WTC 2023 Final India vs Australia: जागतिक कसोटी चॅम्पियनशिप २०२३चा अंतिम सामना भारतीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ७ जूनपासून लंडनमधील ओव्हल येथे खेळवला जात आहे. सामन्याचा पहिला दिवस पूर्णपणे ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया सामन्याच्या पहिल्या दिवशी खूपच कमकुवत दिसत होती. याचे कारण त्याचे प्लेइंग ११ कॉम्बिनेशन देखील होते.
विशेष म्हणजे भारताने आपला सर्वात यशस्वी गोलंदाज रविचंद्रन अश्विनला कॉम्बिनेशनमुळे संघात स्थान भाग बनवले नाही. या निर्णयावर कर्णधारासह भारतीय व्यवस्थापनावरही जोरदार टीका होत आहे. संघाने चौथा वेगवान गोलंदाज म्हणून शार्दुल ठाकूरला खेळवले. मात्र, तेही पहिल्या दिवशी पूर्णपणे फ्लॉप ठरले. अशा परिस्थितीत इंग्लंडचा माजी कर्णधार नासेर हुसैन आणि रिकी पॉन्टिंग यांनी कॉमेंट्रीदरम्यान टीम इंडियाच्या कॉम्बिनेशनबद्दल बोलले होते, जे सध्या चर्चेत आहे.
नासिर हुसेन यांनी हार्दिक पांड्याबद्दल प्रश्न केला
डब्ल्यूटीसी फायनलच्या पहिल्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात समालोचन करताना नासिर हुसेन म्हणाला, “नाणेफेकीच्या वेळी, भारत त्यांच्या अंतिम ११ खेळाडू निवडण्यात बराच गोंधळलेला दिसत होता. तर ऑस्ट्रेलियन संघ क्रिस्टल क्लिअर होता. शार्दुल ठाकूर निःसंशयपणे सीम आणि स्विंग गोलंदाजी करणारा अष्टपैलू खेळाडू आहे. रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल हे भारतीय परिस्थितीत योग्य अष्टपैलू आहेत. पण परदेशात सीम गोलंदाजी करणाऱ्या अष्टपैलू खेळाडूचे काय? हार्दिक पांड्या कुठे आहे?” हुसेनच्या या प्रश्नाला ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने उत्तर दिले.
रिकी पॉंटिंगने पांड्याबद्दल अपडेट दिले
कॉमेंट्रीमध्ये नासेर हुसेनने हार्दिक पांड्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाबाबत रिकी पॉंटिंग म्हणाला, “ही गोष्ट यापूर्वी कॉमेंट्रीमध्येही बोलली होती. आपले शरीर कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी तयार नसल्याचे हार्दिकने स्पष्ट केले होते. केवळ एका कसोटीसाठी समतोल निश्चित करण्यासाठी तुम्ही संघाचा भाग होऊ शकत नाही. इतर खेळाडूंसाठीही ते योग्य ठरणार नाही.”
भारताला संकटातून बाहेर काढण्याची जबाबदारी रहाणेवर
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२१-२३चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात इंग्लंडमधील ओव्हल येथे खेळला जात आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४६९ धावा केल्या. स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेडने शतके झळकावली. त्याचवेळी भारताकडून सिराजने चार विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत पाच विकेट्सच्या मोबदल्यात १५१ धावा केल्या आहेत. अजिंक्य रहाणे आणि श्रीकर भरत क्रीजवर आहेत. भारतीय चाहत्यांना या दोन खेळाडूंकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.