WTC 2023 Final India vs Australia: टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये प्रथम गोलंदाजी करण्याच्या भारताच्या निर्णयाचा बचाव केला असून, हवामान आणि खेळपट्टी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. विजयासाठी ४४४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ पाचव्या दिवशी पहिल्याच सत्रात २३४ धावांवर बाद झाला. सामन्यानंतर कॉमेंट्री करत असलेल्या माजी कर्णधार सौरव गांगुलीने द्रविडला काही खडतर प्रश्न विचारले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याच्या निर्णयावरही गांगुलीने प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावर द्रविड म्हणाला, “आम्ही हवामान आणि खेळपट्टीवरील गवत पाहून हा निर्णय घेतला. नंतर फलंदाजी करणे सोपे जाईल असे आम्हाला वाटले. अलीकडच्या काळात बहुतेक संघ इंग्लंडमध्ये असे निर्णय घेत आहेत.” तो पुढे म्हणाला, “आम्हाला हा एक चांगला निर्णय वाटला कारण ऑस्ट्रेलियाच्या तीन विकेट्स ७० धावांवर पडल्या होत्या पण पुढच्या दोन सत्रात आम्ही खूप धावा दिल्या. इथे आमची चूक झाली, आम्ही त्यांना ३०० धावांवरही बाद करू शकलो असतो, पण आमच्या गोलंदाजांनी टप्पा योग्य राखला नाही.”

प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाला, “आम्ही विचार केला की लक्ष्य काहीही असो, विलक्षण कामगिरीची आवश्यकता आहे आणि त्यासाठी आम्ही लढण्याची भावना सोडणार नाही. या खेळपट्टीवर ४६९ धावा झाले म्हणून आमचे गोलंदाज निराश होते, यानंतर फलंदाजांनी खराब फटके खेळले. अनुभवी खेळाडूंनी जर या सामन्यात जबाबदारी उचलली असती तर भारतावर ही वेळ आली नसती.”

हेही वाचा: French Open: फ्रेंच ओपन २०२३ मध्ये जोकोविचने मारली बाजी! २३व्या ग्रँडस्लॅममध्ये विश्वविक्रम नोंदवणाऱ्या नोव्हाकला नदालने दिला ‘हा’ खास संदेश

आमच्या आघाडीच्या फलंदाजांचे काय झाले?- सौरव गांगुली

ऑस्ट्रेलियाकडून भारताचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पराभूत झाल्यानंतर लगेचच माजी कर्णधार सौरव गांगुलीने स्टार स्पोर्ट्सवरील एका मुलाखतीदरम्यान त्याला विचारले, “राहुल, तू एक महान खेळाडू आहेस, परंतु आमचे वरच्या फळीतील फलंदाज उपखंडाबाहेर का संघर्ष करत आहेत, त्यांना नेमकं काय झालं आहे ? कधी सुधारणार फलंदाजी? तुम्ही नक्की काय करत आहात?”

हेही वाचा: WTC 2023 Final fact check: टीम इंडियाच्या पराभवानंतर रोहित शर्माने निवृत्ती जाहीर केली? ट्वीट व्हायरल; नेमकं काय आहे सत्य? जाणून घ्या

माजी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीच्या प्रश्नावर द्रविड म्हणाला, “आमच्याकडे पहिल्या पाचमध्ये अनुभवी खेळाडू आहेत ज्यांनी त्यांच्या खेळीने आधीच सर्वोच्च खेळी करून मोठे मापदंड प्रस्थापित केले आहेत. या खेळाडूंना भविष्यात दिग्गज म्हटले जाईल. त्यांनी ऑस्ट्रेलियात दोन मालिका जिंकल्या, इंग्लंडमध्ये कसोटी जिंकली. आम्ही जे काही शक्य आहे ते करत आहोत. भविष्यात आणखी काही गरज पडली तर त्यात आणखी सुधारणा करू.” द्रविडच्या या उत्तरावर ना गांगुली यावर समाधानी दिसला, ना टीव्हीवर पाहत असलेले लाखो क्रिकेट चाहते.

गेल्या १० वर्षांत आयसीसीचे एकही विजेतेपद नाही?

सौरव गांगुली म्हणाला की, “गेल्या दहा वर्षांत आयसीसीचे जेतेपद जिंकू शकलो नाही.”यावर राहुल द्रविड म्हणाला, “आम्ही ट्रॉफीच्या जवळ येत असून उपांत्य फेरी, अंतिम फेरीत पोहोचलो आहोत पण गेल्या पाच दिवसात आम्ही आमचा सर्वोत्तम खेळ केला नाही यावर आपण आत्मपरीक्षण करू.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wtc final after indias crushing defeat sourav ganguly asked tough questions to coach rahul dravid got such answers avw
Show comments