WPL 2025 Gujarat Giants vs UP Warriorz Highlights : महिला प्रीमियर लीग २०२५ च्या तिसऱ्या सामन्यात गुजरात जायंट्सने यूपी वॉरियर्सचा ६ गडी राखून पराभव केला. वडोदरा येथील कोटाम्बी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात उत्तर प्रदेशने प्रथम फलंदाजी करत १४३ धावा केल्या. प्रत्युत्तरात, गुजरात संघाने १२ चेंडू शिल्लक असताना ६ विकेट्सने सामना जिंकला. गुजरातच्या विजयात सर्वात मोठे आणि महत्त्वाचे योगदान कर्णधार अॅशले गार्डनरचे होते, ज्याने फलंदाजीत ५२ धावा केल्या आणि गोलंदाजीतही २ विकेट्स घेतल्या. यासह गुजरात जायंट्सने लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्यांदाच विजय नोंदवला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
GG vs UPW WPL 2025 Highlights : महिला प्रीमियर लीग २०२५ च्या तिसऱ्या सामन्यात गुजरात जायंट्सचा ऐतिहासिक विजय मिळवला. गुजरातने प्रथमच लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करताना यूपीला ६ विकेट्सनी धूळ चारली.
महिला प्रीमियर लीग २०२५ च्या तिसऱ्या सामन्यात गुजरात जायंट्सने यूपी वॉरियर्सचा ६ गडी राखून पराभव केला. वडोदरा येथील कोटाम्बी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात उत्तर प्रदेशने प्रथम फलंदाजी करत १४३ धावा केल्या. प्रत्युत्तरात, गुजरात संघाने १२ चेंडू शिल्लक असताना ६ विकेट्सने सामना जिंकला. गुजरातच्या विजयात सर्वात मोठे आणि महत्त्वाचे योगदान कर्णधार अॅशले गार्डनरचे होते, ज्याने फलंदाजीत ५२ धावा केल्या आणि गोलंदाजीतही २ विकेट्स घेतल्या. यासह गुजरात जायंट्सने लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्यांदाच विजय नोंदवला.
? Women's Premier League 2025. ?
— ResilientMindset (@ResiMindset) February 15, 2025
A Thread #WPL2025 #TATAWPL pic.twitter.com/mMlIHbqb60
गुजरातच्या विजयात सर्वात मोठे आणि महत्त्वाचे योगदान कर्णधार अॅशले गार्डनरचे होते, जिने फलंदाजीत ५२ धावा केल्या आणि गोलंदाजीतही २ विकेट्स घेतल्या. यासह गुजरात जायंट्सने लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्यांदाच विजयावर शिक्कामोर्तब केला. या सामन्यात गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधार अॅशले गार्डनरचा हा निर्णयही बरोबर ठरला.
GG vs UPW Live : १७ षटकांनंतर गुजरात जायंट्सची धावसंख्या १३१/४ धावा
१७ षटकांनंतर गुजरात जायंट्सची धावसंख्या १३१/४ आहे. हरलीन देओल २८ धावा काढून खेळत आहे आणि डिएंड्रा डॉटिन २६ धावा काढून खेळत आहे.
१५ षटकांनंतर गुजरात जायंट्सची धावसंख्या ११९/४ धावा आहे. डिएंड्रा डॉटिन २० धावा काढून खेळत आहे आणि हरलीन देओल १७ धावा काढून खेळत आहे.
? & ????. ?#LauraWolvaardt on the move ?#GG 48/2 in 7 overs ?
