वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. बायो बबलमध्ये टीम इंडियाच्या खेळाडूंचा कसून सराव सुरु आहे. या मेहनतीचं फळ टीम इंडियाला मिळावं यासाठी क्रीडाप्रेमी प्रार्थना करत आहेत. दुसरीकडे कर्णधार विराट कोहलीच्या शतकाकडे देखील क्रीडाप्रेमींच्या नजरा लागून आहेत. अंतिम सामन्यात विजयासह कर्णधार विराट कोहलीकडे विक्रम प्रस्थापित करण्याची संधी आहे. न्यूझीलंडविरुद्ध शतकी खेळी करताच कर्णधार म्हणून सर्वाधिक शतकं ठोकण्याचा विक्रम त्याच्या नावावर नोंदवला जाणार आहे. आता हा विक्रम ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंग आणि विराट कोहली यांच्या नावावर बरोबरीने आहे. कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंग या दोघांच्या नावावर ४१ शतकं आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विराट कोहलीने आतापर्यंत २०० सामन्यात भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. या सामन्यात विराट कोहलीने ६२.३३ च्या सरासरीने १२ हजार ३४३ धावा केल्या आहेत. त्यात ४१ शतक आणि ५४ अर्धशतकांचा समावेश आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉटिंगने ३२४ सामन्यात ऑस्ट्रेलियाचं नेतृत्व केलं आहे. यात त्याने ४५.५४ च्या सरासरीने १५ हजार ४४० धावा केल्या आहे. पॉटिंगच्या नावावर ४१ शतकं आणि ८८ अर्धशतकं आहेत.

WTC Final: न्यूझीलंडच्या ६ सदस्यांनी मोडले बायो-बबलचे नियम!; बीसीसीआय करणार आयसीसीकडे तक्रार

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं झळकवण्याचा मान मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने एकूण १०० शतकं झळकावली आहेत. त्यात कसोटीतील ५१ आणि एकदिवसीय सामन्यातील ४९ शतकांचा समावेश आहे. रिकी पॉटिंगच्या नावावर ७१ शतकं आहे. तो या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. तर विराट कोहलीचे एकूण ७० शतकं आहेत. त्यात २७ शतकं कसोटी आणि ४३ शतकं एकदिवसीय सामन्यातील आहेत.

Euro Cup: रोनाल्डोच्या ‘त्या’ एका कृतीमुळे कोका कोला कंपनीला जबर फटका; काही मिनिटांत २९ हजार कोटींचं नुकसान

कोहलीने शेवटचं शतक बांगलादेशविरुध्द रंगलेल्या डे नाईट कसोटी सामन्यात नोव्हेंबर २०१९मध्ये झळकावलं होतं. कोलकात्यात त्याने १३६ धावांची खेळी केली होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wtc final virat kohli gets a chance to break ricky potting test century record rmt