Sourav Ganguly’s answer to a question about Virat Kohli: माजी कर्णधार विराट कोहली आणि बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यातील कर्णधारपदाच्या वादाला जवळपास दीड वर्ष उलटले आहे, पण तरीही त्याच्या बातम्या येतच असतात. सध्या सुरू असलेल्या डब्ल्यूटीसी फायनलमध्ये सौरव गांगुली कॉमेंट्री पॅनलचा भाग आहे. त्याला जस्टिन लँगरने विराट कोहलीबद्दल एक प्रश्न विचारला. यावर सौरव गांगुली उत्तर दिले आहे.
अलीकडेच आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यादरम्यान विराटच्या प्रतिक्रिया व्हायरल झाल्या होत्या. त्याचबरोबर पहिल्याच सामन्यात एकमेकांकडे दुर्लक्ष केल्याचा मुद्दाही खूप चर्चिला गेला होचा. मात्र, दुसऱ्या सामन्यात दोघांनी हस्तांदोलन केले आणि दादांनीही विराटचे अभिनंदन केले.
विराट हा असा खेळाडू आहे ज्याला दबावाखाली खेळायला –
स्टार स्पोर्ट्सवरील सामन्यादरम्यान ब्रेक शोमध्ये दादाला विराट कोहलीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. कोहलीशी संबंधित प्रश्नाबाबत सौरव गांगुली म्हणाला की, कोहलीचा कसोटी रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. तसेच एकदिवसीय फॉरमॅटमधील त्याचे आकडेही तो एक मोठा खेळाडू असल्याचे दर्शवतात. सौरव गांगुली पुढे म्हणाला की, विराट हा असा खेळाडू आहे ज्याला दबावाखाली खेळायला आवडते आणि त्याचा सर्वोत्तम खेळ केवळ दबावातच दिसतो. सौरव गांगुलीचे वक्तव्य ऐकून विराटच्या चाहत्यांना आनंद झाला असेल पण ओव्हलवरील फलंदाजीमुळे तो निराश झाला.
ओव्हलमध्ये विराटची बॅट चालली नाही
हेही वाचा – IND vs AUS: डब्ल्यूटीसी फायनलमध्ये टीम इंडिया अडचणीत; तरी ऋषभ पंतची आशा कायम, संघाला दिला खास संदेश
ओव्हल येथे खेळल्या जात असलेल्या डब्ल्यूटीसी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध ४६९ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने ७१ धावांत विराट कोहलीसह चार आघाडीच्या फलंदाजांच्या विकेट्स गमावल्या होत्या. विराट कोहलीने ३१ चेंडूत १४ धावा केल्या आणि मिचेल स्टार्कच्या चेंडूवर स्टीव्ह स्मिथने त्याला झेलबाद केले. या सामन्यातील त्याच्या खराब कामगिरीने भारतीय चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाने दुसऱ्या दिवसअखेर ५ बाद १५१ धावा केल्या आहेत.