WTC 2023 Final India vs Australia: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (२०२१-२३) च्या दुसऱ्या सायकलचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात इंग्लंडमधील ओव्हल येथे खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४६९ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात २९६ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव आठ विकेट्सवर २७० धावा करून घोषित केला. आता भारतासमोर विजयासाठी ४४४ धावांचे लक्ष्य आहे. लाइव्ह दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अजिंक्य रहाणे आणि अष्टपैलू शार्दुल ठाकूर मराठीत प्लॅनिंग करताना दिसत आहेत.

अजिंक्य रहाणे आणि शार्दूल ठाकूर या मराठमोळ्या खेळाडूंनी जबरदस्त फलंदाजी करत पहिल्या इनिंगमध्ये भारताचा डाव सावरला. शार्दूल-रहाणे या जोडीने शानदार फलंदाजी करताना आपली वेगळी छाप सोडली. याचे कारण म्हणजे खेळपट्टीवर असताना एकमेकांना प्रोत्साहन देत दोघेही मराठीमध्ये संवाद साधत होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

IND vs ENG T20I Series Full Schedule Timings and Squads in Detail
IND vs ENG: भारत वि इंग्लंड टी-२० मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक एकाच क्लिकवर! जाणून घ्या सामन्याची नेमकी वेळ
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Heinrich Klaasen hit maximum six ball gone out of stadium video viral in SAT20 2025
SA20 2025 : हेनरिक क्लासेनने मारला गगनचुंबी षटकार! चेंडू थेट स्टेडिमयच्या बाहेर रस्त्यावर पडला, अन् चाहत्याने…
BPL 2025 Mohammad Nawaz and Tanzim Hasan fight during Khulna Tigers vs Sylhet Strikers match
BPL 2025 : लाइव्ह मॅचमध्ये बांगलादेश आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये जुंपली, वाद घालतानाचा VIDEO व्हायरल
Vijay Hazare Trophy Maharashtra Haryana Karnataka and Vidarbha qualify for the semi finals 2024-25
Vijay Hazare Trophy : महाराष्ट्रासह ‘या’ चार संघांनी उपांत्य फेरीत मारली धडक! जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक
IPL 2025 Time Table
IPL 2025 : ठरलं! ‘या’ दिवसापासून रंगणार आयपीएलचा थरार, पहिला सामना ‘या’ तारखेला होणार
Image of Indian Cricket Team
Ind vs Eng T20 Series : इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची निवड, तब्बल एक वर्षानंतर शमीचे पुनरागमन
Mohammed Kaif Statement India Defeat Said You will beat Pakistan in Champions Trophy and will act like we are the best
“पाकिस्तानवर विजय मिळवाल अन्…”, भारताच्या कसोटी मालिका पराभवावर माजी क्रिकेटपटूने टीम इंडियाला सुनावलं

महाराष्ट्रीयन शार्दूल आणि अजिंक्य रहाणे यांच्या दमदार फलंदाजीने सर्वांची मने जिंकली. फलंदाजी करताना दोघांनी खेळपट्टीवर मराठीतून संवाद साधत प्रतिस्पर्धी खेळाडूंना रणनितीपासून दूर ठेवले. प्रत्येक चेंडूवर रहाणे आणि शार्दुल जोडी मराठीत संवाद साधत होती. त्यांचं संभाषण मैदानातील माईकमध्ये रेकॉर्ड झालं अजिंक्य रहाणे म्हणत होता, खेळत राहा खेळत राहा चांगलं आहे. शाब्बास..एक एक बॉल एक एक बॉल..चांगलं आहे खेळत राहा. ” त्यानंतर शार्दुलने अजिंक्यला सांगितलं की, “पॉईंट मागे केलाय हा..” मराठीतून बोलतानाचा त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

शार्दुल ठाकुर मैदानात आल्यानंतर अजिंक्य रहाणेने ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्यावर एकेरी दुहेरी धावा काढल्या. दोघांनी संघाच्या दोनशे धावा फलकावर लावल्या. पडझड रोखून त्यांनी शतकी भागिदारी केली. यावेळी मैदानात अजिंक्य रहाणे शार्दुल ठाकुरचं कौतुक करताना त्याला घाई न करण्याचा सल्ला देतो. लॉर्ड शार्दूल ठाकूर आणि अजिंक्य राहणे यांनी खडूस फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या मनसुब्यावर पाणी फेरले. ६ बाद १५२ अशी दयनीय अवस्था टीम इंडियाची झाली होती. त्यावेळी मुंबईकर अजिंक्य रहाणे आणि शार्दूल ठाकूर ऑस्ट्रेलियाला नडले.. मोक्याच्या क्षणी दोघांनी शतकी भागिदारी केली.

हेही वाचा: WTC 2023 Final: “मुझसे शादी करोगे…”, ओव्हलवर लाईव्ह सामन्यात तरुणीची शुबमनला लग्नाची मागणी, फोटो व्हायरल

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची ट्रॉफी जिंकण्यासाठी भारतासमोर ४४४ धावांचे आव्हान

२७० धावांवर ऑस्ट्रेलियाची आठवी विकेट पडली. कर्णधार पॅट कमिन्स ५ चेंडूत ५ धावा करून बाद झाला आहे. मोहम्मद शमीने त्याला अक्षर पटेलकरवी झेलबाद केले. यासह ऑस्ट्रेलियाने आपला डाव घोषित केला आहे. दुसऱ्या टोकाला अ‍ॅलेक्स कॅरी ६६ धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात १७३ धावांची आघाडी घेतली होती. या पार्श्वभूमीवर भारतासमोर ४४४ धावांचे लक्ष्य आहे. भारताकडून दुसऱ्या डावात रवींद्र जडेजाने सर्वाधिक तीन बळी घेतले. शमी आणि उमेशला प्रत्येकी दोन बळी मिळाले. सिराजने एक विकेट घेतली.

Story img Loader