WTC Final, ICC squad updates: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या दुसऱ्या आवृत्तीचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ७ जूनपासून लंडनमधील केनिंग्टन ओव्हलवर खेळवला जाणार आहे. या हाय व्होल्टेज मेगा लढतीसाठी दोन्ही संघांनी त्यांचे १५ सदस्यीय अंतिम संघ जाहीर केले होते. भारतीय संघासाठी या सामन्यापूर्वी दुखापती ही मोठी समस्या होती. के.एल. राहुलला दुखापत झाल्यानंतर इशान किशनचा संघात समावेश करण्यात आला होता. आणि आयपीएल २०२३च्या क्वालिफायर २ मध्ये तो जखमी झाला. यानंतर तो त्या सामन्यात फलंदाजीलाही आला नाही आणि मुंबईला सब्सटीट्यूटचा पर्याय देण्यात आला.
इशान किशनबाबत कोणतेही ठोस अपडेट समोर आलेले नाही. त्याचवेळी १५ सदस्यीय संघातील जयदेव उनाडकटच्या फिटनेसवरही साशंकता आहे. आयपीएल २०२३ मध्ये सराव करताना उनाडकटचा पाय नेटमध्ये दुखावल्याने तो बाहेर पडला होता. यानंतर त्याच्या खांद्याला दुखापत झाली. या दुखापतीनंतर जयदेव उनाडकट एकही सामना खेळला नाही आणि तो आयपीएलच्या संपूर्ण मोसमातून बाहेर होता. अद्याप बीसीसीआयने त्यांच्याबाबत कोणतेही अपडेट जारी केलेले नाही. या सामन्यापर्यंत तो तंदुरुस्त होतो की नाही हे पाहावे लागेल. याशिवाय, बोर्डाने तीन खेळाडूंना स्टँडबाय ठेवले होते, त्यापैकी बदल करून, यशस्वी जैस्वालला लंडनला जाण्यासाठी तिकीट देण्यात आले.
फॉर्मात असलेला मुंबईचा सलामीवीर यशस्वी जैस्वालचा ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. ऋतुराज गायकवाड याच्या जागी यशस्वी यांचा समावेश करण्यात आला आहे. महाराष्ट्राचा सलामीवीर ऋतुराजचा भारतात स्टँडबाय म्हणून समावेश करण्यात आला होता. यशस्वी देखील स्टँडबाय म्हणून संघाचा एक भाग बनला आहे. ऋतुराज २-३ जून दरम्यान लग्न करणार असल्याने तो लंडनला जाऊ शकणार नाही.
भारतीय संघाची घोषणा खूप आधी झाली होती. यानंतर आयपीएलमध्ये खेळाडूंना दुखापत झाली आणि भारतीय संघात काही बदल करण्यात आले. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियानेही या सामन्यासाठी आपला संघ जाहीर केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या १५ सदस्यीय संघात वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडचा समावेश करण्यात आला आहे. ३२ वर्षीय हेझलवूड आयपीएलमध्ये आरसीबी संघाचा भाग होता आणि केवळ तीन सामने खेळून ऑस्ट्रेलियाला परतला. त्याच्या पायाच्या स्नायूंवर ताण आला होता. असे असतानाही हेझलवूडचा ऑस्ट्रेलियन संघात समावेश करण्यात आला आहे. त्यांच्याशिवाय कर्णधार पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि स्कॉट बोलंड हे देखील ऑस्ट्रेलियन संघात वेगवान गोलंदाजीची जबाबदारी सांभाळतील.
५९ कसोटीत २२२ विकेट्स घेणाऱ्या अनुभवी हेझलवूडच्या आगमनासाठी निवडकर्त्यांना अष्टपैलू मायकेल नेसर किंवा सीन अॅबॉट यांना राखीव म्हणून आणण्याची गरज नव्हती. नेसेर आणि अॅबॉट दोघेही नेशन्स लीगमध्ये खेळत आहेत आणि ऑस्ट्रेलियन मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनी अलीकडेच सांगितले की, “कोणीही जखमी झाल्यास त्यांना ऑस्ट्रेलियन संघात समाविष्ट केले जाऊ शकते.” हेझलवूड गेल्या काही काळापासून दुखापतींशी झुंज देत आहे. आयपीएल २०२३ पूर्वीच तो जखमी झाला होता आणि आरसीबी संघात उशीरा समावेश होता. याआधीही तो जखमी झाला होता आणि डिसेंबर २०२१ पासून तो फक्त चार कसोटी खेळला आहे. आयपीएलच्या या मोसमातही तो केवळ नऊ षटके टाकू शकला.
वर्ल्ड कप फायनलसाठी दोन्ही संघ
ऑस्ट्रेलिया: पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, टॉड मर्फी, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.
राखीव खेळाडू: मिचेल मार्श, मॅथ्यू रेनशॉ.
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, इशान किशन, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, के.एस. भरत, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, उमेश यादव.
राखीव खेळाडू: यशस्वी जैस्वाल, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव.