२०२० मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील एका खेळाकरिता कुस्ती, स्क्वॉश तसेच बेसबॉल-सॉफ्टबॉल यांच्यात चुरस निर्माण झाली आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या रविवारी येथे होणाऱ्या बैठकीत त्यासंबंधी मतदान केले जाणार असून त्यामध्ये स्क्वॉशची सरशी होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
जागतिक स्क्वॉश महासंघाचे अध्यक्ष एन. रामचंद्रन यांच्या नेतृत्वाखाली रशियातील ब्युनोस आयर्स येथे ही बैठक होत
आहे. २९ मेला झालेल्या बैठकीत स्क्वॉश या खेळाबाबतचा प्रस्ताव अतिशय आकर्षक पद्धतीने मांडण्यात आला होता. त्याला जगातील अनेक देशांना मोहित केले असून त्याचा फायदा रविवारच्या मतदानाचे वेळी होईल, असे सांगितले जात आहे.
यापूर्वी दोन वेळा या खेळाच्या समावेशाबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला होता, मात्र दोन्ही वेळा हा प्रस्ताव फेटाळण्यात आला होता.
गेली दहा वर्षे आम्ही या खेळास ऑलिम्पिकचा दर्जा मिळविण्यासाठी झगडत आहोत. तथापि, दोन वर्षे आम्ही अतिशय नियोजनबद्ध प्रचार व प्रसार केला आहे. विविध देशांकडून त्यास अतिशय सकारात्मक प्रतिसाद लाभला आहे. हा खेळ अतिशय आकर्षक व वेगवान कौशल्याचा असल्यामुळे प्रेक्षकांना तो खूपच आवडणार आहे. आमचा खेळ अतिशय माफक खर्चात आयोजित करता येतो. आवश्यकता भासल्यास आम्ही अन्य खेळाच्या सभागृहातही हा खेळ घेऊ शकतो. आमच्या खेळाचा प्रसार १८५ देशांमध्ये झाला आहे. दक्षिण अमेरिका व मध्य युरोपातील देशांबरोबरच चीन व भारतामधील खेळाडूंनी या खेळास ऑलिम्पिकमध्ये स्थान द्यावे, अशीच इच्छा प्रकट केली आहे.

एन. रामचंद्रन, जागतिक स्क्वॉश महासंघाचे अध्यक्ष

Story img Loader