Wrestlers Protest Against Brij Bhushan Singh: ब्रिजभूषण शरण सिंह विरोधात दिल्ली पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यानंतर महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने एका कवितेतून त्यांना टोमणे मारले आहेत. ‘सुनो द्रौपदी शास्त्र उठा लो’ या त्यांच्या प्रसिद्ध कवितेतून तिने युवा कवी पुष्यमित्र उपाध्याय यांच्यावर प्रकाश टाकला आहे. याबरोबरच तिने कॅप्शनमध्ये #We Want Justice हा हॅशटॅगही वापरला आहे.
आरोपपत्राच्या आश्वासनावरून पैलवानांनी आंदोलन थांबवले होते
कुस्तीपटू विनेश फोगाटने दिल्ली पोलिसांनी रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे (WFI) हंगामी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केल्यानंतर एक कविता शेअर केली आहे. यानंतर आंदोलनकर्त्या पैलवानांनी एकच जल्लोष केला. त्यानंतर सरकारने ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर १५ जूनपर्यंत आरोपपत्र दाखल करण्याचे आश्वासन दिले होते. सरकारकडून हे आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी आंदोलन न करण्याचा निर्णय घेतला, लवकरच हे आंदोलन स्थगित केले जाईल.
विनेश फोगाटने शुक्रवारी (१६ जून) उत्तर प्रदेशातील एटा येथे राहणारे तरुण कवी पुष्यमित्र उपाध्याय यांची प्रसिद्ध कविता ‘वुई वॉन्ट जस्टिस’ ‘सुनो द्रौपदी शास्त्र उठा लो’ या हॅशटॅगसह ट्वीट केले. शेअर केलेल्या कवितेतील काही ओळी पुढीलप्रमाणे, ‘सुनौ द्रौपदी शस्त्र उठा, अब गोविंद ना आएंगे, छोड़ो मेहंदी खड़ग संभालो, खुद ही अपना चीर बचालो…’
ऑलिम्पिक पदकविजेते बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक, ऑलिम्पियन विनेश फोगाट यांच्यासह देशातील अनेक दिग्गज कुस्तीपटू ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या अटकेची मागणी अनेक दिवसांपासून करत आहेत. ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणासारखे गंभीर आरोप आहेत. याप्रकरणी १५ जूनपर्यंत आरोपपत्र दाखल करण्यात येईल, असे आश्वासन सरकारने आंदोलक कुस्तीपटूंना दिले होते.
दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण यांच्याविरोधात १५ जून रोजी आरोपपत्र दाखल केले
दिल्ली पोलिसांनी गुरुवारी (१५ जून) ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावरील पोस्को कायद्याअंतर्गत आरोप रद्द करण्याची शिफारस केली आणि लैंगिक छळ व पाठलाग केल्याच्या आरोपांवर आरोपपत्र दाखल केले. दिल्ली पोलिसांनी पतियाळा हाऊस कोर्टात अल्पवयीन कुस्तीपटूच्या लैंगिक छळ प्रकरणासंदर्भात रद्द अहवाल दाखल केला आहे. ४ जुलै रोजी न्यायालय रद्द अहवालावर सुनावणी करणार आहे. त्याचवेळी, सिंग यांच्यावर सहा प्रौढ कुस्तीपटूंच्या आरोपांप्रकरणी पोलिसांनी राऊस अव्हेन्यू न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे, ज्यासाठी न्यायालयाने २२ जूनची तारीख निश्चित केली आहे.