राष्ट्रीय शिबिरातील तीन मुलींचा मानसिक छळ केल्याबद्दल १९ वर्षीय वेटलिफ्टर शुभम वर्मा याची शिबिरातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पतियाळा येथे सुरू असलेल्या शिबिरात राष्ट्रीय युवा स्पर्धेतील रौप्यपदकविजेता शुभम याच्याविरुद्ध तीन कनिष्ठ महिला खेळाडूंनी भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाकडे लेखी तक्रार केली. आपल्याशी लैंगिक संबंध ठेवावेत अशा आशयाचे संदेश तो सतत मोबाइलद्वारे या खेळाडूंना पाठवत असे. तसेच अनेक वेळा त्यांना फोन करीत अश्लील भाषेत संवाद साधत असे. या महिलांनी भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाकडे दिलेल्या तक्रारीत त्यांना येणाऱ्या सतत फोनकॉल्सचा तपशील देण्यात आला. त्यावरून हे फोन शुभम याने केले असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार त्याच्यावर कारवाई करण्याचा व शिबिरातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
महिला खेळाडूंच्या छळाबद्दल वेटलिफ्टरची हकालपट्टी
राष्ट्रीय शिबिरातील तीन मुलींचा मानसिक छळ केल्याबद्दल १९ वर्षीय वेटलिफ्टर शुभम वर्मा याची शिबिरातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पतियाळा येथे सुरू असलेल्या शिबिरात राष्ट्रीय युवा स्पर्धेतील रौप्यपदकविजेता शुभम याच्याविरुद्ध तीन कनिष्ठ महिला खेळाडूंनी भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाकडे लेखी तक्रार केली
First published on: 23-03-2013 at 04:41 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wrestler shubham verma sent out from camp over women player assault