vs GG Live : पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन -
आरसीबीचा संघ: स्मृती मंधाना (कर्णधार), डॅनिएल वायट, एलिस पेरी, राघवी बिस्ट, रिचा घोष, कनिका आहुजा, जॉर्जिया वेअरहॅम, किम गार्थ, प्रेमा रावत, जोशिता व्हीजे, रेणुका ठाकूर सिंग.
https://twitter.com/wplt20/status/1890397254780875198
गुजरात जायंट्सचा संघ: लॉरा वोल्वार्ड, बेथ मुनी, दयालन हेमलता, अॅशले गार्डनर (कर्णधार), डिआंड्रा डॉटिन, हरलीन देओल, सिमरन शेख, तनुजा कंवर, सायली सातघरे, प्रिया मिश्रा, काशवी.
RCB vs GG Live Updates : आरसीबीचा गोलंदाजीचा निर्णय, गुजरातसाठी पाच खेळाडू पदार्पण करणार
महिला प्रीमियर लीग २०२५ च्या पहिल्या सामन्यात, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची कर्णधार स्मृती मंधानाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हंगामातील पहिल्या सामन्यात गुजरात जायंट्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. गुजरात जायंट्सची कर्णधार अॅशले गार्डनर म्हणाली की, पहिल्या सामन्यात त्यांच्याकडून पाच खेळाडू पदार्पण करत आहेत.
RCB vs GG Live Updates : गुजरात जायंट्स महिला संघ
गुजरात जायंट्स महिला संघ: लॉरा वोल्वार्ड, बेथ मुनी (विकेटकीपर), हरलीन देओल, डिएंड्रा डॉटिन, दयालन हेमलता, अॅशले गार्डनर (कर्णधार), सिमरन शेख, मेघना सिंग, सायली सतघरे, तनुजा कंवर, प्रिया मिश्रा, काशवी गौतम, मन्नत कश्यप, शबनम मोहम्मद शकील, प्रकाशिका नाईक, भारती फुलमाली, फोबी लिचफिल्ड, डॅनियल गिब्सन
RCB vs GG Live Updates : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा महिला संघ
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू महिला संघ:
स्मृती मंधाना (कर्णधार), डॅनिएल व्याट-हॉज, एलिस पेरी, सब्भिनेनी मेघना, रघवी बिस्ट, रिचा घोष (डब्ल्यू), जॉर्जिया वेरेहम, कनिका आहुजा, किम गर्थ, प्रेमा रावत, रेणुका ठाकूर सिंग, हेक्ता ग्रॅथम, सोफलाइन, सोफलाइन, बी. श्रेयंका पाटील, जाग्रवी पवार, आशा शोभना, जोशीथा व्ही.जे
RCB vs GG Live Updates : गुजरात विरुद्ध बंगळुरु सामन्यांमध्ये कोणाचे वर्चस्व?
गुजरात विरुद्ध बंगळुरु सामन्यांमध्ये कोणाचा वरचष्मा राहिलाय आहे?
https://twitter.com/wplt20/status/1890377391593214352
महिला प्रीमियर लीग म्हणजेच WPL मध्ये आतापर्यंत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात जायंट्स यांच्यात एकूण चार सामने खेळले गेले आहेत. या काळात दोन्ही संघांमध्ये समान स्पर्धा दिसून आली. एकूण चार सामन्यांमध्ये, आरसीबी आणि जीजीने प्रत्येकी दोन विजय नोंदवले आहेत. दोघांनीही गेल्या दोन हंगामात प्रत्येकी एक विजय नोंदवला आहे. अशा परिस्थितीत, शुक्रवारी वडोदरा येथील कोटाम्बी स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यात कोणता संघ आपली आकडेवारी सुधारतो हे पाहणे मनोरंजक असेल.
RCB vs GG Live Updates : कोण कोण करणार परफॉर्म?
लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता आयुष्मान खुराना महिला प्रीमियर लीग 2025 च्या उद्घाटन समारंभात मंचावर हजेरी लावण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्यासोबत प्रतिभावान गायिका मधुवनती बागची असेल, जी एका अद्भुत संगीतमय सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करेल. या वर्षीच्या WPL उद्घाटन समारंभाची थीम "शेरोनिया" आहे, जी क्रीडा क्षेत्रातील महिलांच्या ताकद आणि धैर्याचा उत्सव साजरा करते.
RCB vs GG Live Updates : लीगमध्ये एकूण २२ सामने खेळवले जातील
लीगमध्ये एकूण २२ सामने खेळवले जातील
https://twitter.com/wplt20/status/1889951945068257297
दिल्ली कॅपिटल्स यावर्षी कोणतेही सामने आयोजित करणार नाही. गेल्या वर्षी त्यांनी बेंगळुरूच्या सहकार्याने सामने आयोजित केले होते. यावेळी कोणत्याही दिवशी दोन सामने होणार नाहीत, म्हणजेच डबलहेडर होणार नाही. ५ संघांच्या या स्पर्धेत, सर्व संघ एकमेकांविरुद्ध एक सामना खेळतील. या लीगमध्ये एकूण २२ सामने खेळवले जातील. गट फेरीत २० फेब्रुवारी, २३ फेब्रुवारी, २ मार्च, ४ मार्च, ५ मार्च आणि ९ मार्च रोजी कोणतेही सामने होणार नाहीत.
RCB vs GG Live Updates : उद्घाटन समारंभात बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना करणार परफॉर्म
महिला प्रीमियर लीग (WPL) 2025 च्या उद्घाटन समारंभात बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना सादरीकरण करणार आहे. हा समारंभ 14 फेब्रुवारी रोजी वडोदरा येथील कोटाम्बी स्टेडियममध्ये होत आहे. आयुष्मान त्याच्या गायन आणि नृत्याने प्रेक्षकांची मने जिंकण्यासाठी सज्ज आहे.