WTC 2023 Final India vs Australia: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियन संघ भक्कम स्थितीत आहे, पण युवा अष्टपैलू शार्दुल ठाकूरच्या विधानाने कांगारुंची चिंता वाढवली आहे. विजेतेपदाच्या लढतीत ४५० धावांचा पाठलाग करण्यासाठी भारतीय संघही सज्ज असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने ४ गडी गमावून १२३ धावा केल्या असून त्यामुळे भारतावर २९६ धावांची आघाडी घेतली आहे. कांगारू संघाला पहिल्या डावात १७६ धावांची आघाडी मिळाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तिसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर शार्दुल ठाकूरने प्रसारमाध्यमांना सांगितले की, “चांगल्या भागीदारीच्या जोरावर येथे ४५० धावांचा पाठलागही करता येईल.” शार्दुलने भारताच्या पहिल्या डावात अर्धशतक झळकावले होते. त्याने अजिंक्य रहाणे (८९) सोबत १०९ धावांची भागीदारी केली, ज्यामुळे भारताने पहिल्या डावात २९६ धावांपर्यंत मजल मारली होती.

हेही वाचा: WTC Final IND vs AUS: शुबमन गिलच्या वादग्रस्त झेलवर कॅमेरून ग्रीनने सोडले मौन, म्हणाला, “मला असे वाटले की तो कॅच…”

४५० धावांचा भारतीय संघ पाठलाग करू शकतो

शार्दुल आणि रहाणेच्या खेळीमुळे टीम इंडियाला पहिल्या डावात २९६ धावा करता आल्या. शार्दुल म्हणाला, “क्रिकेट हा असा खेळ आहे की, योग्य धावसंख्या काय आहे हे तुम्ही सांगू शकत नाही. येथे मोठी भागीदारी दबावाला तोंड देऊ शकते. ४५० किंवा त्याहून अधिक धावांचा आम्ही पाठलाग करू शकतो पण आम्ही किमान दोन ते तीन चांगल्या भागीदारी झाल्या पाहिजेत.”

लॉर्ड शार्दुल पुढे म्हणाला, “इंग्लंडने गेल्या वर्षी याच मैदानावर ४०० धावांचे लक्ष्य गाठले होते. तेव्हा त्यांच्याकडे जास्त विकेट्स नव्हत्या. ही आमच्यासाठी सकारात्मक बाब आहे. तो किती धावा करेल, हे अजून सांगायचे आहे.” हे अवघड आहे.कसोटी क्रिकेटमध्ये अनेक वेळा तासाभरात खेळ बदलतो.या अपेक्षेने आम्ही मैदानात उतरू.”

हेही वाचा: WTC Final IND vs AUS: ग्रीनचा वादग्रस्त झेल अन् शुबमन गिलच्या विकेटनंतर स्टेडियममध्ये ‘चीटर, चीट, चीट’ नारे; चाहते म्हणाले, “ही बेईमानी…”

शेवटच्या दिवशी भारताला २८० धावांची गरज आहे

४४४ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने दुसऱ्या डावात ३ विकेट्स गमावून १६४ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियन संघाने दुसरा डाव ८ विकेट्स गमावून २७० धावांवर घोषित केला होता. कांगारू संघाकडे एकूण ४४३ धावांची आघाडी होती, मात्र चौथ्या दिवसाच्या खेळात टीम इंडियाने १६४ धावा केल्या. यावेळी ऑस्ट्रेलियन संघाकडे २८० धावांची आघाडी आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wtc final so what happened will chase 450 too shardul thakur made australian players sleepless with his statement avw
Show comments