WPL 2025 GG vs MI Match Result : मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सवर ५ विकेट्सनी विजय मिळवत डब्ल्यूपीएल २०२५ मधील विजयाचे खाते उघडले. या सामन्यात मुंबई इंडियन्स नाणेफेक जिंकून गुजरात जायंट्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यानंतर मुंबई इंडियन्स गुजरात १२० धावांवर गारद केले. गुजरातसाठी हरलीने सर्वाधिक धावांचे योगदान दिले. तसेच मुंबईकडून हेली मॅथ्यूजने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. मुंबईने १६.१ षटकांत ५ गडी गमावून नॅट सिव्हर ब्रंटच्या अर्धशतकाच्या जोरावर १२२ धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केला. यासह मुंबईने डब्ल्यूपीएलमधील इतिहासातील गुजरातविरुद्ध सलग पाचवा विजय नोंदवला आहे.
हा सामना वडोदऱ्यातील कोटाम्बी स्टेडियमवर खेळला गेला, ज्यामध्ये मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईचा निर्णय योग्य ठरला. कारण गुजरातने ४३ धावा केल्या तोपर्यंत त्यांचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता. बेथ मूनी, लॉरा वोल्वार्ड आणि अॅशले गार्डनर सारख्या मोठ्या खेळाडू मुंबईच्या घातक गोलंदाजीला बळी पडल्या. एकेकाळी गुजरातने ७९ धावांवर ७ विकेट गमावल्या होत्या. येथून, हरलीन देओल आणि तनुजा कंवर यांनी मिळून गुजरातचा स्कोअर १०० च्या पुढे नेला.
यंदाच्या हंगामातील मुंबई इंडियन्सचा पहिला विजय –
मुंबई इंडियन्सच्या हेली मॅथ्यूजने या हंगामात पहिल्यांदाच पर्पल कॅपवर दावा केला आहे. मॅथ्यूजने डब्ल्यूपीएल २०२५ च्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या तिच्या पहिल्या सामन्यात २ विकेट्स घेतल्या होत्या. आता तिने गुजरात जायंट्सविरुद्ध ३ विकेट्स घेत पर्पल कॅपवर दावा आहे. तिने या हंगामात आतापर्यंत ५ विकेट्स घेतल्या आहेत आणि सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत रेणुका ठाकूरची बरोबरी केली आहे. पण इतर आकडेवारीच्या आधारे, मॅथ्यूज पुढे आहे. डब्ल्यूपीएलच्या पहिल्या हंगामातील विजेत्या मुंबई इंडियन्सला डब्ल्यूपीएल २०२५ मधील पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध २ विकेट्सनी पराभव पत्करावा लागला होता. सध्या तो हंगामातील त्याच्या पहिल्या विजयाच्या शोधात आहे.
नॅट सिव्हर ब्रंटच्या अर्धशतकाच्या जोरावर मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सचा पाच विकेट्सने पराभव केला. मंगळवारी वडोदरा येथील कोटाम्बी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरातला २० षटकांत १० गडी गमावल्यानंतर केवळ १२० धावा करता आल्या. प्रत्युत्तरात, मुंबईने १६.१ षटकांत पाच गडी गमावून १२२ धावा केल्या आणि २३ चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला.
मुंबई संघ पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचला –
या विजयासह मुंबई संघ पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्यांचा नेट रन रेट ०.७८३ पर्यंत वाढला आहे तर गुजरात जायंट्स तीन सामन्यांत एक विजय आणि दोन पराभवांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याचा नेट रन रेटही -०.५२५ झाला आहे. सध्या, स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ अव्वल स्थानावर आहे, त्यांनी आतापर्यंत खेळलेले दोन्ही सामने जिंकले आहेत. दिल्ली आणि यूपी वॉरियर्स अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.