Royal Challengers Bangalore beat Delhi Capitals by 8 wickets in WPL 2025 : आरसीबीने महिला प्रीमियर लीग २०२५ मध्ये सलग दुसरा विजय नोंदवला आहे. सोमवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात बंगळुरू कर्णधार स्मृती मंधानाच्या वादळी खेळीच्या जोरावर
दिल्ली कॅपिटल्सचा ८ गडी राखून पराभव केला. त्याचबरोबर सलग पाचवा विजय मिळवत मुंबई इंडियन्सच्या विक्रमाची बरोबरी केली. वडोदरा येथील कोटाम्बी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात दिल्ली संघाने प्रथम फलंदाजी करत १४१ धावा केल्या, प्रत्युत्तरात आरसीबीने २२ चेंडू शिल्लक असताना दिल्लीचा पराभव केला.
या सामन्यात आरसीबीची कर्णधार स्मृती मंधानाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो योग्य ठरला. दिल्लीने शफाली वर्माची विकेट लवकर गमावली पण मेग लॅनिंग आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांच्या ५९ धावांच्या भागीदारीने दिल्लीला चांगली सुरुवात करून दिली. रॉड्रिग्जने ३४ धावा केल्या, पण त्यानंतर संघाला मोठ्या भागीदारी रचण्यात संघर्ष करावा लागला. सारा ब्राइसने शेवटच्या षटकांमध्ये २३ धावा करून दिल्ली कॅपिटल्सना १४१ धावांचा सन्मानजनक आकडा गाठण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. रेणुका आणि जॉर्जिया यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या. तसेच किम गार्थ आणि एकता बिश्त यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
स्मृती-डॅनियलची १०७ धावांची विक्रमी भागीदारी –
दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध लक्ष्याचा पाठलाग करताना चांगली सुरुवात केली आहे. कर्णधार स्मृती मंधाना आणि डॅनियल यांनी आरसीबीला चांगली सुरुवात करून दिली. दोन्ही फलंदाजांनी पहिल्या विकेटसाठी १०७ धावांची भागीदारी केली. ही डब्ल्यूपीएलमध्ये दिल्लीविरुद्ध कोणत्याही विकेटसाठीची सर्वोच्च भागीदारी आहे. मंधानाने अर्धशतक झळकावले तर डॅनिएल अर्धशतक झळकावू शकली नाही आणि ३३ चेंडूत सात चौकारांसह ४२ धावा काढल्यानंतर बाद झाली. स्मृतीने ४७ चेंडूत ८१ धावांची खेळी साकारली, ज्यामध्ये १० चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता.
आरसीबीने दिल्लीला बराच काळ विकेट मिळू दिली नाही, परंतु अरुंधती रेड्डीने डॅनियलला बाद करून ही भागीदारी मोडली. डॅनियल बाद झाल्यानंतरही, मंधानाने तिची शानदार खेळी सुरू ठेवली, ज्यामुळे आरसीबी चांगल्या स्थितीत आली. १४ षटकांत आरसीबीने १ बाद १३२ धावा केल्या आहेत आणि विजयासाठी ३६ चेंडूत ११ धावांची आवश्यकता आहे. यानंतर पेरी (७) आणि घोष (११) यांनी नाबाद राहत आरसीबी १६.२ षटकात विजय मिळवून दिला.
स्मृती मंधानाने केला कहर –
स्मृती मंधाना टी-२० सामन्यांमध्ये धुमाकूळ घालत आहे. तिने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ८१ धावांची खेळी खेळली. गुजरात जायंट्सविरुद्ध फक्त ९ धावा काढल्यानंतर ती बाद झाली होती, पण टी-२० सामन्यांमध्ये तिचा फॉर्म इतका चांगला आहे की तिने गेल्या ६ टी-२० डावांमध्ये ३२४ धावा केल्या आहेत, ज्यात चार अर्धशतकांचा समावेश आहे.