WTC 2023 Final India vs Australia: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (२०२१-२३) च्या दुसऱ्या सायकलचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात इंग्लंडमधील ओव्हल येथे खेळला जात आहे. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४६९ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात २९६ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने दुसरा डाव आठ विकेट्सवर २७० धावा करून घोषित केला. आता भारतासमोर विजयासाठी ४४४ धावांचे लक्ष्य आहे. लाइव्ह दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अजिंक्य रहाणे आणि अष्टपैलू शार्दुल ठाकूर मराठीत प्लॅनिंग करताना दिसत आहेत.
अजिंक्य रहाणे आणि शार्दूल ठाकूर या मराठमोळ्या खेळाडूंनी जबरदस्त फलंदाजी करत पहिल्या इनिंगमध्ये भारताचा डाव सावरला. शार्दूल-रहाणे या जोडीने शानदार फलंदाजी करताना आपली वेगळी छाप सोडली. याचे कारण म्हणजे खेळपट्टीवर असताना एकमेकांना प्रोत्साहन देत दोघेही मराठीमध्ये संवाद साधत होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
महाराष्ट्रीयन शार्दूल आणि अजिंक्य रहाणे यांच्या दमदार फलंदाजीने सर्वांची मने जिंकली. फलंदाजी करताना दोघांनी खेळपट्टीवर मराठीतून संवाद साधत प्रतिस्पर्धी खेळाडूंना रणनितीपासून दूर ठेवले. प्रत्येक चेंडूवर रहाणे आणि शार्दुल जोडी मराठीत संवाद साधत होती. त्यांचं संभाषण मैदानातील माईकमध्ये रेकॉर्ड झालं अजिंक्य रहाणे म्हणत होता, खेळत राहा खेळत राहा चांगलं आहे. शाब्बास..एक एक बॉल एक एक बॉल..चांगलं आहे खेळत राहा. ” त्यानंतर शार्दुलने अजिंक्यला सांगितलं की, “पॉईंट मागे केलाय हा..” मराठीतून बोलतानाचा त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
शार्दुल ठाकुर मैदानात आल्यानंतर अजिंक्य रहाणेने ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्यावर एकेरी दुहेरी धावा काढल्या. दोघांनी संघाच्या दोनशे धावा फलकावर लावल्या. पडझड रोखून त्यांनी शतकी भागिदारी केली. यावेळी मैदानात अजिंक्य रहाणे शार्दुल ठाकुरचं कौतुक करताना त्याला घाई न करण्याचा सल्ला देतो. लॉर्ड शार्दूल ठाकूर आणि अजिंक्य राहणे यांनी खडूस फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या मनसुब्यावर पाणी फेरले. ६ बाद १५२ अशी दयनीय अवस्था टीम इंडियाची झाली होती. त्यावेळी मुंबईकर अजिंक्य रहाणे आणि शार्दूल ठाकूर ऑस्ट्रेलियाला नडले.. मोक्याच्या क्षणी दोघांनी शतकी भागिदारी केली.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची ट्रॉफी जिंकण्यासाठी भारतासमोर ४४४ धावांचे आव्हान
२७० धावांवर ऑस्ट्रेलियाची आठवी विकेट पडली. कर्णधार पॅट कमिन्स ५ चेंडूत ५ धावा करून बाद झाला आहे. मोहम्मद शमीने त्याला अक्षर पटेलकरवी झेलबाद केले. यासह ऑस्ट्रेलियाने आपला डाव घोषित केला आहे. दुसऱ्या टोकाला अॅलेक्स कॅरी ६६ धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात १७३ धावांची आघाडी घेतली होती. या पार्श्वभूमीवर भारतासमोर ४४४ धावांचे लक्ष्य आहे. भारताकडून दुसऱ्या डावात रवींद्र जडेजाने सर्वाधिक तीन बळी घेतले. शमी आणि उमेशला प्रत्येकी दोन बळी मिळाले. सिराजने एक विकेट घेतली.