WTC 2025 Final Math Date Time Venue Announced by ICC: जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२५ (WTC Final 2025 Final) चा अंतिम सामना कधी, कुठे आणि केव्हा खेळवला जाणार आहे. याची आयीसीसीने घोषणा केली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आज मंगळवारी (३ सप्टेंबर) रोजी ही तारीख जाहीर केली. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या इतिहासातील हा तिसरा अंतिम सामना असेल. हा अंतिम सामना लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

हेही वाचा – Bangladesh beat Pakistan by 6 Wickets: पाकिस्तान चारीमुंड्या चीतपट; बांगलादेशचा ऐतिहासिक मालिका विजय

IND vs AUS 3rd Test Match Timing Date Venue What Time Does the Gabba Test Start
IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलिया गाबा कसोटी पहाटे किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या योग्य वेळ
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
IND vs AUS 3rd Test Rain to Play Spoilsport in Brisbane Weather Update India WTC Qualification
IND vs AUS: ब्रिस्बेनमधील पाऊस आणणार भारताच्या WTC फायनलच्या शर्यतीत अडथळा, गाबा कसोटी रद्द झाली तर काय होणार?
WTC Final Qualification Scenario How Team India Can Qualify After Falling Behind South Africa and Australia
WTC Qualification Scenario: टीम इंडिया आफ्रिका-ऑस्ट्रेलियाने मागे टाकल्यानंतर WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? कसं आहे समीकरण
tuberculosis in Mumbai, eradicate tuberculosis,
क्षयरोग निर्मूलनसाठी मुंबईमध्ये राबविणार ‘१०० दिवस मोहीम’, २६ प्रभागांमध्ये ७ डिसेंबरपासून मोहीम सुरू होणार
icc agree for hybrid format for 2025 champions trophy
चॅम्पियन्स करंडक स्पर्धा संमिश्र प्रारूप आराखड्यानुसारच? २०२७ सालापर्यंतच्या सर्व स्पर्धांसाठी हाच नियम
MPSC answer key announced News regarding preliminary exam 2024 nagpur news
‘एमपीएससी’: उत्तरतालिका जाहीर; पूर्व परीक्षा २०२४ संदर्भात महत्त्वाची बातमी…
IND vs AUS What Time Does India Australia Day Night Test Match Start Live Streaming and Other Key Details
IND vs AUS: डे-नाईट कसोटी सामना किती वाजता सुरू होणार? कसं असणार दिवसाचं वेळापत्रक; वाचा लाईव्ह स्ट्रीमिंग डिटेल्स

कधी, कुठे आणि केव्हा खेळवली जाणार WTC Final 2025?

WTC 2025 चा अंतिम सामना ११ जून ते १५ जून २०२५ या कालावधीत हा खेळवला जाईल. १६ तारीख हा राखीव दिवस असेल. लॉर्ड्सवर पहिल्यांदाच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल होणार आहे. यापूर्वी, २०२१ चा अंतिम सामना द रोझ बाउल, साउथॅम्प्टन येथे खेळला गेला होता आणि २०२३ चा अंतिम सामना ओव्हल, लंडन येथे खेळला गेला होता, जो अनुक्रमे न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. दोन्ही वेळा भारताला पराभवाचा सामना करावा लागला.

हेही वाचा – Yuvraj Singh: “माझ्या वडिलांचं मानसिक आरोग्य…”, योगराज सिंगांच्या धोनी-कपिल देव यांच्यावरील वक्तव्यानंतर युवराजचा ‘तो’ व्हीडिओ व्हायरल

हे संघ शर्यतीत

जागतिक कसोटी चॅम्पियनशिप २०२३-२०२५ ची सायकल पूर्ण झाल्यावर गुणतालिकेतील अव्वल दोन संघांमध्ये हा सामना खेळला जाईल. यामध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ पहिल्या स्थानावर असून सध्याचा चॅम्पियन ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे. तथापि, इतर संघांना अद्याप संधी आहे. न्यूझीलंड (तिसरा), बांगलादेश (चौथा) इंग्लंड (पाचवा), श्रीलंका (सहावा), दक्षिण आफ्रिका (सातवा) आणि पाकिस्तान (आठवा) अजूनही अंतिम फेरीतील निर्णायक स्थानासाठी शर्यतीत आहेत.

हेही वाचा – Harbhajan Singh: “धोनी खेळाडूंशी बोलत नाही, तर रोहित…” भारतीय कर्णधारांवर हरभजन सिंगचे वक्तव्य, सर्वोत्कृष्ट कर्णधार म्हणून ‘या’ खेळाडूला पसंती

भारताला दोनदा पराभव पत्करावा लागला

आतापर्यंत न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाने अनुक्रमे २०२१ आणि २०२३ मध्ये हे विजेतेपद पटकावले आहे. दोन्ही वेळा भारताला अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्यांदा टीम इंडियाला न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला आणि त्यानंतर २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभवाला सामोरे जावे लागले. २०२५ चा अंतिम सामना कोणत्या संघांमध्ये खेळवला जाईल हे अद्याप निश्चित झालेले नाही. सध्या गुणतालिकेत भारत आणि ऑस्ट्रेलिया अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. येत्या काही महिन्यांत सर्वच संघ बेच कसोटी सामने खेळणार आहेत, त्यानंतर कोणते संघ विजेतेपदाची लढत खेळणार हे निश्चित होईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया या जेतेपदाच्या लढतीसाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

Story img Loader