WTC Points Table After IND vs AUS 1st test: पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करताच भारतीय संघासाठी अजून एक आनंदाची बातमी आली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत भारताने मोठी झेप घेतली आहे. भारताने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्याच कसोटीत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. भारताने पर्थ कसोटीत यजमान संघाचा २९५ धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयासह भारताने ऑस्ट्रेलियाकडून गुणतालिकेतील पहिले स्थान हिसकावून घेतले आहे.
पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करून भारताने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. भारतीय संघाची टक्केवारीही ५८.३३ वरून आता ६१.११ वर गेली आहे. त्याचवेळी ऑस्ट्रेलिया संघ १३ सामन्यांतील चौथ्या पराभवासह दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. ऑस्ट्रेलियाची टक्केवारी आता ५७.६९ वर पोहोचली आहे. या सामन्यापूर्वी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला ४-० ने मालिका जिंकावी लागणार होती. आता भारताने पहिला सामना जिंकल्यानंतर अंतिम फेरी गाठण्यासाठी तीन सामने जिंकावे लागणार आहेत.
हेही वाचा – Virat Kohli : शतक झळकावून परतणाऱ्या विराटला गौतम गंभीरने मारली मिठी, दोघांचा भावनिक VIDEO व्हायरल
भारताचा १५ कसोटी सामन्यांमधला हा नववा विजय आहे. आता त्याच्या खात्यात ११० गुण आहेत. श्रीलंका ५५.५६ गुणांच्या टक्केवारीसह तिसऱ्या स्थानावर आहे, तर न्यूझीलंड (५४.५५) आणि दक्षिण आफ्रिका (५४.१७) अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहे.
पहिल्या कसोटी सामन्याचा लेखाजोखा
पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर ५३४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात कांगारूंचा संघ २३८ धावांवर गारद झाला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने पहिल्या डावात १५० धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात १०४ धावांत गारद झाला. पहिल्या डावाच्या आधारे भारताकडे ४६ धावांची आघाडी होती. भारताने दुसरा डाव ६ गड्यांच्या मोबदल्यात ४८७ धावांवर घोषित केला होता आणि ५३३ धावांची आघाडी मिळवली होती.
भारतीय संघ पहिल्या कसोटीत रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी आणि शुबमन गिल यांसारख्या स्टार खेळाडूंशिवाय उतरला होता. जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ऐतिहासिक विजय नोंदवला. २०२१ मध्ये गाबा येथे ऑस्ट्रेलियाचा घमंड मोडल्यानंतर भारताने आता पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाचा मोठा पराभव केला आहे. पर्थच्या स्टेडिमयवर ऑस्ट्रेलियाचा पराभव करणारा भारत हा पहिला संघ आहे.
ह