पुणे : ऑलिम्पिक स्पर्धेतील सहभागानंतर अविरत मेहनत घेतल्यानंतरही पदकाचे स्वप्न अधुरेच राहिलेल्या खेळाडूंमध्ये महिला कुस्तीगीर विनेश फोगाटचे नाव जोडले गेले.

विनेश ही आशियाई आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती खेळाडू. यंदा तिसऱ्यांदा ऑलिम्पिक स्पर्धा खेळताना पदकाचे स्वप्न बाळगूनच ती पॅरिसमध्ये दाखल झाली होती. पहिल्याच फेरीत जागतिक विजेत्या आणि ऑलिम्पिकमधील गतविजेत्या जपानच्या युई सुसाकीला हरवून तिने सुवर्णपदकासाठीची दावेदारी भक्कम केली होती. आपली दमदार कामगिरी सुरू ठेवत विनेशने अंतिम फेरी गाठून इतिहास रचला. मात्र, अखेर तिला रिकाम्या हातीच मायदेशी परतावे लागणार आहे.

selfie point shock death
भाईंदर: महापालिकेच्या सेल्फी पॉईंटमधील विजेचा धक्का, जखमी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
kangana grandmother dies
कंगना रणौतच्या आजीचं झालं निधन; इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करीत अभिनेत्री म्हणाली…
Sachin Pilgaonkar
नवरा माझा नवसाचा २’ने थिएटरमध्ये ५० दिवस पूर्ण केल्यानंतर श्रियाची सचिन पिळगांवकरांसाठी खास पोस्ट; म्हणाली, “रॉकस्टार मला…”
Rupali Bhosle will missing milind gawali after off air aai kuthe kay karte serial
‘आई कुठे काय करते’ मालिका संपल्यानंतर रुपाली भोसलेला ‘या’ व्यक्तीची येईल आठवण, म्हणाली, “त्यांच्याशी जितकी…”
star pravah lagnachi bedi serial will off air
‘आई कुठे काय करते’नंतर ‘स्टार प्रवाह’वरील ‘ही’ लोकप्रिय मालिका होणार बंद; तीन वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर केलं अधिराज्य
Romita Majumdar
फेनाम स्टोरी: टेलिंग हर ‘फॉक्स’टेल
girl died while removing akash kandil
आकाशकंदिल काढताना तोल गेला, ११ व्या मजल्यावरून पडून तरुणीचा मृत्यू

हेही वाचा >>> केवळ खेळाडू नाही, सामूहिक जबाबदारी!

विनेश ५० किलो वजनी गटात खेळत होती. पहिल्या दिवशी विनेशचे वजन ४९.५ इतके भरले. मात्र, उपांत्य फेरीची लढत संपली, तेव्हा बाहेर पडल्यावर विनेशचे वजन ५२ किलोपर्यंत वाढले होते. या वाढलेल्या वजनाने घात केला आणि तिची ऑलिम्पिक पदकाची कहाणी पुन्हा अधुरी राहिली.

विनेश सर्वप्रथम २०१६ मध्ये रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत ४८ किलो वजनी गटातून सहभागी झाली होती. तिची आगेकूच सुरू असतानाच गुडघ्याच्या दुखापतीमुळे तिचे आव्हान संपुष्टात आले. रिओमध्ये अर्धवट राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी विनेश टोक्योत वजन वाढवून ५३ किलो गटातून सहभागी झाली. त्यावेळी ती जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी होती. मात्र, निराशाजनक कामगिरीमुळे तिला नवव्या स्थानावर राहावे लागले. हा सहभाग तिच्यासाठी वादग्रस्त ठरला. बेशिस्त वर्तनाचा ठपका ठेवत भारतीय कुस्ती संघटनेने तिच्यावर बंदीही आणली. आपण काहीशा मानसिक तणावाखाली होतो असे तिने सांगितले.

त्यानंतर गेल्या दोन वर्षांत मॅटबाहेरील संघर्षामुळे पॅरिससाठी सराव करण्यास विनेशला फारसा वेळ मिळाला नव्हता. मग ५३ किलो वजनी गटातून संधी हुकल्यावर विनेशने ५० किलो वजनी गटाची निवड केली. परंतु ती ऑलिम्पिक पदकापासून पुन्हा वंचितच राहिली.