महिला प्रीमियर लीगचा पहिला मेगा लिलाव सोमवारी संपन्न झाला. या लिलावात एकूण पाच संघांनी सुमारे ६० कोटी रुपये खर्च करून ८७ खेळाडूंना खरेदी केले. जगात सध्या अनेक क्रिकेट लीग सुरू आहेत, ज्या महिलांसाठी आहेत. पण प्रत्येकजण महिला प्रीमियर लीगची वाट पाहत होता, कारण भारताच्या क्रिकेट बाजारात पैशांचा पाऊस पडतो आणि तसे घडले. १३ फेब्रुवारी हा दिवस क्रिकेट जगतासाठी ऐतिहासिक ठरला. या दिवशी मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये महिला प्रीमियर लीग (WPL) च्या पहिल्या सत्राचा लिलाव झाला. मार्की स्पर्धेसाठी एकूण ४४८ महिला खेळाडूंची निवड करण्यात आली होती, त्यापैकी एकूण ९२ खेळाडूंना बोली लागली.
भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौर हिला मुंबई इंडियन्स (MI) ने ₹१.८० कोटींमध्ये करारबद्ध केले, तर RCB ने लिलावात भारताची उपकर्णधार मानधना नंतर ऑस्ट्रेलियाच्या एलिस पेरीवर स्वाक्षरी केली. महिला प्रीमियर लीगच्या लिलावात बंगळुरूचा खर्च पाहता चाहत्यांनी सोशल मीडियावर एक नवीन मोहीम सुरू केली आहे. महिला आयपीएल आणि पाकिस्तान क्रिकेट लीग (पाकिस्तान सुपर लीग) यांची तुलना करून लोकांनी बाबर आझमला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
बाबर आझमपेक्षा स्मृती मंधानाचा पगार दुप्पट
पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझम जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे. पाकिस्तान सुपर लीगमध्ये तो सध्या पेशावर झल्मीकडून खेळत आहे आणि त्याला प्रत्येक मोसमात १.५० लाख डॉलर मिळत आहेत, पाकिस्तानी रुपयानुसार ही रक्कम ३.६० कोटींच्या पुढे जाते पण भारतीय रुपयात हि रक्कम मोजली तर ती १.५० कोटींपेक्षा कमी आहे. त्याच वेळी, भारताच्या स्मृती मंधानाला महिला प्रीमियर लीगमध्ये प्रति हंगाम ३.४० कोटी रुपये मिळत आहेत. तिला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने विकत घेतले असून ती या संघाची कर्णधारही बनू शकते. महिला प्रीमियर लीगमध्ये ७ खेळाडू आहेत, ज्यांची किंमत २ कोटी किंवा त्याहून अधिक आहे. यातील तीन खेळाडूंना तीन कोटींहून अधिक रक्कम मिळाली आहे.
महिला प्रीमियर लीगमधील संघांचे बजेट फक्त १२ कोटी रुपये होते, अशा परिस्थितीत कोणत्याही एका खेळाडूसाठी ३ कोटी रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम मिळणे ही मोठी गोष्ट आहे कारण ती संघाच्या ३० टक्क्यांहून अधिक आहे. बजेट त्यामुळेच महिला प्रीमियर लीग ऐतिहासिक मानली जात आहे.
एका चाहत्याने ट्विट केले, “स्मृती मंधानाचा डब्ल्यूपीएल पगार आता बाबर आझमच्या पीएसएल पगारापेक्षा जास्त आहे. आणखी एका ट्विटर युजरने लिहिले, “पीएसएलमध्ये बाबर आझमची किंमत २.३० कोटी. स्मृती मंधाना ३.४ कोटी आणि ते पीएसएलची आयपीएलशी तुलना करतात. #WPLAuction #WomensIPL रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने त्यांच्या पर्समधील जवळपास ५०% पैसे (INR 12 कोटी) तीन मुख्य खेळाडूंवर खर्च केले.
महिला प्रीमियर लीगमध्ये सर्वात महाग कोण विकले गेले?
स्मृती मंधाना – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, ३.४० कोटी (भारत)
अॅशले गार्डनर – गुजरात जायंट्स, ३.२० कोटी (ऑस्ट्रेलिया)
नेटल स्कायव्हर – मुंबई इंडियन्स, ३.२० कोटी (इंग्लंड)
दीप्ती शर्मा – यूपी वॉरियर्स, २.६० कोटी (भारत)
जेमिमाह रॉड्रिग्स – दिल्ली कॅपिटल्स, २.२० कोटी (भारत)
बेथ मुनी – गुजरात जायंट्स, २ कोटी (ऑस्ट्रेलिया)