WTC Final Qualification Scenario for India: आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलचे चित्र आता हळूहळू स्पष्ट होत आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने अंतिम फेरीसाठी प्रबळ दावेदार आहे.ॲडलेड कसोटीतील पराभवामुळे टीम इंडियाच्या अडचणी वाढल्या आहेत पण तरीही संघाला स्वबळावर अंतिम फेरीत स्थान मिळवण्याची संधी आहे. भारताला पुढील तीन सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध किती विजय आवश्यक आहेत आणि किती अनिर्णित सामने राहिल्यास भारत अंतिम फेरीत पोहोचू शकतो, जाणून घ्या.
हेही वाचा – Siraj-Head Fight: मोहम्मद सिराजला ट्रॅव्हिस हेडपेक्षा ICCने जास्त शिक्षा का ठोठावली? काय आहे नेमकं कारण?
मायदेशात खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पराभवाने भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर मालिका विजयाचं आव्हान भारतासाठी सोपं नसणार आहे. पर्थ कसोटीतील शानदार विजयानंतर यजमान संघाच्या पलटवाराने दुसऱ्या कसोटीत संघाला पराभवाचा धक्का बसला. पण अजूनही भारताकडे अंतिम फेरी गाठण्याची मोठी संधी आहे.
हेही वाचा – सॅम करनचा भाऊ इंग्लंड नव्हे तर ‘या’ देशाकडून खेळणार क्रिकेट, वनडे मालिकेसाठी संघात निवड
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत सध्या दक्षिण आफ्रिकेचा संघ श्रीलंकेविरूद्धच्या निर्भेळ मालिका विजयानंतर पहिल्या स्थानी पोहोचला आहे. तर भारताविरूद्धची दुसरी कसोटी मालिका १० विकेट्सने जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. तर भारतीय संघ दुसऱ्या कसोटी पराभवानंतर पहिल्या स्थानावरून थेट तिसऱ्या स्थानी आला आहे. त्यामुळे आता या दोन्ही संघाने मागे टाकत भारतीय संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत कसा दाखल होऊ शकतो, याची काही समीकरण पाहूया.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये पोहोचण्यासाठी भारताला ऑस्ट्रेलियामध्ये उरलेल्या तीन कसोटी सामन्यांपैकी दोन विजय आणि एक ड्रॉ आवश्यक आहे. यामुळे त्यांची टक्केवारी ६०.५३% होईल आणि ते दक्षिण आफ्रिकेच्या मागे किमान दुसऱ्या क्रमांकावर असतील. श्रीलंकेत २-० असा विजय मिळवला तरीही ऑस्ट्रेलिया केवळ ५७.०२% पर्यंत पोहोचू शकतो.
हेही वाचा – एक चूक अन् ICCने ‘या’ लीगवर घातली बंदी, सचिन तेंडुलकर-गावस्करांशी आहे कनेक्शन
जर भारताने मालिका ३-२ ने जिंकली तर त्यांची टक्केवारी ५८.७७% होईल आणि ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला १-० ने पराभूत केले तरीही ते भारतापेक्षा मागे राहतील. जर भारताने मालिका २-३ ने गमावली तर त्यांची टक्केवारी ५३.५१% होईल. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका भारताला मागे टाकू शकतात.
भारताने जर बॉर्डर गावस्कर ट्रॉफी गमावली तर अंतिम फेरीत जाण्यासाठी, दक्षिण आफ्रिकेला पाकिस्तानविरुद्धच्या दोन्ही कसोटींमध्ये पराभव पत्करावा लागेल आणि किमान श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एक ड्रॉ सामना खेळावा, अशी अपेक्षा टीम इंडियाची असेल.