Who is Simran Sheikh Costliest Uncapped player in WPL Auction 2025: महिला प्रीमियर लीग २०२५ साठीचा लिलाव रविवारी १५ डिसेंबरला पार पडला. या लिलावात भारताची अनकॅप्ड खेळाडू सिमरन शेख ही सर्वात महागडी खेळाडू ठरली. फ्रँचायझीने WPL 2025 च्या लिलावात सिमरन शेखवर बोली लावण्यासाठी तिजोरी रिती केली. WPL 2025 च्या लिलावात ती सर्वात महागडी खेळाडू होती, तिला गुजरात जायंट्सने १.९० कोटी रुपयांची बोली लावून संघात सामील केले.

कोण आहे सिमरन शेख?

मुंबईतील धारावीच्या झोपडपट्टीतून बाहेर पडून क्रिकेटमध्ये नाव कमावणारी सिमरन गेल्या वर्षी यूपी वॉरियर्समध्ये सामील झाली होती. सिमरनने अलीकडेच महिला चॅलेंजर ट्रॉफीमध्ये २०० च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या होत्या. दहावीत नापास झाल्यानंतर सिमरनने शिक्षण सोडलं आणि त्यानंतर तिने क्रिकेटवर लक्ष केंद्रित केले. २२ वर्षीय सिमरन शेखला यूपी वॉरियर्सने आयपीएल २०२३ मध्ये १० लाख रुपयांना करारबद्ध केले होते. ती अष्टपैलू खेळाडू आहे.

bmc fixed deposits reduce by 10 thousand crore in current financial year
मुदतठेवींमध्ये १० हजार कोटींची घट; पालिकेचा राखीव निधी ९१ हजार कोटींवरून ८१ हजार कोटींवर
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Tuljapur Temple Vikas Arakhada loksatta news
२१०० कोटींचा तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखडा मान्यतेसाठी मुख्यमंत्र्यांकडे सादर, आमदार पाटील यांची माहिती
Indian Railway Highest Revenue Generating Train
Indian Railways : ‘ही’ आहे भारतातील सर्वात श्रीमंत ट्रेन! कमाई १,७६,०६,६६,३३९; वंदे भारत, शताब्दी एक्सप्रेसलाही टाकले मागे
Image of a woman trainer in a gym or swimming pool
Women Trainers In Gym : जिम, जलतरण तलावांमध्ये महिला प्रशिक्षक बंधनकारक, प्रशासनाने उचलले मोठे पाऊल
Problems faced by disabled passengers due to lack of online railway ticket purchase facility
ऑनलाइन रेल्वे तिकीट खरेदीची सुविधा नसल्याने अडचणी; अपंग प्रवाशांची रांगेत परवड
Image of insurance policy
ते पैसे कोणाचे? २० हजार कोटींच्या विमा रकमेवर कोणीच करेना दावा, IRDAI ने दिली माहिती
Mahakumbh Mela is held at Prayagraj rail innovative initiative launched to simplify ticketing process
कुंभमेळ्याला गेलेल्या प्रवाशांना कर्मचाऱ्यांच्या जॅकेटवरून मिळणार रेल्वेचे तिकीट

हेही वाचा – IND vs AUS: पुन्हा मंकीगेट प्रकरण? जसप्रीत बुमराहवर महिला कमेंटेटरने केली वर्णभेदात्मक टिप्पणी, गाबा कसोटीत नव्या वादाला फुटलं तोंड

सिमरन शेखचे वडील हे वायरमन आहेत. सिमरनच्या वडिलांच्या पगारात ११ जणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं तिचे वडिल जाहिद आणि आई अख्तारी बनो यांच्यासाठी मोठी कसरत होती. सिमरन ही आठ भावंडांमधील तिसरी मुलगी आहे. तिला ४ बहिणी आणि ३ भाऊ आहेत. सिमरनने लिलावात लागलेल्या मोठ्या बोलीच्या रकमेचा फायदा कुटुंबासाठी करावा असं सांगितलं आहे.

हेही वाचा – SMAT 2024: रजत पाटीदार तिसऱ्या पंचांच्या निर्णयावर वैतागला, मैदान सोडण्यास दिला नकार; माफी मागत पंचांनी बदलला निर्णय

सिमरन शेख या लिलावात १० लाख रुपयांच्या मूळ किंमतीसह उतरली होती. तिला तिच्या मूळ किमतीपेक्षा १९ पट अधिक रक्कम मिळाली. गुजरात जायंट्सने लिलावात वेस्ट इंडिजची स्टार अष्टपैलू डिआंड्रा डॉटिन आणि सिमरन यांना विकत घेऊन आपला अष्टपैलू विभाग मजबूत केला. सिमरन सध्या अहमदाबादमध्ये असून ती महिला वनडे ट्रॉफीमध्ये मुंबई संघाचे प्रतिनिधीत्त्व करत आहे.

हेही वाचा – हेड-स्मिथच्या शतकाने भारताला गाबा कसोटीत टाकलं बॅकफूटवर, ऑस्ट्रेलियाने पहिल्याच डावात उभारला धावांचा डोंगर

२०२३ मध्ये अनसोल्ड राहिलेल्या सिमरनने लिलावातील महागडी खेळाडू ठरल्यानंतर इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं की, हा आनंद व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे पुरेसे शब्द नाहीत. लिलावाच्या आदल्या रात्रीपर्यंत मी हिच आशा करत होती की एखाद्या तरी फ्रँचायझीने मला संघात सामील करावं. लिलावात गुजरात जायंट्सने मला संघात सामील केल्यानंतर एकमागून एक कॉल येत आहेत. एक काळ असा होता की क्रिकेट किट घेण्यासाठी खूप कष्ट करावे लागत होते. पण मी आज जे काही मिळवलं आहे ते फक्त क्रिकेटमुळे आहे आणि यानंतर मी आता अजून जास्त मेहनत करेन.

Story img Loader