— ResilientMindset (@ResiMindset) February 16, 2025
#TATAWPL | #GGvUPW |#GGvsUPW |#WPL2025 pic.twitter.com/EKyaG5qFUS
GG vs UPW Live : गुजरात जायंट्सला मोठा झटका! कर्णधार गार्डनर ५२ धावांवर बाद, ताहिलाने घेतली विकेट
गुजरात जायंट्सला मोठा झटका! कर्णधार गार्डनर ५२ धावांवर बाद, ताहिलाने घेतली विकेट
https://twitter.com/Sbettingmarkets/status/1891169067064582573
१२ षटकांनंतर गुजरात जायंट्सची धावसंख्या ८६/४ आहे. डिएंड्रा डॉटिन शून्य धावा काढल्यानंतर खेळत आहे आणि हरलीन देओल १० धावा काढल्यानंतर खेळत आहे. गुजरात जायंट्सना ४७ चेंडूत ६.८९ प्रति षटकाच्या वेगाने ५४ धावांची आवश्यकता आहे. आवश्यक धावगती ७.२५ आहे.
GG vs UPW Live : गुजरात जायंट्सला तिसरा धक्का! लॉरा २२ धावांवर बाद
गुजरात जायंट्सला तिसरा धक्का लॉरातच्या रुपाने बसला. लॉरा २२ धावांवर बाद झाली. त्यामुळे ९ षटकांनंतर गुजरात जायंट्सची धावसंख्या ५९/३ आहे. हरलीन देओल २ धावा काढून खेळत आहे आणि अॅशले गार्डनर ३४ धावा काढून खेळत आहे. गुजरात जायंट्सना ६६ चेंडूत ७.७२ प्रति षटकाच्या सरासरीने ८५ धावांची आवश्यकता आहे. आवश्यक धावगती ७.७२ आहे.
GG vs UPW Live : लॉरा वोल्वार्ड आणि अॅशले गार्डनरची अर्धशतकी भागीदारी
८ षटकानंतर गुजरात जायंट्सची धावसंख्या ५५/२ धावा आहे. लॉरा वोल्वार्ड २१ धावांवर आणि अॅशले गार्डनर ३३ धावांवर खेळत आहे. गुजरात जायंट्सना ७२ चेंडूत ७.३८ प्रति षटकाच्या सरासरीने ८९ धावांची आवश्यकता आहे. आवश्यक धावगती ७.३८ आहे.
दो रन पर ही दो विकेट गंवाने के बाद गुजरात की शानदार वापसी
— ESPNcricinfo हिंदी (@CricinfoHindi) February 16, 2025
एश्ले गार्डनर और लॉरा वुल्फ़ॉर्ट ने किया काउंटर अटैक, आठ ओवर के बाद स्कोर 55/2
लाइव : https://t.co/Ge2qwuo0ai #WPL2025 #GGvsUPW pic.twitter.com/spqk6GPvbi
GG vs UPW Live : गुजरात जायंट्सचे जबरदस्त कमबॅक! कर्णधार गार्डनरने षटकारांची केली बरसात
गुजरात जायंट्सने सामन्यात जबरदस्त कमबॅक केले! कर्णधार अॅशले गार्डनरने षटकारांची केली बरसात करत संघाला ६ षटकांनंतर ४१/२ धावांवर पोहोचवले आहे आहे. लॉरा वोल्वार्ड १८ धावांवर आणि अॅशले गार्डनर २३ धावांवर खेळत आहे. गुजरात जायंट्सना ८४ चेंडूत ७.३५ प्रति षटकाच्या वेगाने १०३ धावांची आवश्यकता आहे. आवश्यक धावगती ७.३५ आहे.
GG vs UPW Live : ४ षटकांनंतर गुजरात जायंट्सची धावसंख्या १५/२ धावा
४ षटकांनंतर गुजरात जायंट्सची धावसंख्या १५/२ धावा आहे. लॉरा वोल्वार्ड ६ धावांवर आणि अॅशले गार्डनर ९ धावांवर खेळत आहे.
GG vs UPW Live : यूपी वॉरियर्सची शानदार गोलंदाजी! गुजरात जायंट्सला अवघ्या २ धावांवर दिले दोन मोठे धक्के
यूपी वॉरियर्सने शानदार गोलंदाजी केली आहे. त्यांनी गुजरात जायंट्सला अवघ्या २ धावांवर दोन मोठे धक्के दिले आहेत. ज्यामुळे गुजरात जायंट्सची धावसंख्या २ षटकानंतर २ बाद ३ धावा आहे. बेथ मूनी आणि दयालन हेमलता खातेही न उघडता बाद झाल्या.
