मंगळवारी, जेव्हा निवडकर्त्यांनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (ICC WTC फायनल 2023) साठी भारतीय संघाची घोषणा केली, तेव्हा अजिंक्य रहाणेचे पुनरागमन पाहून अनेक चाहत्यांना आश्चर्य वाटले, तर काहींनी त्याच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. रहाणेचा आयपीएल फॉर्म पाहून निवडकर्त्यांनी त्याला कसोटी संघात संधी दिल्याचे अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र रहाणे आपल्या कामगिरीने आपली निवड सार्थ ठरवेल, असा विश्वास माजी ऑफस्पिनर हरभजन सिंगला आहे. रहाणे येथे मोठी कामगिरी करून आपली निवड सिद्ध करेल, अशी आशा भज्जीने व्यक्त केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माजी भारतीय क्रिकेटपटू हरभजन सिंगने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आगामी डब्ल्यूटीसी २०२३ फायनलसाठी अजिंक्य रहाणेला टीम इंडियामध्ये परत बोलावण्याच्या राष्ट्रीय निवडकर्त्यांच्या निर्णयाचे कौतुक केले. पण माजी फिरकीपटू म्हणाला की, “श्रेयस अय्यरच्या दुखापतीमुळे रहाणेला परत बोलावण्याशिवाय भारताकडे दुसरा पर्याय नव्हता.”

तथापि, आगामी डब्ल्यूटीसी २०२३च्या अंतिम सामन्यासाठी सूर्यकुमार यादवची निवड न करण्याच्या भारताच्या निर्णयावर हरभजन सिंग नाराज होता. कारण त्याचा असा विश्वास आहे की, सध्या चालू असलेल्या आयपीएल २०२३ मधील खेळाडूंची कामगिरी लक्षात घेऊन जर कसोटी संघ निवडला गेला असता तर मुंबई इंडियन्सचा स्टार देखील संघाचा भाग असायला हवा होता. सूर्यकुमार यादवशी झालेल्या भेदभावामुळे संतप्त समालोचक हरभजन सिंगने सांगितले की, “भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात ‘द-स्काय’ म्हणजेच सूर्याची उणीव भासेल.”

हेही वाचा:WTC Final: BCCIने तीन दिवसांनी WTC फायनलसाठी केला नवा संघ जाहीर, आता ‘या’ ५ युवा खेळाडूंना संघात स्थान

रहाणेच्या निवडीला माझा 100% पाठिंबा आहे: हरभजन सिंग

हरभजन सिंग त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला, “अजिंक्य रहाणेने अनेक सामन्यांमध्ये भारताचे कर्णधारपद भूषवले आहे आणि तो एक महान खेळाडू आहे. त्याच्याकडे एक फलंदाजीचे उत्तम तंत्र आहे. त्याचा सध्याचा फॉर्म लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे मला वाटते. रहाणेला कसोटी संघात परत बोलावण्यात आले आहे कारण श्रेयस अय्यर सध्या संघाचा भाग नसून तो दुखापतग्रस्त आहे. अय्यरच्या अनुपस्थितीमुळे रहाणेला संधी मिळाली असून त्याच्यासाठी हा मोठा सामना आहे.”

“रहाणे हा एक मोठा खेळाडू आहे आणि मला आशा आहे की तो त्याच्यावर दाखविलेल्या विश्वासावर खरा उतरेल आणि चमकदार कामगिरी करेल. रहाणेच्या निवडीचे मी १०० टक्के समर्थन करतो आणि मला वाटते की हा एक चांगला निर्णय आहे. खरंच दुसरा कोणताही मार्ग नव्हता. पण डब्ल्यूटीसी २०२३ फायनलसाठी टीम इंडियाच्या संघातून वगळलेला एक माणूस म्हणजे सूर्यकुमार यादव, तो संघाचा भाग असायला हवा होता.” असं फिरकीपटू हरभजन सिंग म्हणाला.

हेही वाचा: Women’s Contract: हरमनप्रीत कौरला लागली लॉटरी! BCCIकडून महिला खेळाडूंची केंद्रीय करार यादी जाहीर

भज्जी पुढे बोलताना म्हणाला की, “ते तीन फिरकीपटूंऐवजी अतिरिक्त फलंदाज घेऊ शकले असते कारण, तुम्हाला मधल्या फळीत एका फलंदाजाची गरज आहे जो विरोधी संघावर तुटून पडेल आणि ते फक्त सूर्यकुमारच करू शकेल. तो उत्कृष्ट फॉर्ममध्ये असल्यामुळे त्याला कसोटी संघात स्थान देण्यात आले होते. होय, गेल्या काही सामन्यांमध्ये त्याने चांगली कामगिरी केली नाही, परंतु जर आयपीएल हा इतर खेळाडूंच्या निवडीचा निकष असेल तर त्याचीही निवड व्हायला हवी होती, कारण त्याने ती लय आयपीएल २०२३ मध्ये गाठली आहे.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wtc final 2023 he made his choice ex india legend says rahane did suryakumar wrong explained on this avw