WTC Points Table after England beat New Zealand : न्यूझीलंड दौऱ्यात इंग्लंडने चांगली सुरुवात केली आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान संघाचा आठ गडी राखून पराभव केला. या विजयासह इंग्लिश संघाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. रविवारी (१ डिसेंबर) ख्राईस्टचर्चच्या हॅगले ओव्हलवर झालेल्या या विजयासह इंग्लंडला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठा फायदा झाला. त्याच्या विजयाचा नायक ब्रेडन कार्स होता. त्याने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली आणि दुसऱ्या डावात ४२ धावांत ६ विकेट्स घेतल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

न्यूझीलंडला बसला मोठा धक्का –

इंग्लंडच्या आठ गडी राखून विजयाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठी अस्वस्थता निर्माण केली आहे. या विजयानंतरही इंग्लंड सहाव्या स्थानावर असला तरी न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे. फायनलमध्ये पोहोचण्याची शक्यता आता लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. भारताचा ३-० असा पराभव केल्यानंतर न्यूझीलंड अंतिम फेरी गाठण्याचा दावेदार ठरला होता. इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर त्याची समीकरणे बदलली आहेत. आता न्यूझीलंड अंतिम फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी इंग्लंडविरुद्धचे शेवटचे दोन कसोटी सामने जिंकावे लागतील. पॉइंट टेबलमध्ये तो भारताला कडवी टक्कर देत होता, पण त्याच्या पराभवामुळे भारताला मोठा फायदा झाला आहे.

भारत पहिल्या स्थानावर कायम –

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारत पहिल्या स्थानावर कायम आहे. दुसरीकडे, श्रीलंकेविरुद्ध दणदणीत विजय मिळवल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने विद्यमान चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तिसऱ्या स्थानावर ढकलले. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना पुढील वर्षी इंग्लंडमध्ये गुणतालिकेत अव्वल दोन संघांमध्ये खेळवला जाईल.

हेही वाचा – Joe Root : जो रुटने मोडला सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम! कसोटी क्रिकेटमध्ये केला ‘हा’ खास पराक्रम

u

या पराभवानंतर न्यूझीलंडच्या गुणांची टक्केवारी (पीसीटी) ५० झाली आहे. यामुळे चौथ्या क्रमांकावर असलेल्या श्रीलंकेची बरोबरी झाली आहे. आता या मालिकेत इंग्लंड संघाला २-१ ने पराभूत केले, तरी त्यांची गुणांची टक्केवारी केवळ ५७.१४ पीसीटीपर्यंत पोहोचू शकेल. अशा परिस्थितीत फायनलमध्ये पोहोचण्याची शक्यता फारशी नाही. मात्र, जर काही मोठी उलथापालथ झाली आणि इतर संघांचे निकाल त्याच्या बाजूने लागले तर तो पुढे जाऊ शकतो. पाकिस्तानमधील मालिका पराभवानंतर इंग्लंडच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या, परंतु त्यांनी पीसीटी ४३.७५ पर्यंत वाढवली आहे. आता ३-० मालिका जिंकूनही त्याच्या गुणांची टक्केवारी ५० च्या वर नेऊ शकत नाही.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wtc points table change after england beat new zealand by 8 wickets at hagley oval test match vbm