WTC 2023 Final India vs Australia: WTC फायनलच्या शेवटच्या दिवशी ओव्हल येथे भारताला विक्रमी लक्षाचा पाठलाग करायचा आहे. ऑस्ट्रेलियाला विजय मिळवण्यापासून रोखण्यासाठी विराट कोहलीला बाद करणे महत्वाचे आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात यापूर्वी ४४४ धावांचा कधीही यशस्वीपणे पाठलाग केलेला नाही. मात्र टीम इंडियाने या विशाल लक्ष्यासमोर भारताने आश्वासक सुरुवात केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुरुवातीला वरच्या फळीतील खेळाडूंना पहिल्या सत्रात बाद करण्यात ऑस्ट्रेलियाला यश मिळाले, परंतु कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी केलेल्या दमदार भागीदारीमुळे भारताला पुढे कोणताही धक्का बसला नाही. फायनलच्या ५व्या दिवशी इतिहास रचण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. भारताला विजय मिळवून देण्याची संधी घेऊन उभा असलेल्या विराटने एक गूढ इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट केली आहे ज्याची उत्तरे चाहते शोधत आहेत.

कसोटीच्या चौथ्या डावात २००३ मध्ये मायदेशात वेस्ट इंडिजने ४१८ धावांचा यशस्वी पाठलाग केला होता. भारताने १९७६ मध्ये पोर्ट ऑफ स्पेन येथे वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक ४०६ धावांचा पाठलाग केला होता. टीम इंडियासमोर धावांचा डोंगर उभा असताना रोहित शर्मा आणि शुबमन गिल या सलामीच्या जोडीने बाद होण्यापूर्वी चांगली सुरुवात केली होती. चहाच्या आधीच्या सत्रात वादग्रस्त निर्णयामुळे शुबमन गिल बाद झाला. अंतिम सत्रात भारतीय कर्णधार फॉर्मात दिसला पण तो नॅथन लायनच्या गोलंदाजीवर पायचीत झाला, त्याने ४३ धावा केल्या.

हेही वाचा: IND vs AUS: “तू अतिशय खराब शॉट…”, चुकीचा फटका खेळणाऱ्या स्मिथला विराटने डिवचले; खास उत्तराचा Video व्हायरल

चेतेश्वर पुजारा देखील विचित्र शॉट खेळून डग आऊटमध्ये परतला. त्यानंतर मात्र कोहली आणि रहाणे दिवस संपेपर्यंत मैदानावर उभे राहून नॅथन लायनच्या गोलंदाजीचा सामना केला. कोहली आणि रहाणे यांनी ११८ चेंडूत नाबाद ७१ धावांची भागीदारी रचली आणि या भागीदारीमुळे भारत ओव्हलवर ऐतिहासिक WTC विजयापासून २८० धावा दूर आहे. सध्या विराट कोहली ४४ तर अजिंक्य रहाणे २० धावांवर खेळत आहे.

हेही वाचा: WTC Final IND vs AUS: “४५० धावांचा पाठलाग करणार त्यांनी…”, शार्दुल ठाकूरच्या विधानाने ऑस्ट्रेलियन खेळाडूंची उडाली झोप

चौथा दिवस संपल्यानंतर, कोहलीने इंस्टाग्रामवर एक गूढ पोस्ट शेअर केली ज्यामध्ये असे लिहिले आहे, “जर आपल्याला खूप काळजी, भीती आणि शंका असतील, तर आपल्याकडे जगण्यासाठी आणि प्रेम करण्यासाठी जागा शिल्लक राहत नाही. त्या गोष्टी आहे तशाच सोडून देण्याचा सराव करणे आवश्यक आहे.” त्याच्या या पोस्टने चाहत्यांना सोशल मीडियावर गोंधळात पाडले आहे आणि सध्या चाहते त्या पोस्टमागील अर्थ शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

कोहलीने गूढ अर्थ असलेली पोस्ट शेअर करण्याची ही दुसरी वेळ आहे. शुक्रवारी देखील त्याने इन्स्टाग्रामवर एक कोट पोस्ट केला होता ज्यामध्ये लिहिले होते, “इतर लोकांच्या मतांच्या तुरुंगातून स्वतःला मुक्त करण्यासाठी तुम्ही नाराजी व्यक्त करण्याची किंवा नापसंती दर्शवण्याची क्षमता विकसित केली पाहिजे.” बाद झाल्यानंतर विराट ड्रेसिंग-रूममध्ये लगेच जेवताना दिसला आणि त्याला वाईट पद्धतीने ट्रोल करण्यात आले होते. त्यामुळे त्याने ही पोस्ट शेअर केली होती.   

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wtc 2023 ind vs aus virat kohlis cryptic message on instagram on final day fans searching for answers avw
Show comments