World Test Championship Points Table: भारतीय संघाने ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२५ च्या अंतिम फेरीच्या दिशेने अजून एक मजबूत पाऊल टाकले आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आणखी एक कसोटी मालिका जिंकली आहे. भारताने बांगलादेशचा २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत एकतर्फी पराभव केला आहे. WTC 2023-25 ​​सायकलमध्ये टीम इंडियाकडे अद्याप दोन कसोटी मालिका बाकी असतानाही, भारताने आपली स्थिती मजबूत करत पहिले स्थान अधिक मजबूत केले आहे. त्याचवेळी, कानपूर कसोटी सामन्यात ७ विकेट्सने पराभव केल्यामुळे बांगलादेश संघाला WTC गुणतालिकेत मोठा धक्का बसला आहे.

हेही वाचा – “रोहितचा मेसेज स्पष्ट होता, आऊट झालो तरी हरकत नाही…”, फलंदाजीपूर्वी संघाला कर्णधाराने नेमकं काय सांगितलं? राहुलने केला खुलासा

India Scored 2nd Highest T20 Total of 283 Runs Tilak Varma and Sanju Samson Scored Individual Centuries with Record Breaking Partnership IND vs SA
IND vs SA: टीम इंडियाचा धावांचा पर्वत, संजू-तिलकची शतकं आणि विक्रमी भागीदारी
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
India vs South Africa 4th T20 Live Updates in Marathi
IND vs SA: भारताचा दक्षिण आफ्रिकेवर विक्रमी १३५ धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली
India vs South Africa 3rd T20 Highlights in Marathi
IND vs SA 3rd T20 Highlights : रोमहर्षक सामन्यात भारताने मारली बाजी! तिलक वर्माचा शतकी तडाखा, मालिकेत २-१ घेतली आघाडी
Arjun Tendulkar Maiden Five Wicket Haul in First Class Cricket Ranji Trophy Goa vs Arunachal Pradesh
Arjun Tendulkar: अर्जुन तेंडुलकरने पहिल्यांदाच पटकावल्या ५ विकेट्स; रणजी करंडक स्पर्धेत भेदक गोलंदाजी; ८४ धावांवर संघ सर्वबाद
IND vs SA 3rd T20 Match Timing Changes India vs South Africa centurion
IND vs SA: भारत-दक्षिण आफ्रिका तिसरा टी-२० सामना दुसऱ्या सामन्यापेक्षा उशिराने सुरू होणार, जाणून घ्या काय आहे नेमकी वेळ?
Team India Performance in Border Gavaskar Trophy played at Australia
Team India : टीम इंडियाची ऑस्ट्रेलियामध्ये कामगिरी खूपच निराशाजनक, तब्बल ‘इतक्या’ वेळा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत पत्करावा लागलाय पराभव
Champions Trophy Javed Miandad Angry on India for Not Travelling Pakistan Said If We Dont Play India at all Pakistan cricket will Prosper
Champions Trophy: “भारत-पाकिस्तान सामनाच नाही झाला तर…”, टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी येणार नसल्याने BCCI, ICCवर संतापले जावेद मियांदाद

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत टीम इंडिया कानपूर कसोटीपूर्वीही पहिल्या क्रमांकावर होती आणि अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे. बांगलादेशविरूद्ध मालिका विजयानंतर भारताने पहिले स्थान अधिक मजबूत केले आहे. आता भारत आणि ऑस्ट्रेलियामधील गुण आणि टक्केवारीतील अंतर जे कमी होते ते आता वाढले आहे. कानपूर कसोटीपूर्वी भारतीय संघाची गुणांची टक्केवारी ७१.६७ होता, जो आता हा सामना जिंकल्यानंतर थेट ७४.२४ वर पोहोचला आहे. तर ऑस्ट्रेलियाचे गुणांची टक्केवारी फक्त ६२.५ आहे, कारण ऑस्ट्रेलियाने यादरम्यान एकही कसोटी सामना खेळलेला नाही.

हेही वाचा – IND vs BAN: रोहित-अश्विनच्या सापळ्यात अडकला मोमिनुल हक, दुसऱ्या चेंडूवरचा शॉट पाहून बदलली फिल्डिंग अन् मिळाली विकेट, पाहा VIDEO

या सामन्यापूर्वी बांगलादेशचा संघ ३९.२९ टक्के विजयासह पाचव्या स्थानावर होता आणि आता तो सातव्या स्थानावर घसरला आहे. WTC 2025 च्या पॉइंट टेबलमध्ये ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे, ज्याची विजयाची टक्केवारी ६२.५० आहे. तिसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा संघ आहे, ज्याने न्यूझीलंडला पराभूत करून तिसरे स्थान मिळविले. श्रीलंकेची विजयाची टक्केवारी ५५.५६ आहे. इंग्लंडचा संघ चौथ्या क्रमांकावर आहे, ज्याची विजयाची टक्केवारी ४२.१९ आहे.

WTC Points Table 2023-25
भारताच्या मालिकाविजयानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची गुणतालिका

हेही वाचा – IND vs BAN: BCCI उपाध्यक्ष राजीव शुक्ला फळं खात असताना कॅमेऱ्यात कैद, कॅमेरा आपल्याकडे असल्याचे पाहताच पाहा काय केलं?

भारत विरुद्ध बांगलादेश कानपूर कसोटीत सलग दोन दिवस पाऊस पडत असताना, सामन्याचा निकाल लागेल अशी कोणालाच अपेक्षा नव्हती. पण चौथ्या आणि पाचव्या दिवशी भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि संपूर्ण टीम इंडियाने आक्रमक कामगिरी करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. पावसामुळे दोन दिवस एकही चेंडू न खेळता सामना रद्द करण्यात आला. अशा सामन्यात टीम इंडियाने शेवटच्या दिवशी बांगलादेशचा ७ विकेट्सने पराभव केला.