A perfect start with the ball by #UPW ??
— Women's Premier League (WPL) (@wplt20) February 16, 2025
Grace Harris and Sophie Ecclestone producing magic straight away?
Updates ▶ https://t.co/KpTdz5nl8D#TATAWPL | #GGvUPW pic.twitter.com/RUAEEgg1lh
GG vs UPW Live : उत्तर प्रदेशने गुजरातला दिले १४४ धावांचे लक्ष्य, प्रिया मिश्राने घेतल्या तीन विकेट्स
या स्पर्धेतील तिसरा सामना वडोदऱ्यातील कोटाम्बी स्टेडियमवर यूपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात गुजरातचा कर्णधार अॅशले गार्डनरने नाणेफेक जिंकून उत्तर प्रदेशला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले, परंतु दीप्ती शर्माच्या संघाला काही विशेष कामगिरी करता आली नाही. संघाने २० षटकांत नऊ विकेट गमावून १४३ धावा केल्या आहेत. प्रिया मिश्राने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या .
GG vs UPW Live : १७ षटकांनंतर यूपी वॉरियर्सचा स्कोअर ११४/७ धावा
१७ षटकांनंतर यूपी वॉरियर्सचा स्कोअर ११४/७ धावा आहे. अलाना किंग ७ धावांवर आणि सोफी एक्लेस्टोन १ धावांवर खेळत आहे.
GG vs UPW Live : यूपी वॉरियर्सला सर्वात मोठा झटका! कर्णधार दीप्ती शर्मा ३५ धावांवर बाद
यूपी वॉरियर्सला सर्वात मोठा झटका बसला आहे. कर्णधार दीप्ती शर्मा ३५ धावांवर बाद झाली. प्रियाने तिला बाद करत आपली तिसरी विकेट घेतली. आता १५ षटकांनंतर यूपी वॉरियर्सचा स्कोअर १०१/६ आहे. अलाना किंग आणि श्वेता सेहरावत खेळत आहे
GG vs UPW Live : यूपी वॉरियर्सने १३ षटकांनंतर ५ बाद ८९ धावा केल्या
यूपी वॉरियर्सने १३ षटकांनंतर ५ बाद ८९ धावा केल्या आहेत. श्वेता सेहरावत ८ धावांवर आणि दीप्ती शर्मा ३० धावा धावांवर खेळत आहे.
GG vs UPW Live : प्रिया मिश्राने एकाच षटकात यूपी वॉरियर्सला दिले दोन मोठे धक्के
प्रिया मिश्राने एकाच षटकात यूपी वॉरियर्सला दोन मोठे धक्के दिले आहेत. तिने पहिल्यांदा उमा छेत्रीला आणि त्यानंतर ग्रेस हॅरिसला बाद केले . त्यामुळे युपी वॉरियर्सची धावसंख्या ११ षटकानंतर ५ बाद ७९ धावा आहे.
GG vs UPW Live :डिआंड्रा डॉटिनने उमा छेत्रीला दाखवला तंबूचा रस्ता
डिआंड्रा डॉटिनने उमा छेत्रीला दाखवला तंबूचा रस्ता, १० षटकानंतर यूपी वॉरियर्सची धावसंख्या ३ बाद ७४ धावा आहे दीप्ती शर्मा २७ धावांवर खेळत आहे
GG vs UPW Live : ९ षटकांनंतर यूपी वॉरियर्सचा स्कोअर ६४/२ धावा
९ षटकांनंतर यूपी वॉरियर्सचा स्कोअर ६४/२ धावा आहे. उमा छेत्री २१ धावांवर आणि दीप्ती शर्मा २० धावांवर खेळत आहे.
