World Test Championship Points Table: पाकिस्तान सध्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीत आहे. पण पाकिस्तानला घरच्या मैदानावरील सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. पाकिस्तानने दुसऱ्या कसोटीसाठी फिरकीपटूंना अनुकूल अशी खेळपट्टी तयार केली. पण मुलतानच्या याच खेळपट्टीवर पाकिस्तानचा वेस्ट इंडिजने पराभव केला. वेस्ट इंडिजने पाकिस्तानच्या घरच्या मैदानावर ३५ वर्षांनी विजय मिळवला आहे.

आता पाकिस्तान क्रिकेट संघ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर पोहोचला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धची शेवटची कसोटी गमावल्यानंतर संघाला अखेरच्या स्थानावरून समाधान मानावे लागले आहे. पहिल्यांदाच पाकिस्तानचा संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत अखेरच्या स्थानी राहिला आहे.

वेस्ट इंडिज क्रिकेट संघाने पाकिस्तानचा त्यांच्या घरच्या मैदानावर दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात १२० धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला आहे. याने फारसा फरक पडला नसला, तरी निश्चितपणे वेस्ट इंडिजचा संघ बराच काळ जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर होता, तो आठव्या स्थानी आला आहे. तरपाकिस्तानी संघ खालच्या स्थानावर गेला आहे. एवढा परिणाम फक्त एका सामन्यानंतर दिसून आला आहे. हे दोन्ही संघ आधीच WTC अंतिम शर्यतीतून बाहेर पडले होते, त्यामुळे गुणतालिकेवर फारसा फरक पडलेला नाही.

पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज कसोटीपूर्वी पाकिस्तान संघ आठव्या स्थानावर होता तर वेस्ट इंडिज संघ नवव्या स्थानावर होता. पाकिस्तानची टक्केवारी सामन्यापूर्वी ८०.१३ होती, तर वेस्ट इंडिजची टक्केवारी २२.२२ होती. त्यात अचानक खूप बदल झालेला दिसला. दुसरी कसोटी सामना गमावल्यानंतर, पाकिस्तानची टक्केवारी २७.९८ झाला आहे आणि हा संघ आता शेवटच्या म्हणजे नवव्या स्थानावर पोहोचला आहे. दुसरीकडे वेस्ट इंडिजने सामना जिंकल्यानंतर थेट आठव्या क्रमांकावर झेप घेतली आहे आणि आता संघाची टक्केवारी २८.२१ झाली आहे.

WTC Points Table 2025 After PAK vs WI 2nd Test
पाकिस्तानच्या पराभवानंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची गुणतालिका

आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३-२५ च्या चक्रातफक्त दोन सामने शिल्लक आहेत. ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ लवकरच श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलियन संघ आधीच जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचला असला तरी श्रीलंकेचा संघ मात्र बाहेर पडला आहे. जर ऑस्ट्रेलियाने ही मालिका जिंकली, तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर येण्याची संधी असेल. जिथे सध्या दक्षिण आफ्रिकेचा संघ आहे. या वर्षी जूनमध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात अंतिम सामना होणार आहे.