India vs Australia, WTC 2023 Final: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या २०२१-२३ या दुसऱ्या आवृत्तीचा अंतिम सामना इंग्लंडमधील ओव्हल येथे खेळला जात आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ कसोटी चॅम्पियन होण्यासाठी आमनेसामने आहेत. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने तीन गड्यांच्या मोबदल्यात ३२७ धावा केल्या असून ते विजेतेपदाच्या लढतीत चांगल्या स्थितीत आहेत. ऑस्ट्रेलियाकडून ट्रॅव्हिस हेडने १४६ आणि स्टीव्ह स्मिथने ९५ धावा केल्या. भारताने ७६ धावांत ऑस्ट्रेलियाच्या तीन विकेट्स सोडल्या होत्या. यानंतर फलंदाजीला आलेल्या ट्रॅव्हिस हेडने वेगवान धावा करत संघाला मजबूत स्थितीत आणले.
रोहित शर्मासाठी ७ जूनचा दिवस त्याच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वात मोठा दिवस म्हणता येईल. भारतीय कर्णधार म्हणून, रोहित प्रथमच कोणत्याही आयसीसी स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारतीय संघाचे नेतृत्व करण्यासाठी आला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC) अंतिम सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात नाणेफेकीच्या वेळी रोहित शर्मा मैदानात जात असताना अचानक पायऱ्यांवर अडखळला.
ओव्हल मैदानाच्या ड्रेसिंग रुममधून बाहेर पडल्यानंतर रोहित पायऱ्यांवरून खाली येत असताना त्याचवेळी एका चाहत्याचा बॅनर सर्वांच्या डोळ्यासमोर आला. यामध्ये त्या चाहत्याने बॅनरवर लिहिले की, “विराट तू नेहमीच माझा कर्णधार राहशील.” यावर रोहित शर्माने स्मित हास्य करत तो पुढे निघून गेला. त्याचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
सामन्यात काय झाले?
सामन्याबद्दल बोलायचे, तर नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ८५ षटकांनंतर ३ बाद ३२३ धावा केल्या आहेत. सध्या खेळपट्टीवर ट्रॅव्हिस हेड (१४६) आणि स्टीव्ह स्मिथ (९१) धावांवर खेळत आहे. तत्पुर्वी उस्मान ख्वाजा (०) आणि डेव्हिड वार्नर ४३ धावांवर बाद झाला. ते मार्नस लाबूशेन २६ धावांचे योगदान देऊन बाद झाला. भारताकडून गोलंदाजी करताना मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकुरने प्रत्येकी १-१ विकेट घेतली. बाद झालेल्या तिन्ही फलंदाजांचे झेल यष्टिरक्षक श्रीकर भरतने टिपले.
या सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय संघाने परिस्थिती लक्षात घेऊन प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात रोहित शर्माने रविचंद्रन अश्विनचा प्लेइंग ११ मध्ये समावेश केला नाही. चार वेगवान गोलंदाज आणि एक फिरकी गोलंदाजासह खेळण्याचा निर्णय घेतला. रवींद्र जडेजाला या सामन्यात फिरकीपटू म्हणून स्थान मिळाले आहे.
२१ महिन्यांनंतर रोहित परदेशी भूमीवर कसोटी सामना खेळण्यासाठी आला
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा तब्बल २१ महिन्यांनंतर परदेशी भूमीवर कसोटी सामना खेळण्यासाठी आला आहे. याआधी इंग्लंड दौऱ्यात रोहितने या मैदानावर शेवटचा कसोटी सामना खेळला होता. यानंतर दुखापतीमुळे रोहितने दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश दौऱ्यावर एकही कसोटी सामना खेळला नाही.