महिला प्रीमियर लीग २०२३ साठी मुंबईत लिलावाला सुरुवात झाली आहे. या लिलावासाठी ४०९ खेळाडूंची निवड करण्यात आली असून, त्यापैकी संघ जास्तीत जास्त ९० खेळाडूंना आपल्या संघात समाविष्ट करेल. या लिलावात सर्वात पहिल्यांदा स्मृती मंधानाला बोली लागली. भारताची सलामीवीर स्मृती माधना हिच्यावरून मुंबई इंडियन्स आणि आरसीबी यांच्यात युद्ध रंगले होते. ५० लाखांच्या मूळ किंमतीनंतर दोघांनी खेळाडूवर मोठा सट्टा खेळला. परंतु अखेर आरसीबीने तिला ३ कोटी ४० लाख रुपयांना विकत घेतले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय टी-२० संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना महिला आयपीएलच्या पाचही फ्रँचायझींच्या रडारवर होती. कारण ती अनेक भूमिका साकारू शकते. ती फलंदाजीसोबतच कर्णधारपदही करू शकते. ती जगभरातील महिला क्रिकेट लीगमध्ये खेळली आहे. यामध्ये बिग बॅश आणि वूमन हंड्रेडचा समावेश आहे.

ती टी-२० फॉरमॅटची दमदार खेळाडू आहे. गेल्या वर्षी वूमन हंड्रेडमध्ये २०० धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये मंधानाचा १५२ चा स्ट्राईक रेट हा दुसरा सर्वोत्तम ठरला. अशा परिस्थितीत लिलावात तिच्यावर पैशांचा पाऊस पडला.

एक संघ जास्तीत जास्त १८ खेळाडू खरेदी करू शकतो –

महिला आयपीएलमध्ये सहभागी होणारी प्रत्येक फ्रँचायझी जास्तीत जास्त १८ खेळाडू आणि किमान 15 खेळाडू खरेदी करू शकते. या लिलावात ३० परदेशी खेळाडूंसह जास्तीत जास्त ९० खेळाडू विकले जाण्याची शक्यता आहे.