PAK vs BAN Test Series WTC Points Table Bangladesh beat Pakistan by 6 wickets : बांगलादेशने सलग दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानचा सहा गडी राखून पराभव ऐतिहासिक विजय नोंदवला. या विजयासह बांगलादेशने पाकिस्तानविरुद्ध कसोचा क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच मालिका जिंकली आहे. बांगलादेशने पहिली कसोटी १० गडी राखून जिंकली होती. दोन्ही सामने रावळपिंडीत झाले. यासह, जागतिक कसोटी चॅम्पियनशिप क्रमवारीत मोठा बदल झाला आहे. या विजयानंतर बांगलादेशने दोन स्थानांनी मोठी झेप घेत अव्वल चारमध्ये स्थान मिळवले आहे.

बांगलादेश टॉप-४ मध्ये दाखल –

बांगलादेशने पाकिस्तानला हरवून चौथे स्थान पटकावल्याने इंग्लंडचा संघ पाचव्या स्थानावर घसरला आहे. याआधी श्रीलंकेला हरवून इंग्लंड संघ चौथ्या स्थानावर विराजमान झाला होता. पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील विजयापूर्वी, बांगलादेशचे ५ सामन्यांतून २ विजय आणि ३ पराभवांसह २१ गुण आणि विजयाची टक्केवारी ३५ होती. डब्ल्यूटीसी गुणतालिकेतील क्रमवारी विजयाच्या टक्केवारीच्या आधारे ठरवली जाते. पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर बांगलादेशची विजयाची टक्केवारी ४५.८३ झाली आहे. इंग्लंडकडे ४५ टक्के आहे. त्यामुळे इंग्लंडचा संघ पाचव्या स्थानावर घसरला आहे. तिसऱ्या कसोटीत श्रीलंकेला पराभूत करून इंग्लंडचा संघ डब्ल्यूटीसी क्रमवारीत सुधारणा करू शकतो. मात्र, तो न्यूझीलंडला मागे टाकू शकत नाही.

भारत ६८.५२ विजयाच्या टक्केवारीसह अव्वल स्थानावर कायम –

डब्ल्यूटीसी क्रमवारीबद्दल बोलायचे झाल्यास, भारत ६८.५२ या विजयाच्या टक्केवारी अव्वल क्रमांकावर आहे. त्याबरोबर ऑस्ट्रेलिया (६२.५०) दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंड (५०) तिसऱ्या स्थानावर आहे. बांगलादेश (४५.८३) चौथ्या आणि इंग्लंड (४५) पाचव्या आणि दक्षिण आफ्रिका (३८.८९) सहाव्या स्थानावर आहे. तसेच श्रीलंका (३३.३३) सातव्या आणि (२२.२२) पाकिस्तान आठव्या क्रमांकावर आहे.

हेही वाचा – Paralympics 2024 : पॅरालिम्पिकमध्ये व्हीलचेअर टेनिस… गुगलनेही बनवलं खास डूडल, जाणून घ्या खेळाचा इतिहास

बांगलादेशचा ऐतिहासिक मालिका विजय –

सामन्याबद्दल बोलायचे तर बांगलादेशचा कर्णधार नझमुल हुसेन शांतोने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने पहिल्या डावात २७४ धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा पहिला डाव २६२ धावांवर गारद झाला. अशा प्रकारे पहिल्या डावाच्या जोरावर पाकिस्तानने १२ धावांची आघाडी मिळवली होती. पाकिस्तानने दुसऱ्या डावात १७२ धावा केल्या आणि बांगलादेशसमोर १८५ धावांचे लक्ष्य ठेवले. बांगलादेशने हे लक्ष्य चार गडी गमावून पूर्ण केले. लिटन दास या सामन्याचा हिरो ठरला. त्याने मेहदी हसन मिराजसह बांगलादेश संघाची धुरा सांभाळली आणि १३८ धावा केल्या होत्या.

हेही वाचा – Team India : कर्णधारपदाच्या बाबतीत रोहित शर्मा विराट आणि धोनीपेक्षा कसा आहे वेगळा? अश्विनने सांगितले कारण

पहिल्या कसोटीतील पराभवानंतर पाकिस्तान संघावर बरीच टीका झाली होती. आता दुसरी कसोटी गमावल्यानंतर पाकिस्तान संघ आणि खेळाडू धोक्यात आले आहेत. बांगलादेशने पाकिस्तानवर शेवटची कसोटी जिंकून या फॉरमॅटमध्ये पहिला विजय मिळवला होता. आता बांगलादेशने प्रथमच पाकिस्तानला कसोटी मालिकेत पराभूत केले आहे.