Vinesh Phogat News : आज ऑलिम्पिक स्पर्धेत विनेश फोगाट अपात्र ठरली. ५० किलो वजनी गटात तिचा सामना होणार होता. मात्र वजन ५० किलो १५० ग्रॅम भरल्याने विनेशला अपात्र ठरवण्यात आलं. तिच्यासाठी महिला मल्ल आणि तिची मैत्रीण साक्षी मलिकने महत्त्वाचं आवाहन केलं आहे. विनेश फोगटला रौप्य पदक द्या अशी मागणी आता साक्षी मलिकने केली आहे. तिची ही भावनिक पोस्ट आता चर्चेत आली आहे.

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत नेमकं काय घडलं?

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताला चौथं पदक निश्चित झालंय असं वाटत असतानाच एक वाईट बातमी येऊन धडकली. कुस्तीत महिलांच्या ५० किलो वजनी गटात कुस्तीपटू विनेश फोगट (Vinesh Phogat ) हिला ऑलिम्पिक स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आले आहे. या मोठ्या निर्णयामागचे कारण म्हणजे ५० किलो वजनी गटाच्या सुवर्णपदकाच्या लढतीपूर्वी तिचे वजन वाढले होते. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार विनेशचे (Vinesh Phogat) वजन जास्त होते. त्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आले आहे, ज्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. कुस्तीपटूचे वजन मर्यादेपेक्षा अंदाजे १५० ग्रॅम जास्त आहे, ज्यामुळे तिला अपात्र ठरवलं आहे. मात्र वजन कमी करण्यासाठी विनेशने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र अखेर तिला अपात्रतेची कारवाई सहन करावी लागली. यानंतर आता साक्षी मलिकने तिच्यासाठी खास पोस्ट केली आहे.

Ajit Pawar On Chhagan Bhujbal
Ajit Pawar : छगन भुजबळांच्या नाराजीवर अजित पवारांचं मोठं भाष्य; म्हणाले, “थोडसं थांबायला सांगितलं तर काहींनी…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Manohar Sapre from Chandrapur Marathi cartoonist
चंद्रपूरचे मनोहर सप्रे
Sharad Pawar
“…तोवर शांत बसणार नाही”, संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून शरद पवारांचा मस्साजोगमधून सरकारला इशारा
Sharad Pawar
“राज्यात दहशतीचं वातावरण, कृपा करा अन्…”, शरद पवारांकडून मस्साजोगच्या ग्रामस्थांना धीर; म्हणाले, “आता आपण सगळ्यांनी…”
Sonakshi Sinha hits back at Mukesh Khanna
मुकेश खन्ना यांचा शत्रुघ्न सिन्हांच्या संस्कारावर प्रश्न; भडकलेली सोनाक्षी सिन्हा म्हणाली, “यापुढे काही बोलाल…”
What Sadabhau Khot Said?
Sadabhau Khot : सदाभाऊ खोत यांची खंत; “आम्ही तीन पक्षांचं शेत नांगरून दिलं, आमची वेळ आली तेव्हा बैलांसकट…”
loksatta readers feedback
लोकमानस: तात्कालिक स्वार्थाचा विचार हेच कारण

हे पण वाचा- Vinesh Phogat : व्यायाम केला, केस कापले, रक्त काढलं तरीही.., विनेश फोगटने वजन कमी करण्यासाठी केले ‘हे’ प्रयत्न

साक्षी मलिकचं भाविनक आवाहन

“मी ऐकलं की विनेशने वजन कमी करण्यासाठी तिचं रक्तही काढलं. मी सगळं ऐकून खूप हताश आणि निराश झाले आहे. मी सकाळपासून विनेशचाच विचार करते आहे. आत्ता तिला काय वाटत असेल हे मी समजू शकते. आमच्यासाठी सामन्याला सामोरं जाणं सोपं असतं. पण वजन कमी करणं हे सर्वात मोठं आव्हान असतं. वजन कमी करणं हे आमचं सर्वात मोठं स्ट्रगल आहे. लढणं आम्हाला माहीत आहे. आम्ही अनेक वर्षांपासून सराव केला आहे. मात्र वेट कमी करणं हा स्ट्रगलचा भाग असतो. त्यामुळे माझी विनंती आहे की विनेशला रौप्य पदक तरी द्या. तिला अपात्र ठरवलं याचं मला खूप वाईट वाटलं असं म्हणत तिच्यासाठी विनेशने एक खास पोस्ट केली आहे. At Least Give Sliver to Her असं साक्षीने म्हटलं आहे.

Vinesh Phogat News
विनेश फोगटने वजन कमी होण्यासाठी काय काय केलं? (फोटो सौजन्य-FE)

विनेशने वजन कमी करण्यासाठी काय केलं?

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार मंगळवारी रात्री विनेशला (Vinesh Phogat) कळलं की तिचं वजन ५२ किलो आहे. त्यानंतर तिने वजन कमी करण्यासाठी बरीच मेहनत घेतली. तिने जॉगिंग केलं, दोरीवरच्या उड्या मारल्या, त्यानंतर सायकलिंगही केलं. एवढंच काय विनेश फोगटने केस कापले, नखं कापली, रक्तही काढलं मात्र शेवटी जे व्हायचं ते झालंच तिचं वजन १५० ग्रॅम जास्त भरलं. आणखी ५० ग्रॅम वजन जर विनेश (Vinesh Phogat) कमी करु शकली असती तर ती ही स्पर्धा खेळू शकली असती. आता तिच्यासाठी साक्षीने खास पोस्ट करत भावनिक आवाहन केलं आहे.

Story img Loader