आयसीसी वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी टीम इंडिया आणि न्यूझीलंड संघ सज्ज झाला आहे. १८ जून ते २२ जून दरम्यान हा सामना इंग्लंडच्या साउथॅम्पटन मैदानात खेळला जाणार आहे. तत्पूर्वी करोनाचं संकट पाहता दोन्ही संघाचे खेळाडू बायो-बबलमध्ये सराव करत आहे. दोन्ही संघाचे खेळाडू साउथॅम्पटनमधील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास आहेत. मात्र अंतिम सामन्यापूर्वी न्यूझीलंडच्या सदस्यांनी बायो-बबलचे नियम मोडल्याने बीसीसीआय आयसीसीकडे तक्रार दाखल करणार आहे. न्यूझीलंडचे काही खेळाडू बायो बबलचे नियम धाब्यावर बसवून सकाळी गोल्फ खेळण्यासाठी गेले होते. यामुळे भारतीय संघ प्रशासनाने चिंता व्यक्त केली आहे, अशी बातमी क्रिक बजने दिली आहे. याची तक्रार बीसीसीआय थेट आयसीसीकडे करणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. या खेळाडूंमद्ये ट्रेंट बोल्ट. टिम साउदी, हेनरी निकोल्स, मिशेल सेंटनर, डेरिल मिशेल आणि फिजिओ टॉमी सिमसेक यांचा समावेश आहे. हे सहा जण सकाळी गो्ल्फ खेळण्यासाठी गेले होते.
कोणताही प्रोटोकॉल तोडला नसल्याचा दावा न्यूझीलंड संघ प्रशासनाने केला आहे. हॉटेल आणि गोल्फ मैदान एकाच भागात असल्याचं कारण न्यूझीलंड संघ प्रशासनाकडून देण्यात आलं आहे. दुसरीकडे आयसीसीने दोन्ही संघासाठी समान नियमावली ठेवावी असं बीसीसीआयकडून सांगण्यात आलं आहे. या प्रकरणाची आयसीसीकडे तक्रार करणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
WTC FINAL पूर्वी क्रिकेटच्या देवाकडून रोहित-शुबमनला ‘खास’ टिप्स!
न्यूझीलंड आणि भारताने या सामन्यासाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली. या सामन्यासाठी टीम इंडियाचे कर्णधारपद विराट कोहलीकडे, तर उपकर्णधारपद अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात आले आहे. सलामीवीर फलंदाज म्हणून रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांना संधी मिळाली आहे, तर केएल राहुल आणि मयंक अगरवाल यांना वगळण्यात आले आहे. मधल्या फळीत कोहली आणि रहाणे व्यतिरिक्त आधारस्तंभ चेतेश्वर पुजाराचा समावेश आहे. हनुमा विहारीलाही संधी मिळाली आहे.
शास्त्री मास्तरांची बातच न्यारी..! इंग्लंडमध्ये चक्क ‘श्वाना’सोबत केला सराव
न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी असलेल्या २० लोकांच्या संघातून पाच खेळाडूंना वगळण्यात आले आहे. डग ब्रेसवेल, जेकब डफी, डॅरेल मिशेल, रॅचिन रवींद्र आणि मिशेल सँटनर यांना विश्रांती देण्यात आली आहे. अष्टपैलू खेळाडू कॉलिन डी ग्रॅन्डहोमे तंदुरुस्त असून विल यंगला पर्यायी म्हणून ठेवण्यात आले आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसर्या कसोटी सामन्यात बीजे वॉटलिंगला दुखापत झाल्यामुळे टॉम ब्लंडेलचा समावेश करण्यात आला होता. त्यालाच भारताविरुद्ध पर्यायी खेळाडू म्हणून स्थान मिळाले आहे.