WTC 2023 Final India vs Australia: ७ जूनपासून होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. हा सामना इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर होणार आहे. भारत दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळत आहे. गेल्या वेळी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताला न्यूझीलंडविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. रोहित शर्मा पहिल्यांदाच इंग्लंडमध्ये कसोटी सामन्यात या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत कर्णधार म्हणून दिसणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या सायकलच्या (२०२१-२३) अंतिम फेरीत भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. दोन्ही संघ प्रथमच ही ट्रॉफी जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील. भारतीय संघाला २०१३ नंतरची पहिली आयसीसी ट्रॉफी जिंकायची आहे. नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात रविचंद्रन अश्विनला संधी मिळालेली नाही. भारतीय संघात रवींद्र जडेजा हा एकमेव फिरकी गोलंदाज आहे.

सामन्याआधी अश्विनने पीच क्युरेटरशी साधला संवाद

रविचंद्रन अश्विन हा डब्ल्यूटीसीच्या या आवृत्तीत भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. अशा परिस्थितीत त्याला वगळण्याचा निर्णय टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासाठी सोपा असणार नाही. अश्विनने ओव्हल खेळपट्टीसंदर्भात एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यामध्ये तो ओव्हल पिचच्या क्युरेटरशी बोलताना दिसला ज्याला तो लीज म्हणतो. मिस्टर ले या मैदानाच्या खेळपट्टी क्युरेटर्सपैकी एक आहे.

अश्विन या व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणतो की, “आमच्याकडे ओव्हलचे एक पिच क्युरेटर आहेत, ज्यांच्याकडे येथील खेळपट्टीची जबाबदारी आहे. बरं सांगा या खेळपट्टीत काय आहे?” यावर लेगने उत्तर दिले की, “ओव्हलची खेळपट्टी चांगली आहे.” यावर अश्विन पुढे म्हणाला की, “तुम्ही नेहमीच चांगली खेळपट्टी तयार करता. पण आज सरावादरम्यान आमच्या काही खेळाडूंना भरपूर उसळी घेणाऱ्या चेंडूमुळे दुखापत झाली. त्यामुळे सामन्यात अशाच खेळपट्ट्या मिळणार आहेत का? आम्ही ब्रेट लीच्या संघाला मदत करणाऱ्या खेळपट्टी आहे असे म्हणू शकतो का?” असे मजेशीर प्रश्न त्याने ले यांना विचारले.

हेही वाचा: India vs Australia WTC Final 2023: भारतीय संघाला मोठा धक्का! सराव करताना कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त, पाहा Video

ऐतिहासिक ओव्हलच्या मैदानात जून महिन्यात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय सामना खेळला जात आहे. खेळपट्टीवर गवत असल्याने वेगवान गोलंदाजांना याचा फायदा होईल असा अंदाज आहे. तर ढगाळ वातावरण असले तरी पहिल्या दोन-तीन तासांच्या खेळानंतर ऊन्हामुळे सामन्यावरचे पावसाचे ढग दूर होतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. भारतीय संघाने रविचंद्रन अश्विनला अंतिम अकरामध्ये संधी दिली नाही त्याच्याऐवजी रवींद्र जडेजा हा एकमेव फिरकीपटू डब्ल्यूटीसी फायनलमध्ये खेळणार आहे.

ही आहे दोन्ही संघाची प्लेईंग ११

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, श्रीकर भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया: डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, कॅमेरॉन ग्रीन, अ‍ॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wtc final ind vs aus india win the toss and decide to bowl how will the pitch be at the oval learn playing 11 avw