आयओसीकडून खुलासा
ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतून कुस्तीला वगळण्याचा निर्णय अद्याप अंतिम नसल्याचे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने म्हटले आहे. कुस्तीला वगळण्याचा निर्णय आयओसीने घेतल्यानंतर खेळाडू, प्रशिक्षक, संघटक व कुस्तीच्या पाठिराख्यांमध्ये खळबळ उडाली होती.
आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंघाने आयओसीच्या निर्णयाविरुद्ध अमेरिकेतील न्यायालयात एक याचिकाही दाखल केली आहे. आयओसीच्या १५ सदस्यांच्या कार्यकारिणीने केवळ शिफारस केली आहे.
या निर्णयाबाबत आयओसीच्या सप्टेंबरमध्ये होणाऱ्या बैठकीत अंतिम मतदान केले जाणार असे आयओसीने म्हटले आहे. आयओसीचे उपाध्यक्ष थॉमस बॅच म्हणाले, या निर्णयाबाबत खेळाडू, प्रशिक्षक, संघटक यांच्या प्रतिक्रिया येणे स्वाभाविकच आहे. मात्र पारंपरिक खेळ व प्रगती यांचा समतोल राखण्याची आवश्यकता होती. आम्ही सर्व खेळांचा विचार करूनच हा निर्णय घेतला आहे.
आम्ही अद्यापही या संदर्भात अंतिम निर्णय घेतलेला नाही. कुस्ती महासंघाने योग्य रीतीने लढा दिला तर त्यांना लोकांची सहानुभूती मिळू शकेल तसेच लोकांनी दडपण आणले तर या निर्णयात बदल होऊ शकतो असेही बॅच यांनी
सांगितले. दरम्यान, आयओसीच्या या निर्णयाला गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी विरोध दर्शवला असून या संदर्भात पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मध्यस्थी करावी, असे आवाहनही मोदी यांनी केले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा