Cameron Green On Shubman Gill’s Catch: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणाऱ्या WTC फायनलचे चार दिवस पूर्ण झाले आहेत. टीम इंडियाने ४४४ धावांचा पाठलाग करताना चौथ्या दिवसापर्यंत ३ गड्यांच्या मोबदल्यात १६४ धावा केल्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाला पहिला धक्का शुबमन गिलच्या रूपाने बसला. स्लिपमध्ये कॅमेरून ग्रीनने गिलचा झेल टिपला. या झेलवरून हळूहळू वाद वाढत गेला. आता ग्रीननेच या झेलवर प्रतिक्रिया दिली आहे.

डावाच्या ४०व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर शुबमन गिल स्कॉट बोलंडचा बळी ठरला. स्लिपमध्ये कॅमेरून ग्रीनचा गिलचा झेल टिपला गेला. गिलचा झेल पाहून असे वाटले की ग्रीनने तो झेल नीट पकडला नाही आणि चेंडू जमिनीवर आदळला. मात्र, प्रकरण थर्ड अंपायरकडे गेले आणि तेथून गिलला बाद घोषित करण्यात आले. त्याच्या झेलवर गिलनेही प्रतिक्रिया दिली. आता ग्रीनने यावर स्पष्टीकरण दिले आहे.

Donald trump Vladimir putin
विश्लेषण: ‘मित्र’ पुतिन यांच्या सतत संपर्कात असतात ट्रम्प? नव्या पुस्तकातील दाव्याने युक्रेनच्या चिंतेत भर?
Sharad pawar on ladki bahin scheme
मविआ सत्तेत आल्यावर लाडकी बहीण योजना बंद करणार?…
Marnus Labuschagne Stuns Umpire With Unorthodox Field During Sheffield Shield Match Video Goes Viral
VIDEO: मार्नस लबूशेनने उभा केला पंचांच्या मागे क्षेत्ररक्षक; व्हीडिओ पाहून तुम्ही चक्रावून जाल
Ab De Villiers on Rohit Sharma
रोहित फाफ डू प्लेसिसच्या जागी RCB चे नेतृत्त्व करणार का? एबी डिव्हिलियर्सने विराटचा उल्लेख करत दिले उत्तर
Rohit Sharma Statement on T20 World Cup Final He Allows Teammates To Sledge South Africa Batters
Rohit Sharma: “तुम्हाला हवं ते बोला, पंच-रेफरींना नंतर बघून घेऊ”, रोहितने खेळाडूंना वर्ल्डकप फायनलमध्ये शेरेबाजी करण्याची दिलेली सूट, स्वत: केला खुलासा
Rohit Sharma Became First Captain to Complete 1000 Runs in 2024 IND vs BAN 1st Test
“Hats off to Rohit”; ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू रोहित शर्मावर फिदा!
Rohit Sharma Hilarious Reply to Axar Patel As He Failed to Imitating MS Dhoni Six Viral Video
Video: “अरे हेलिकॉप्टर फिरव ना…”, रोहित शर्माने अक्षर पटेलची घेतली फिरकी, धोनीच्या शॉटची नक्कल पाहून पाहा काय म्हणाला?
IND vs PAK Mudassar Nazar says match-fixing incident cannot be repaired.
‘पाकिस्तान भारताकडून हरला की मॅच फिक्सिंगचे आरोप व्हायचे…’, पाकिस्तानच्या माजी खेळाडूचे मोठे वक्तव्य

शुबमन गिलच्या झेलवर कॅमेरून ग्रीनने दिले स्पष्टीकरण

ऑस्ट्रेलियाचा स्टार ऑलराऊंडर कॅमेरून ग्रीनने असा झेल पकडला, ज्यावरून बरेच वाद होत आहेत. ग्रीनने कॅच पकडला तेव्हा बॉल खाली जमिनीवर आदळत असल्याचे दिसत होते. मात्र यानंतर अंपायरने गिलला बाद घोषित केले. आता आपण जाणून घेऊया की त्याच्या झेलबद्दल ग्रीनचे काय मत आहे.

वास्तविक, भारताच्या दुसऱ्या डावातील सातवे षटक ऑस्ट्रेलियाकडून स्कॉट बोलंडने टाकले होते. बोलंडच्या ओव्हरचा पहिला चेंडू शुबमनच्या बॅटची कड घेऊन गली आणि स्लिप्सच्या मध्ये जातो. अशा स्थितीत तिथे उभ्या असलेल्या कॅमेरून ग्रीनने डाव्या हाताने झेल घेतला. मात्र थर्ड अंपायरजवळच्या मोठ्या स्क्रीनवर जेव्हा ह्या झेलचा व्हिडीओ दिसला तेव्हा चेंडू जमिनीवर आदळत असल्याचे दिसून आले.

असे असतानाही तिसऱ्या अंपायरने हा झेल व्यवस्थित असून त्यांनी शुबमनला बाद घोषित केले. यावर ग्रीनने आपले म्हणणे मांडले असून तो म्हणाला की, “त्यावेळी मला वाटले की मी तो झेल पकडला आहे.” तो पुढे म्हणाला, “त्यावेळच्या गरमीमुळे मला वाटले की मी घेतलेला झेल हा क्लीन आहे आणि आनंदाच्या भरात चेंडू फेकून दिला कारण, मला कोणतीही शंका नव्हती. मग मी हा निर्णय थर्ड अंपायरवर सोडला आणि त्यांनी या कॅचला योग्य असल्याची सहमती दर्शवली.”

शुबमन गिलने दोन्ही डावांत स्वस्तात सामना केला

या अंतिम सामन्यातून चाहत्यांना शुबमन गिलकडून मोठ्या आशा होत्या. नुकत्याच संपलेल्या आयपीएल २०२३मध्ये गिल चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. मात्र, येथील कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत तो आपला फॉर्म कायम राखू शकला नाही. येथे त्याने पहिल्या डावात २ चौकारांच्या मदतीने १३ तर दुसऱ्या डावात २ चौकारांच्या मदतीने १८ धावा केल्या.

हेही वाचा: WTC Final IND vs AUS: ग्रीनचा वादग्रस्त झेल अन् शुबमन गिलच्या विकेटनंतर स्टेडियममध्ये ‘चीटर, चीट, चीट’ नारे; चाहते म्हणाले, “ही बेईमानी…”

भारताला पाचव्या दिवशी २८० धावांची गरज आहे

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर भारतीय संघाला पाचव्या आणि शेवटच्या दिवशी विजयासाठी २८० धावांची गरज असून ७ विकेट्स हातात आहेत. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा विराट कोहलीने ६० चेंडूत ४४ धावा केल्या आणि अजिंक्य रहाणे २० धावांवर नाबाद परतला. विजयासाठीच्या जागतिक विक्रमी ४४४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने ३ गड्यांच्या मोबदल्यात १६४ धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमधील चौथ्या डावातील सर्वोच्च लक्ष्य ४१८ आहे जे यशस्वीरित्या गाठले गेले तर या मैदानावरील विक्रम २६३ आहे.