GG vs UPW Live : ७ षटकांनंतर यूपी वॉरियर्सचा स्कोअर ४६/२ धावा
७ षटकांनंतर यूपी वॉरियर्सचा स्कोअर ४६/२ धावा आहे. दीप्ती शर्मा १० धावांवर खेळत आहे आणि उमा छेत्री १३ धावांवर खेळत आहे.
GG vs UPW Live : ५ षटकांनंतर यूपी वॉरियर्सचा स्कोअर ३९/२ धावा
५ षटकांनंतर यूपी वॉरियर्सचा स्कोअर ३९/२ आहे. उमा छेत्री १० धावा काढल्यानंतर खेळत आहे आणि दीप्ती शर्मा ६ धावा काढल्यानंतर खेळत आहे.
GG vs UPW Live : यूपी वॉरियर्सला दुसरा धक्का! किरण नवगिरे पाठोपाठ वृंदा दिनेशही बाद
यूपी वॉरियर्सला दुसरा धक्का बसला आहे. किरण नवगिरे पाठोपाठ वृंदा दिनेशही बाद ६ धावा काढून बाद झाली आहे. ३ षटकांनंतर यूपी वॉरियर्सचा स्कोअर २६/२ आहे. दीप्ती शर्मा ४ धावा काढल्यानंतर खेळत आहे आणि उमा छेत्रीने अजून खाते उघडले नाही.
GG vs UPW Live : यूपी वॉरियर्सला डिएंड्रा डॉटिनने दिला पहिला झटका! किरण नवगिरे १५ धावांवर बाद
यूपी वॉरियर्सला डिएंड्रा डॉटिनने पहिला झटका दिला किरण नवगिरे १५ धावांवर करुन बाद झाली. २ षटकांनंतर यूपी वॉरियर्सचा स्कोअर २२/१ आहे. वृंदा दिनेश ६ धावांवर खेळत आहे.
https://twitter.com/zafarlakarmar/status/1891129434389782680
GG vs UPW Live : यूपी वॉरियर्सच्या डावाला दमदार सुरुवात! किरण नवगिरेची पहिल्याच षटकात फटकेबाजी
एका षटकानंतर यूपी वॉरियर्सची धावसंख्या १०/० धावा आहे. किरण नवगिरे ९ धावा काढल्यानंतर खेळत आहेत आणि वृंदा दिनेश १ धाव काढल्यानंतर खेळत आहेत.
GG vs UPW Live : जीजी-डब्ल्यू विरुद्ध यूपी-डब्ल्यू हेड-टू-हेड रेकॉर्ड
जीजी-डब्ल्यू विरुद्ध यूपी-डब्ल्यू हेड-टू-हेड रेकॉर्ड
#GGVsUPW Captions:
— CaptionWala | 10k+ Insta Captions (@captionwala) February 16, 2025
– After a tough loss, can Gujarat Giants roar back against UP Warriorz?
– New season, new captain! Deepti Sharma leads UP Warriorz against Gujarat Giants in their WPL 2025 opener. Who’s taking the W?
– UP Warriorz face Gujarat Giants in WPL 2025. Kon jeetega? pic.twitter.com/PQ1B3BQKVE
गुजरात जायंट्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात WPL मध्ये चार वेळा सामना झाला आहे, ज्यामध्ये यूपी वॉरियर्सने तीन विजयांसह प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व गाजवले आहे तर गुजरात जायंट्सना फक्त एक विजय मिळवता आला आहे.
GG vs UPW Live : गुजरातने नाणेफेक जिंकून यूपीला फलंदाजीसाठी केले आमंत्रित
गुजरातने नाणेफेक जिंकून यूपीला फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे.
