India vs Australia, WTC 2023 Final: लंडनमधील ओव्हल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जात असलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना रोमांचक वळणावर पोहोचला आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात चार गडी गमावून १२३ धावा केल्या आहेत. सध्या कॅमेरून ग्रीन सात आणि मार्नस लाबुशेन ४१ धावांवर नाबाद आहे. मात्र त्याआधी शार्दुल ठाकूरने झुंजार खेळी करत अर्धशतक केले. त्यावेळी त्याने पॅट कमिन्सचे अंगावर येणारे चेंडू रोखण्यासाठी अनोखी शक्कल लढवली, हे पाहून रिकी पाँटिंगने त्याचे कौतुक केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इंग्लंडमधील ओव्हल येथे खेळल्या जाणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२१-२३च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या खेळपट्टीवर टीम इंडियाला शारीरिक आणि मानसिक दुखापत झाली आहे. के.एस. भरतपासून अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकूरपर्यंत सगळेच ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या बाऊन्सरला थोडेफार दुखापतग्रस्त झाले आहेत. WTC २०२३ फायनलच्या तिसऱ्या दिवशी, ठाकूरला कोपऱ्याला चेंडू लागल्याने तो वेदनांनी व्हीवळताना दिसला. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा कर्णधार पॅट कमिन्सच्याघातक बाउन्सरला वाचवण्यासाठी त्याने वेगवेगळ्या अनोखे पर्याय आमलात आणले. कधी वाकून चेंडू सोडला तर कधी चेंडू डक केला.

शार्दुल ठाकूरची ही अनोखी कृती पाहून पाँटिंग झाला आश्चर्यचकित

डब्ल्यूटीसी फायनलमध्ये शार्दुल ठाकूरने पॅट कमिन्सच्या बॅक-टू-बॅक बाउन्सरचा केलेला सामना पाहून ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आणि सामन्यावर समालोचन करणारा भारतीय यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिक थक्क झाले.

वास्तविक, शार्दुल ठाकूर आर्म गार्ड न घालता सामना खेळण्यासाठी उतरला आणि पॅट कमिन्सने त्याला जखमी केले. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजाने असे चेंडू टाकले की टीम इंडियाच्या फिजिओथेरपिस्टला शार्दुलच्या उजव्या हाताची तपासणी करण्यासाठी मैदानावर धाव घ्यावी लागली. त्यानंतर कमिन्सचा पुढचा चेंडू शार्दुलच्या हाताला पहिल्यापेक्षा जास्त जोरात लागला. त्यानंतर भारतीय अष्टपैलू खेळाडूने दोन्ही हातांना आर्म-गार्ड घालण्याचा निर्णय घेतला.

शार्दुल ठाकूरचे हे कृत्य पाहून रिकी पाँटिंग आणि दिनेश कार्तिक यांना धक्काच बसला. स्टार स्पोर्ट्सवर कॉमेंट्री करताना भाष्य करताना म्हणाला, “मी असे काहीही पाहिले नाही. एवढे धैर्य तळाच्या फलंदाजाने कमिन्स सारख्या गोलंदाजाला दाखवणे सोपे नाही.” ज्याला कार्तिकने उत्तर दिले: “मीही नाही.”

हेही वाचा: WTC 2023 Final: ‘व्हॉईस ऑफ फुटबॉल’ भेटला ‘व्हॉइस ऑफ क्रिकेट’, हर्षा भोगलेनी शेअर केला ड्र्युरींसोबतचा फोटो

भारतीय संघ आता चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाला लवकरात लवकर गुंडाळण्याचा प्रयत्न करेल. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४६९ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव २९६ धावांवर आटोपला. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात १७३ धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात १२३ धावांची भर घातल्याने ऑस्ट्रेलियन संघाची एकूण आघाडी आतापर्यंत २९६ धावांची झाली आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wtc 2023 final shardul fights to avoid pat cummins bouncer upon seeing this ponting said never seen anything like this avw