आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदकाची कमाई करणारे कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट, यंदाच्या अर्जुन पुरस्कारांच्या शर्यतीत असल्याची माहिती समोर येते आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बजरंगने कुस्ती महासंघातर्फे अर्जुन पुरस्कारांसाठी आपला अर्ज दाखल केल्याचं कळतंय. तर केंद्रीय क्रीडा मंत्रालय विनेश फोगाटचा पुरस्कारासाठी विचार करत असल्याचं पीटीआयने म्हटलं आहे.

भारताचे केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड, आशिया खेळांमध्ये भारतीय खेळाडूंच्या कामगिरीचा आढावा घेणार आहेत. यानंतर निवड समितीला खेळाडूंच्या नावांची शिफारस करण्यात येणार आहे. दरवर्षी २९ ऑगस्टरोजी अर्जुन पुरस्कारांचं वितरण करण्यात येतं. मात्र सध्या सुरु असलेल्या आशियाई खेळांमुळे यंदा हे पुरस्कार सप्टेंबर महिन्यात ढकलण्यात आले. मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमीत्त २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो.

क्रीडा मंत्रालयातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली, भालाफेकपटू नीरज चोप्रा हे देखील या मानाच्या पुरस्काराच्यां शर्यतीत आहे. सध्या इंडोनेशियात सुरु असलेल्या आशियाई खेळांमध्ये बजरंग पुनियाने भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं. तर विनेष फोगट महिला कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली.

Story img Loader