? Toss Update ?@Giant_Cricket win the toss & elect to bowl against @UPWarriorz
— Women's Premier League (WPL) (@wplt20) February 16, 2025
Updates ▶ https://t.co/KpTdz5nl8D#TATAWPL | #GGvUPW pic.twitter.com/ZLnYidyV9M
गुजरात जायंट्स (प्लेइंग इलेव्हन)- बेथ मुनी (विकेटकीपर), लॉरा वोल्वार्ड्ट, डायलन हेमलथा, अॅशले गार्डनर (कर्णधार), डिएंड्रा डॉटिन, सिमरन शेख, हरलीन देओल, तनुजा कंवर, सायली सतघरे, प्रिया मिश्रा, काश्वी गौतम
यूपी वॉरियर्स (प्लेइंग इलेव्हन)- उमा छेत्री (यष्टीरक्षक), किरण नवगिरे, वृंदा दिनेश, ग्रेस हॅरिस, दीप्ती शर्मा (कर्णधार), ताहलिया मॅकग्रा, सोफी एक्लेस्टोन, अलाना किंग, श्वेता सेहरावत, साईमा ठाकोर, क्रांती गौर.
GG vs UPW Live : यूपी वॉरियर्स दीप्ती शर्माच्या नेतृत्वाखाली उतरणार
यूपी वॉरियर्स दीप्ती शर्माच्या नेतृत्वाखाली उतरणार
दुसरीकडे, यूपी वॉरियर्स भारताच्या नवीन कर्णधार दीप्ती शर्माच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरेल. कारण त्यांची नियमित कर्णधार एलिसा हीलीने सततच्या दुखापतींमुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे. दीप्ती सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा एक महत्त्वाचा भाग आहे, पण २७ वर्षीय दीप्तीने कधीही भारताचे नेतृत्व केलेले नाही.
WPL 2025 GG vs UPW Live : खराब क्षेत्ररक्षणामुळे गुजरातचा पराभव
खराब क्षेत्ररक्षणामुळे गुजरातचा पराभव
गुजरात जायंट्सच्या तनुजा कंवरनेही एलिस पेरीचा झेल सोडला जेव्हा ती दोन धावांवर फलंदाजी करत होती. ऑस्ट्रेलियन खेळाडूनेही याचा पुरेपूर फायदा घेतला आणि ३४ चेंडूत ५७ धावा करून बंगळुरूच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या फलंदाजांची कामगिरी गुजरात जायंट्ससाठी दिलासादायक होती. भारताकडून माजी कर्णधार बेथ मुनी (५६) आणि अॅशले गार्डनर (नाबाद ७९) यांनी अर्धशतके झळकावली.
गुजरात जायंट्स आणि यूपी वॉरियर्सचा संघ –
गुजरात जायंट्स: अॅशले गार्डनर (कर्णधार), भारती फुलमाली, लॉरा वोल्वार्ड्ट, फोबी लिचफिल्ड, सिमरन शेख, डॅनिएल गिब्सन, दयालन हेमलता, डिआंड्रा डॉटिन, हरलीन देओल, सायली सतघरे, तनुजा कंवर, बेथ मुनी (यष्टीरक्षक), काशवी गौतम, मन्नत कश्यप, मेघना सिंग, प्रकाशिका नाईक, प्रिया मिश्रा, शबनम शकील.
Coming up ?
— Women's Premier League (WPL) (@wplt20) February 16, 2025
UP Warriorz start their #TATAWPL 2025 campaign against Gujarat Giants tonight ?
Another thriller loading? ⏳#GGvUPW | @UPWarriorz | @Giant_Cricket pic.twitter.com/pqCZcphjnr
यूपी वॉरियर्स: दीप्ती शर्मा (कर्णधार), आरुषी गोयल, किरण नवगिरे, श्वेता सहरावत, वृंदा दिनेश, चामारी अटापट्टू, चिनेल हेन्री, ग्रेस हॅरिस, क्रांती गौर, पूनम खेमनार, सोफी एक्लेस्टोन, ताहलिया मॅकग्रा, उमा छेत्री (यष्टीरक्षक), एलाना किंग, अंजली सरवानी, गौहर सुलताना, राजेश्वरी गायकवाड, साईमा ठाकोर.