Wriddhiman Saha Announces Retirement: भारतीय क्रिकेट संघाने नुकतीच न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका खेळली. जिथे टीम इंडियाला ३-० ने पराभवाला सामोरे जावे लागले होते. या मालिकेत टीम इंडियाची कामगिरी खूपच खराब राहिली आणि परिणामी भारताला २४ वर्षांनंतर पहिल्यांदाच घरच्या मैदानावर संपूर्ण मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला. दरम्यान, टीम इंडियाकडून खेळणाऱ्या एका स्टार यष्टीरक्षक फलंदाजाने अचानक निवृत्ती जाहीर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय कसोटी संघाकडून दिर्घकाळ खेळणाऱ्या वृद्धिमान साहाने क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेणार असल्याची घोषणा केली आहे. फर्स्ट क्लास, लिस्ट ए आणि टी-२० मध्ये एकूण १४ हजारांहून अधिक धावा करणाऱ्या साहाने ट्विटरवर पोस्ट करत म्हटले आहे की, “क्रिकेटमधील संस्मरणीय प्रवासानंतर, हा हंगाम माझा शेवटचा हंगाम असेल. निवृत्त होण्यापूर्वी मला एका रणजी सामन्यात बंगालचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे.”

हेही वाचा – IND vs NZ: “सर्वांसाठी सारखेच नियम ठेवा…”, ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर रोहित शर्मा भडकला, खरंच पंत नॉट आऊट होता?

वृद्धिमान साहाची कारकीर्द

वृद्धिमान साहाच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने २०१० ते २०२१ पर्यंत भारतासाठी ४० कसोटी सामने खेळले आहेत. याशिवाय त्याने टीम इंडियासाठी ९ एकदिवसीय सामने खेळले आहेत. मात्र, त्याला आंतरराष्ट्रीय टी-२० खेळण्याची संधी मिळाली नाही. वृद्धिमान साहाने भारतासाठी ४० कसोटी सामन्यात २९.४१ च्या सरासरीने १३५३ धावा केल्या. त्याची सर्वोच्च धावसंख्या ११७ होती. वनडेमध्ये त्याला काही विशेष कामगिरी करता आलेली नाही. साहाने टीम इंडियासाठी ९ एकदिवसीय सामन्यांमध्ये केवळ ४१ धावा केल्या.

हेही वाचा – IND vs NZ: “एक कर्णधार व फलंदाज म्हणून मी…”, भारताच्या दारूण पराभवानंतर रोहित शर्माचं भावुक वक्तव्य; व्हाईट वॉशचं खापर कोणावर फोडलं?

वृद्धिमान साहा आयपीएलमध्ये पाच संघांकडून खेळला आहे. ज्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्स, पंजाब किंग्स, सनरायझर्स हैदराबाद आणि गुजरात टायटन्स या संघांचा समावेश आहे. या पाच संघांकडून खेळताना त्याने चांगली कामगिरी केली. आयपीएलमध्ये त्याने १७० सामन्यांमध्ये २९३४ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याचा स्ट्राइक रेट १२७.५६ राहिला आहे. साहा देशांतर्गत क्रिकेटमध्ये बंगाल संघाकडून खेळतो. सध्या तो रणजी सामने खेळत आहे. जी त्याची शेवटची स्पर्धा असणार आहे. आयपीएल २०२५ पूर्वी गुजरात संघानेही वृद्धिमान साहाला रिलीज केले आहे.

हेही वाचा – WTC Points Table: भारताने गमावले पहिले स्थान, WTC गुणतालिकेत सलग ३ पराभवांनंतर बसला मोठा धक्का

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wriddhiman saha announces retirement on social media said that he will retire after the ranji trophy 2024 season bdg