महाराष्ट्र कुस्ती ‘महा-वीर’ स्पध्रेच्या किताबावर कोल्हापूरच्या महेश वरुटे याने आपली मोहोर उमटविली. पुण्याचा राहुल खाणेकर याचा दणदणीत पराभव करून त्याने हा किताब पटकावला. ५१ हजार रुपये रोख, चांदीची गदा, सुवर्णपदक व तलवार देऊन त्याचा सत्कार करण्यात आला.

विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी व राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने सुरू असलेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पध्रेचा समारोप सोमवारी सायंकाळी झाला. प्रा. विश्वनाथ कराड, डॉ. एस. एन. पठाण, प्रा. रतनलाल सोनग्रा, तुळशीराम कराड, काशीराम कराड, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे विलास कथुरे, एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे समन्वयक रमेश कराड आदींच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. कोल्हापूरच्या वरुटेने ८४ ते १२० किलो वजनगटात पहिला, तर पुण्याच्या राहुल खाणेकरने दुसरा क्रमांक मिळविला.
८४ किलो वजनगटात सतीश मोठे (आडपाडी) याने २५ हजार रुपयांचे पहिले बक्षीस पटकावले, तर पुण्याच्या अनिल जाधवने २० हजार रुपयांचे दुसरे बक्षीस प्राप्त केले. पंचाहत्तरी पार केलेले अनेकमल्ल स्पध्रेत सहभागी झाले होते. यातील निवडक स्पर्धकांना सुवर्ण, रौप्य व कांस्यपदक देऊन सन्मानित करण्यात आले. रामेश्वरच्या मातीतून आज ना उद्या ऑलिम्पिक विजेते निर्माण होतील, अशी अपेक्षा प्रा. विश्वनाथ कराड यांनी या वेळी व्यक्त केली.

Story img Loader