WPL 2025 Mumbai Indians vs Delhi Capitals Highlights : महिला प्रीमियर लीग २०२५ मधील श्वास रोखून धरायला लावणाऱ्या दुसऱ्या सामन्यात दिल्लीने मुंबईव शानदार विजय मिळवला. दिल्लीने शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या सामन्यात मुंबईच्या तोंडातून विजय हिसकावून घेत मोहिमेची चांगली सुरुवात केली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईने १९.१ षटकांत १० गडी गमावून १६४ धावा केल्या. प्रत्युत्तरात, दिल्लीने २० षटकांत आठ गडी गमावून १६५ धावा केल्या आणि सामना दोन गडी राखून जिंकला.
MI vs DC WPL 2025 Highlights : शनिवारी डब्ल्यूपीएल २०२५ च्या दुसऱ्या सामन्यात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्त्वाखालील मुंबई आणि मेग लॅनिंगच्या नेतृत्त्वाखालील दिल्लीचा संघ आमनेसामने आले होते. या रोमांचक सामन्यात शेवटच्या चेंडूवर मेग लॅनिंगच्या संघाने बाजी मारली.
WPL 2025 MI vs DC Live : मुंबईचा संघ अनुभवी खेळाडूंनी भरलेला
मुंबईचा संघ अनुभवी खेळाडूंनी भरलेला –
मुंबईकडे हरमनप्रीत कौरच्या रूपात अनुभवी कर्णधार आणि फलंदाज आहे. तिच्या संघात नॅट सायव्हर-ब्रंट (इंग्लंड), हेली मॅथ्यूज (वेस्ट इंडिज), अमेलिया केर (न्यूझीलंड) तसेच दक्षिण आफ्रिकेच्या नादिन डी क्लार्क, शबनीम इस्माइल आणि क्लोई ट्रायॉन यासारख्या काही कुशल परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.
1⃣ Frame ?
— Women's Premier League (WPL) (@wplt20) February 15, 2025
2⃣ ICC U19 Women’s T20 World Cup-winning Indian Captains ?
A special union at the #TATAWPL, ft. Shafali Verma & Niki Prasad ? ? – By @ameyatilak & @jigsactin
Watch ? ? @DelhiCapitals | @TheShafaliVerma
मुंबई आणि दिल्लीची मागील हंगामातील कामगिरी
A mega clash on the horizon! ??
— Women's Premier League (WPL) (@wplt20) February 15, 2025
Mumbai Indians and Delhi Capitals are ready to begin their #TATAWPL 2025 campaigns! ?#MIvDC | @mipaltan | @DelhiCapitals pic.twitter.com/9s7k9auZbp
मुंबई आणि दिल्ली दोन्ही संघांनी पहिल्या दोन स्पर्धांमध्ये बाद फेरीत प्रवेश केला होता. स्पर्धेच्या दुसऱ्या आवृत्तीच्या एलिमिनेटरमध्ये मुंबईला बाहेर जावे लागले तर अंतिम सामन्यात दिल्लीला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पराभव पत्करावा लागला.
MI vs DC Live : दिल्ली कॅपिटल्स महिला संघ
दिल्ली कॅपिटल्स महिला –
अॅलिस कॅप्सी, मेग लॅनिंग (कर्णधार), सारा ब्राइस, अॅनाबेल सदरलँड, मिन्नू मणी, शेफाली वर्मा, अरुंधती रेड्डी, एन चरणी, शिखा पांडे, जेमिमा रॉड्रिग्ज, नंदिनी कश्यप, स्नेहा दीप्ती, जेस, जोनासेन, निकी प्रसाद, तानिया भाटिया (यष्टीरक्षक), मार्चिझान कॅप, राधा यादव, तीतस साधू.
MI vs DC Live : मुंबई इंडियन्स महिला संघ
मुंबई इंडियन्स महिला संघ –
हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमेलिया केर, अमनजोत कौर, सजीवन सजना, शबनीम इस्माईल, कीर्थना बालकृष्णन, साईका इशाक, जिंतीमणी कलिता, क्लोई ट्रायॉन, पारुनिका सिसोदिया, अमनदीप कौर, जी कमलिनी, संस्कृती गुप्ता, अक्षिता माहेश्वरी, नदीन डी क्लार्क.