आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला तीन दिवसांचा अवधी उरला आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणारा हा महामुकाबला १८ जूनपासून साऊथम्प्टन येथे खेळला जाईल. स्पर्धेपूर्वी न्यूझीलंडने या सामन्यासाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली. या संघात इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी असलेल्या २० लोकांच्या संघातून पाच खेळाडूंना वगळण्यात आले आहे. डग ब्रेसवेल, जेकब डफी, डॅरेल मिशेल, रॅचिन रवींद्र आणि मिशेल सँटनर यांना विश्रांती देण्यात आली आहे.
अष्टपैलू खेळाडू कॉलिन डी ग्रॅन्डहोमे तंदुरुस्त असून विल यंगला पर्यायी म्हणून ठेवण्यात आले आहे. इंग्लंडविरुद्धच्या दुसर्या कसोटी सामन्यात बीजे वॉटलिंगला दुखापत झाल्यामुळे टॉम ब्लंडेलचा समावेश करण्यात आला होता. त्यालाच भारताविरुद्ध पर्यायी खेळाडू म्हणून स्थान मिळाले आहे.
The @BLACKCAPS have named a 15-member squad for the #WTC21 Final pic.twitter.com/g2T4XNCrMW
— ICC (@ICC) June 15, 2021
न्यूझीलंडने विशेष फिरकीपटू म्हणून सँटनरऐवजी एजाज पटेलला पसंती दिली आहे. सँटनर हा न्यूझीलंडचा महत्त्वाचा फिरकीपटू आहे, पण पटेलने इंग्लंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांमध्ये चार विकेट्स घेतल्या. त्यामुळे पटेलला संधी देण्यात आली आहे.
न्यूझीलंडचा संघ –
केन विल्यमसन (कर्णधार), टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, डेवोन कॉन्वे,कॉलिन डी ग्रॅन्डहोमे, मॅट हेनरी, काइल जेमिसन, टॉम लाथम, हेनरी निकोलस, एजाज पटेल, टीम साउदी, रॉस टेलर, नील वॅग्नर, बीजे वॉटलिंग, विल यंग.
भारताचा संघ –
रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), आर.के. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, शार्दुल ठाकूर, उमेश यादव, केएल राहुल, वृद्धिमान साहा.