Sanjay Manjrekar believes Team India: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ७ जूनपासून इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर रंगणार आहे. ऑस्ट्रेलियाने नुकतेच इंदोर कसोटीत भारताचा पराभव करून अंतिम फेरीत स्थान निश्चित केले असून आता सर्वांच्या नजरा टीम इंडिया आणि श्रीलंकेच्या कामगिरीवर असतील. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामना अहमदाबादमध्ये सुरू झाला असताना, न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या श्रीलंका संघाचा पहिला कसोटी सामनाही आजपासून सुरू झाला आहे. श्रीलंकेला न्यूझीलंडविरुद्धची मालिका जिंकता येणार नाही आणि केवळ भारतीय संघच अंतिम फेरीत पोहोचेल, असे भाकीत भारताचे माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांनी केले आहे.
श्रीलंका न्यूझीलंडला हरवूच शकणार नाही- संजय मांजरेकर
नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान या संदर्भात संजय मांजरेकर म्हणाले, “या कसोटी सामन्यात बरेच काही घडणार आहे. हा सामना जगातील सर्वात मोठ्या स्टेडियममध्ये खेळले जात आहे. भारत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या मार्गावर आहे. पण मला असे वाटते की भारत अंतिम फेरीत पोहोचेल. न्यूझीलंडला हरवण्यास श्रीलंका सक्षम आहे असे मला वाटत नाही. त्यामुळे मला विश्वास आहे की भारत आधीच फायनलमध्ये आहे. परंतु, तरीही तुम्हाला अधिकृतपणे तिथे पोहोचायचे आहे. यासोबतच बॉर्डर-गावसकर मालिकाही रोमांचक बनली असून, इंदोरमध्ये ऑस्ट्रेलियाने शानदार पुनरागमन केले.
ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्तम फलंदाज दिसलेल्या ख्वाजाने अहमदाबाद कसोटीच्या पहिल्या दिवशी आपली योग्यता सिद्ध केली. सुरुवातीला अर्धशतकी सलामी दिल्यानंतर इतर फलंदाज बाद होत असताना त्याने कमालीचा संयम दाखवला. सलामीला फलंदाजीला उतरल्यानंतर दिवसातील अखेरच्या षटकात त्याने आपले शतक पूर्ण केले. हे त्याच्या कसोटी कारकीर्दीतील १४वे तर, भारताविरुद्धचे पहिले शतक ठरले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा तो २५१ चेंडूवर १०४ धावा काढून नाबाद आहे. त्याने या खेळी दरम्यान १५ चौकार मारले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने ४ बाद २५५ धावा केल्या.
जर आपण न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका कसोटी सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास तर, दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने पहिल्या दिवशी आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. ६ गडी गमावून ३०५ धावा केल्या आहेत. कुसल मेंडिसच्या ८७ आणि कर्णधार करुणारत्नेच्या ५० धावांनी श्रीलंकेला दमदार सुरुवात करून देण्यात मोलाचा वाटा उचलला.