WPL 2025 GG vs UPW Gujarat Giants beat UP Warriors by 6 wickets : वडोदरा येथील कोटाम्बी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या डब्ल्यूपीएल २०२५ च्या तिसऱ्या सामन्या गुजरात जायंट्सने ऐतिहासिका विजय नोंदवला. गुजरात जायटंस्ने प्रथमच लक्ष्याचा पाठलाग करताना विजय मिळवला. गुजरात जायंट्सने यूपी वॉरियर्सविरुद्ध ६ विकेट्सनी दणदणीत विजय नोंदवला. या सामन्यात उत्तर प्रदेशने प्रथम फलंदाजी करत १४३ धावा केल्या. प्रत्युत्तरात, गुजरात संघाने १२ चेंडू शिल्लक असताना ६ विकेट्सने सामना जिंकला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुजरातच्या विजयात सर्वात मोठे आणि महत्त्वाचे योगदान कर्णधार अ‍ॅशले गार्डनरचे होते, जिने फलंदाजीत ५२ धावा केल्या आणि गोलंदाजीतही २ विकेट्स घेतल्या. यासह गुजरात जायंट्सने लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्यांदाच विजयावर शिक्कामोर्तब केला. या सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधार अ‍ॅशले गार्डनरचा हा निर्णयही बरोबर ठरला.

गुजरातच्या घातक गोलंदाजीसमोर, यूपी वॉरियर्सने ७८ धावांपर्यंत ५ विकेट गमावल्या होत्या. यानंतर कर्णधार दीप्ती शर्मा आणि उमा छेत्री यांच्या २४ धावांच्या खेळीमुळे उत्तर प्रदेश संघाने कसा तरी १४३ धावांचा टप्पा गाठला. गुजरातकडून गोलंदाजी करताना प्रिया मिश्राने कहर केला आणि ३ बळी घेतले. यानंतर १४४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, गुजरात जायंट्सची सुरुवात खराब झाली. कारण बेथ मुनी आणि दयालन हेमलता यांनी २ धावांच्या आतच आपले विकेट गमावले.

मात्र, लॉरा वोल्वार्डने कर्णधार अ‍ॅशली गार्डनरला चांगली साथ दिली, पण वोल्वार्ड २२ धावा करून बाद झाली. गार्डनरने ५२ धावांची अर्धशतकी खेळी केली. त्यानंतर हरलीन देओल आणि डिआंड्रा डॉटिन यांनी शानदार फलंदाजी केली आणि शेवटपर्यंत नाबाद राहिल्या. दोघांमधील ५८ धावांच्या नाबाद भागीदारीमुळे गुजरातचा विजय निश्चित झाला. हरलीनने ३४ धावा केल्या आणि डॉटिनने १८ चेंडूत ३३ धावांची तुफानी खेळी केली. डॉटिनने तिच्या धमाकेदार खेळीत ३ चौकार आणि २ षटकार मारले. यासह गुजरातचा या हंगामातील पहिला विजय ठरला.