WTC Points Table India Standings: भारताला घरच्या मैदानावर इतिहासातील मोठा लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला आहे. न्यूझीलंड संघाने २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिन्ही सामने जिंकत क्लीन स्वीप केलं आहे. भारताला न्यूझीलंडने १४८ धावांचे विजयाचे लक्ष्य दिले होते. भारताची टॉप ऑर्डर पुन्हा एकदा वाईटरित्या कोसळली त्याचा संघाला तिसऱ्या कसोटीत फटका बसला आहे. ऋषभ पंत एकटा ६४ धावा करून लढला पण त्याची विकेट सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला आणि परिणामी भारताने अवघ्या २५ धावांनी सामना गमावला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भारतीय कसोटी इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या संघाने भारतात क्लीन स्वीप करण्याचा पराक्रम केला आहे. न्यूझीलंड संघ हा पहिला संघ ठरला ज्याने भारतात क्लीन स्वीप करून इतिहास घडवला आहे. या ऐतिहासिक विजयानंतर भारताला गुणतालिकेत मोठा धक्का बसला आहे तर न्यूझीलंडला याचा फायदा झाला आहे.

हेही वाचा – IND vs NZ: वॉशिंग्टन सुंदरमुळे सुनील गावसकरांनी जेवताना फोडली प्लेट, रवी शास्त्रींनी कॉमेंट्री करताना सांगितलं नेमकं काय घडलं?

भारतीय संघाला या पराभवासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत पहिले स्थान गमवावे लागले आहे. भारतीय संघ सलग तीन कसोटी पराभवांनंतर दुसऱ्या स्थानी आला आहे. भारताचे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेतील टक्केवारी ५८.३३ टक्क्यांवर पोहोचली आहे. तर ऑस्ट्रेलियाचा संघ ६२.५० टक्क्यांसह पहिल्या स्थानी कायम आहे.

हेही वाचा – IND vs NZ : टीम इंडियाचा सलग तिसऱ्या सामन्यात लाजिरवाणा पराभव! न्यूझीलंडने व्हाइट वॉश करत भारतात घडवला इतिहास

या कसोटी चॅम्पियनशिप सायकलमध्ये भारताने एकूण १४ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये संघाने ८ सामने जिंकले, ५ गमावले आणि एक सामना अनिर्णित राहिला. कसोटी मालिकेत भारताचा ३-० असा पराभव केल्यानंतर न्यूझीलंड संघ आता गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे. किवी संघाने ११ पैकी ६ सामने जिंकले असून ५ सामने गमावले असून या संघाची विजयाची टक्केवारी ५४.५५ आहे. श्रीलंकेचा संघ ५५.५६ च्या विजयाच्या टक्केवारीसह तिसऱ्या स्थानावर आहे.

सध्या, दक्षिण आफ्रिका ५४.१७ टक्केवारीसह पाचव्या स्थानावर आहे, तर इंग्लंड ४०.७९ च्या टक्केवारीसह सहाव्या स्थानावर आहे. पाकिस्तान ३३.३३ च्या विजयाच्या टक्केवारीसह सातव्या स्थानावर आहे.

हेही वाचा – Ajaz Patel : भारतीय वंशाच्या एजाज पटेलचा वानखेडेवर विश्वविक्रम! ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच गोलंदाज

भारत वि न्यूझीलंड यांच्यात ३ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात होती. पहिल्या बंगळुरू कसोटीत किवी संघाने भारतावर ८ विकेट्सने विजय मिळवला. तर दुसऱ्या पुणे कसोटीत भारताला ११३ धावांनी पराभव पत्करावा लागला. या दोन पराभवांमुळे भारताला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागले.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिका

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wtc points table india lost 1st spot after consecutive 3 test defeat in india vs new zealand bdg