‘रिओ ऑलिम्पिक”मध्ये भारताचे नेतृत्त्व करण्यासाठी मल्ल सुशील कुमारने आता थेट पंतप्रधानांना साकडे घातले आहे. सुशील कुमारने नरेंद्र मोदींना पत्र पाठवले असून ‘रिओ ऑलिम्पिक’साठी नरसिंग आणि माझ्यात सामना घेतला जावा आणि जो विजेता असेल त्याची ऑलिम्पिकसाठी निवड करण्यात यावी, अशी मागणी सुशील कुमारने पत्रात केली आहे. याशिवाय, मोदींकडे भेटीसाठी वेळ देखील सुशील कुमारने मागितला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नरसिंग, सुशील प्रकरणापासून क्रीडा मंत्रालय दूरच

दरम्यान, ‘रिओ ऑलिम्पिक’साठीच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीत सुशील कुमारचे नाव नसल्याचे वृत्त माध्यमांमध्ये झळकले होते. मात्र, सुशील कुमारचे नाव वगळल्याच्या वृत्ताचा भारतीय कुस्ती महासंघाने इन्कार केला आहे. ऑलिम्पिकमध्ये कोणते खेळाडू कोणत्या वजनी गटामधून खेळणार आहेत, याची संभाव्य खेळाडूंची आयओएला पाठवायची असते. या संभाव्य यादीमध्ये सुशीलचे नाव नाही, पण याचा अर्थ सुशील ऑलिम्पिकला जाणार नाही, असा होत नसल्याचे कुस्ती संघाने म्हटले आहे.