महिला प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी सध्या मुबईच्या वांद्रे कुर्ला संकूल येथे खेळाडूंचा लिलाव सुरू आहे. या लिलावात तब्बल ४४८ महिला खेळाडू पात्र ठरले आहेत. मुंबई, दिल्ली, गुजरात, लखनौ आणि बंगळुरू असे पाच संघ महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वात सहभागी होणार आहेत. हे संघ खेळाडूंच्या लिलावात सहभागी झाले आहेत. या लिलावात आतापर्यंत भारताची स्टार क्रिकेटपटू स्मृती मंधाना, अ‍ॅश्ले गार्डनर आणि नॅट शिवर यांच्यावर सर्वाधिक बोली लागली आहे. स्मृती मंधानासाठी बँगलोरने ३.४० कोटी रुपये मोजले, तर अ‍ॅश्ले गार्डनरसाठी गुजरातने सर्वात मोठी ३.२० कोटी रुपयांची बोली लावली. त्यापाठोपाठ नॅट शिवरसाठी मुंबईने ३.२० कोटी रुपयांची बोली लावली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई इंडियन्सने भारताची कर्णधार हमनप्रीतवर १.८० कोटी रुपयांची बोली लावत तिला आपल्या संघात सामील करून घेतलं. दरम्यान, मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्स हिच्यासाठी देखील सर्व फ्रेंचायझी उत्सूक दिसल्या. जेमिमाची बेस प्राईस ५० लाख रुपये इतकी होती. तिला आपल्या संघात घेण्यासाठी लखनौ आणि दिल्लीच्या संघात बोली युद्ध रंगलं होतं. अखेर हे बोली युद्ध दिल्ली कॅपिटल्सने जिंकलं. दिल्ली कॅपिटल्सने जेमिमावर २.२० कोटी रुपयांची बोली लावत तिला आपल्या संघात सहभागी करून घेतलं.

हे ही वाचा >> आली रे! भारताची कर्णधार हरमनप्रीतसाठी मुंबई इंडियन्सने मोजले ‘इतके’ कोटी

कशी आहे जेमिमाची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द?

२२ वर्षीय जेमिमा ही तिच्या आक्रमक फटकेबाजी आणि चपळ क्षेत्ररक्षणासाठी प्रसिद्ध आहे. जेमिमाने आतापर्यंत २१ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. यात तिने ३ अर्धशतकांसह ३९४ धावा जमवल्या आहेत. तर टी-२० क्रिकेटमध्ये तिने आपलं नाणं खणखणीत वाजवलं आहे. ७६ टी-२० सामन्यांच्या ६६ डावांमध्ये तिने १० अर्धशतकांसह १,६२८ धावा फटकावल्या आहेत.