WTC Final 2023: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) चा अंतिम सामना ७ जून ते ११ जून दरम्यान इंग्लंडमधील केनिंग्टन ओव्हल (लंडन) मैदानावर खेळवला जाईल. टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. या मोठ्या सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एम. एस. धोनीबाबत असे वक्तव्य केले ज्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

रवी शास्त्रींनी आपल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले

जागतिक कसोटी चॅम्पियनशिप (WTC फायनल २०२३) च्या अंतिम सामन्यासाठी निवडलेल्या १५ खेळाडूंच्या संघात के. एस. भरतचा यष्टिरक्षक म्हणून समावेश करण्यात आला आहे. त्याचवेळी के.एल. राहुलही राखीव यष्टीरक्षक म्हणून भारतीय संघात यष्टीरक्षण करू शकतो. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या विजेतेपदाच्या सामन्यासाठी एम.एस. धोनीला टीम इंडियात परत आणावे, अशी सोशल मीडियावरील चाहत्यांची इच्छा आहे. अशा परिस्थितीत माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एम.एस. धोनीच्या पुनरागमनावर सहमती दर्शवली आहे.

Marnus Labuschagne Stuns Umpire With Unorthodox Field During Sheffield Shield Match Video Goes Viral
VIDEO: मार्नस लबूशेनने उभा केला पंचांच्या मागे क्षेत्ररक्षक; व्हीडिओ पाहून तुम्ही चक्रावून जाल
Shantanu Naidu ratan tata youngest friend
कोण आहे ३० वर्षांचा पुणेकर शांतनू नायडू? त्याची…
india vs pakistan womens t20 world cup match preview
पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांत चुरस; महिला ट्वेन्टी२० विश्वचषकात आज भारत पाकिस्तान आमने-सामने
Sanjay Manjrekar comment created Controversy face the taunt of Mumbai lobby
‘उत्तरेकडील खेळाडूंकडे मी फारसे लक्ष…’, संजय मांजरेकर वादग्रस्त वक्तव्यामुळे ट्रोल; चाहते म्हणाले, ‘मुंबई लॉबी…’
Morne Morkel Unhappy on Hardik Pandya Bowling
IND vs BAN : बांगलादेशविरुद्धच्या T20I मालिकेपूर्वी गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्केल हार्दिकवर नाराज? जाणून घ्या कारण
chess olympiad 2024 grandmaster abhijit kunte interview
आता तुल्यबळ खेळाडूंची फळी निर्माण करण्यावर भर – कुंटे
Prime Minister Narendra Modi met gold medal winners in Chess Olympiad sport news
पंतप्रधानांची सुवर्णवीरांशी भेट
Yogeshwar Dutt says Vinesh Phogat herself is responsible for Paris Olympics disqualification
‘तिने देशाची माफी मागायला हवी…’, विनेश फोगटबद्दल योगेश्वर दत्तचे मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘प्रत्येकाला माहित आहे की…’

हेही वाचा: Asia Cup 2023: आशिया चषक रद्द? पाकिस्तानचा आडमुठेपणा ठेचण्यासाठी BCCIने आखली नवी योजना

ईएसपीएनक्रिकइन्फोवर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये एम.एस. धोनीच्या मार्गदर्शनावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रवी शास्त्री म्हणाले, “नक्कीच! होय, त्याने अनेक तरुण यष्टीरक्षकांना दाखवून दिले आहे की, विशेषत: आयपीएलद्वारे, तो कधीही रेकॉर्ड किंवा आकडेवारीसाठी खेळत नाही. जेव्हा त्याने कसोटी क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा कोणीही आपला निर्णय बदलू शकला नाही हे त्याला माहिती होते.”

शास्त्री पुढे म्हणाले, ‘एकदा धोनीने निर्णय घेतला की त्याला कोणीही रोखू शकत नाही. त्याला एक ते दीड वर्षे सहज कसोटी क्रिकेट खेळता आले असते. त्याच्या लाडक्या प्रेक्षकांसमोर १०० कसोटी सामने खेळून तो या फॉरमॅटला अलविदा म्हणू शकला असता पण त्याला ते नको होतं. त्याने अचानक आपल्या स्टाईलमध्ये हात वर केला आणि निवृत्त होऊन दुसऱ्या नव्या खेळाडूला संधी दिली. मात्र जर त्याला भारताला ही वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकवून द्यायची असेल तर त्याने निवृत्तीचा पुन्हा फेरविचार करावा पण मला नाही वाटत तो असं करेल.”

हेही वाचा: IPL 2023: पाणीपुरी विकणारा मुलगा झाला करोडपती! आयपीएलमध्ये राजस्थानसाठी सर्वात मोठी खेळी खेळणाऱ्या यशस्वीची कहाणी…

WTC फायनलसाठी भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (यष्टीरक्षक), केएल राहुल, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.