भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावसकर मालिका नुकतीच संपली. या मालिकेत टीम इंडियाने २-१ असा विजय मिळवला. आता हे दोन्ही संघ जूनमध्ये होणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भिडतील. इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर ७ जूनपासून हा सामना सुरू होईल. मात्र हा सामना जूनमध्ये होणार असल्याने ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू ब्रॅड हॉग खूश नाही. त्याने यासाठी आयसीसीला फटकारले आहे. या विजेतेपदाच्या सामन्यापूर्वी आयपीएल-२०२३ भारतात आयोजित करण्यात आली आहे आणि या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाला इंग्लंडविरुद्ध अॅशेस मालिका खेळायची आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
खरे तर, सोमवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामना अनिर्णीत संपला असेल, परंतु क्राइस्टचर्चमध्ये न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी सामन्यात न्यूझीलंडच्या विजयाने भारतासाठी डब्ल्यूटीसी अंतिम फेरीचे दरवाजे उघडले. आता जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लंडनच्या ओव्हल मैदानावर ७ ते ११ जून या कालावधीत खेळवला जाईल, ज्याला अजून तीन महिने बाकी आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज ब्रॅड हॉगने यासंदर्भात आयसीसीच्या वेळापत्रकावर टीका केली आहे.
WTC फायनलसाठी तीन महिने वाट पाहणे योग्य नाही – हॉग
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामना ७ ते ११ जून दरम्यान खेळवला जाईल आणि १२ जून हा राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे. ब्रॅड हॉगने तीन महिन्यांसाठी आयसीसीच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलच्या वेळापत्रकावर टीका केली आहे. आता ओव्हलवर भारत आणि ऑस्ट्रेलियाचा सामना पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांना तीन महिने वाट पाहावी लागेल आणि यादरम्यान क्रिकेट चाहत्यांचे लक्ष पूर्णपणे आयपीएलवर असेल, असे हॉगने म्हटले आहे. डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यासाठी चाहत्यांना तीन महिने वाट पाहावी लागली तर या सामन्याची क्रेझ कमी होऊ शकते, असे ब्रॅड हॉगचे मत आहे. तो म्हणाला की, “एवढ्या मोठ्या सामन्यासाठी इतका वेळ थांबणे योग्य नाही.”
हॉगने त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर जूनमध्ये आयसीसी कसोटी चॅम्पियनशिप फायनल आयोजित करण्यावर टीका केली आणि क्रिकेटच्या सर्वोच्च संस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तो त्याच्या यूट्यूब चॅनेलवर म्हणाला, “आयसीसी काय करत आहे? सर्व मुख्य सामने संपले असून आता आम्हाला तीन महिने वाट पाहावी लागणार आहे. हे चाहत्यांसाठी चांगले नाही. ICC कृपया जागे व्हा. तोपर्यंत उत्साह आणि थरार संपला असेल. आयपीएलनंतर, जेव्हा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना आयोजित केला जातो, तोपर्यंत प्रत्येकाने पुरेसे क्रिकेट पाहिले असेल आणि फायनलमध्ये त्यांना अजिबातच रस नसावा.”
अशा प्रकारे अंतिम फेरी गाठली
भारत आणि ऑस्ट्रेलिया कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत जाणार हे निश्चित वाटत होते, पण भारताचा खेळ बिघडू शकतो अशा न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्यातील मालिकेकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. बॉर्डर-गावसकर करंडक स्पर्धेतील सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकून भारताचा मार्ग सुकर झाला होता. त्याचवेळी इंदोरमध्ये खेळवण्यात आलेला तिसरा कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने जिंकून अंतिम फेरीत धडक मारली. आता अंतिम फेरीत जाण्याचे भारताचे भवितव्य श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या कसोटीवर अवलंबून आहे. या सामन्यात श्रीलंकेचा रोमहर्षक सामन्यात पराभव झाला आणि भारताचे अंतिम तिकीट कापले गेले.