WTC 2023 Final India vs Australia: ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील WTC फायनल २०२३ सामना किंग्स्टन ओव्हल, लंडन येथे खेळला गेला जिथे ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा २०९ धावांनी पराभव करून ट्रॉफीवर कब्जा केला. टीम इंडियाच्या या दारुण पराभवानंतर एक अतिशय विचित्र बातमी समोर आली आहे. ही बातमी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माबद्दल आहे, ज्याच्याबद्दल असे सांगितले जात आहे की त्याने निवृत्तीची घोषणा केली आहे. या बातमीची नेमकी सत्यता आणि त्यावाबतची संपूर्ण माहिती जाणून घेऊया.

वास्तविक, WTC फायनल २०२३ मध्ये टीम इंडियाचा २०९ धावांनी दारूण पराभव झाला. सामन्याच्या सोशल मीडियावर एक विचित्र गोष्ट समोर आली आहे. या व्हायरल पोस्टमध्ये रोहित शर्मा निवृत्त झाल्याचे सांगण्यात आले आहे. मुफद्दल वोहरा नावाच्या युजरने त्याच्या ट्वीटर अकाऊंटवर रोहितचा फोटो पोस्ट केला आणि लिहिले, “टीम इंडियाच्या चाहत्यांनो माफ करा. कर्णधार म्हणून हा माझा शेवटचा कसोटी सामना आहे. लवकरच मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. तुम्हा सर्वांचे आभार.”

युजरच्या मते, रोहित शर्माने हे सांगितले आहे. मात्र, आत्तापर्यंत रोहितने अधिकृतपणे असे कोणतेही वक्तव्य दिलेले नाही. तसेच बीसीसीआयनेही याबाबत कुठलीही माहिती दिलेली नाही त्यामुळे ही एक प्रकारची दिशाभूल करणारी बातमी आहे, जी हिटमॅनला ट्रोल करण्यासाठी पसरवली जात आहे. ट्वीटर कोणीतरी मुफद्दल वोहरा यांचे बनावट खाते तयार केले आहे. मराठी वृत्तपत्रात विश्वासार्ह आणि अग्रस्थानी असणारे ‘लोकसत्ता’ वृतपत्र अशा कोणत्याही पोस्टचे समर्थन करत नाही, त्यामुळे फॅक्ट चेक मध्ये ही माहिती खोटी निघाली आहे.

भारताच्या पराभवानंतर चाहत्यांचा संताप सोशल मीडियावर दिसून आला. भारतीय संघाच्या चाहत्यांनी ट्वीटरवर विविध प्रतिक्रिया दिल्या. अनेक युजर्सनी कॅप्टन रोहित शर्मावर निशाणा साधला. युजर्सनी रोहितच्या निवृत्तीची मागणी केली. तो काही काळ ट्वीटरवर ट्रेंड झाला. पहिल्या डावात १५ आणि दुसऱ्या डावात ४३ धावा करून रोहित बाद झाला.

हेही वाचा: WTC2023-25: WTC फायनल संपताच पुढील सायकलची झाली घोषणा, ‘या’ संघांशी भिडणार टीम इंडिया, ICC केले वेळापत्रक जाहीर

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने या स्पर्धा गमावल्या

विशेष म्हणजे रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने तिसरी मोठी स्पर्धा गमावली आहे. कोहलीला कर्णधारपदावरून हटवल्यानंतर, बीसीसीआयने रोहितला तिन्ही फॉरमॅटचा कर्णधार बनवले जेणेकरून तो संघासाठी ट्रॉफी जिंकू शकेल कारण त्याने आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून ५ ट्रॉफी जिंकल्या आहेत. मात्र, रोहितने टीम इंडियाची कमान हाती घेतली आणि भारताला तीन ट्रॉफी गमवाव्या लागल्या. यामध्ये आशिया कप २०२२, टी२० वर्ल्ड कप २०२२ आणि WTC फायनल २०२३च्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. आता रोहित आशिया कप २०२३ आणि एकदिवसीय विश्वचषक कर्णधार म्हणून खेळणार आहे. तो संघासाठी ट्रॉफी जिंकू शकतो की नाही हे पाहावे लागेल.

Story img Loader